-
Safari Afriketli (सफारी आफ्रिकेतली)
जंगल हे ठिकाण असे असते जिथे तुम्ही जर चुकीचे वागल्यास कोणाच्या तरी तोंडचा घास होऊ शकता! कारण या जंगलात असतात, घातक शिकारी प्राणी,चिडलेले हत्ती आणि जगातले सर्वात बेभरवशाचे प्राणी- म्हणजे,बेलगाम पर्यटक आणि अविचाराने धाडस करणारे सफारी गाईड! या सगळ्याचे चित्रण लेखकाने या पुस्तकात केले आहे. अंगावर धावून येणाऱ्या सिंहाचा लेखकाने दोन वेळा कसा सामना केला,ब्रिटीश राजघरयाण्यातून आलेल्या झिंगलेल्या अर्धनग्न पर्यटकाचा रात्रीच्या अंधारात कसा शोध घेतला,पर्यटकांनी भरलेली ल्यांडरोव्हर गाडी पाणघोडे असलेल्या जलप्रवाहाच्या घेऊन गेल्यावर कशी तारांबळ उडाली,आणि आफ्रिकेतल्या सर्वात धोकादायक प्राण्याला त्याने आपला पाळीव प्राणी कसे बनवले,असे विविध अनुभव लेखक गोष्टीरूपात सांगतो. नर्मविनोदी शैलीतले हे अनुभव वाचतान कधी भीतीने अंगावर काटा उभा राहतो,तर कधी हसून-हसून पुरेवाट होते,तर कधी डोळ्यात पाणी उभे राहते.
-
End Game (एन्ड गेम)
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरशः उलथापालथ घडवू शकतो. त्यातून मग दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघात युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की. चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल,अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे कि त्या मागे काही मुलभूत कारणे आहेत? जगाला भेडसवणाऱ्या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत,मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला तर हितसंबंधांचा संघर्ष अटल आहे. थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणरी कादंबरी.
-
Videshi Kanya (विदेशी कन्या)
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुले कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत,हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या आजीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्माच्या लोकांविषयी जे काहीं आजवर ऐकलेले होते, त्याहीपेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतींचा मिलाफ असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळऊ लागते. त्यातच आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू),आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (खिश्चन) अशा विचारचक्रात ती अडकते...
-
To Ek Pakistani (तो एक पाकिस्तानी)
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रमावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशांमध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एक माणूस कसा वागतो, कोणत्या ठरला जाऊ शकतो; ताबाबत धोक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही ज्ञात असूनही अमेरिकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
-
Mi Eric (मी एरिक)
मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरच जर का माझ्या 'शेंगदाण्याच्या आकाराच्या' मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय; ते मी त्यांची आज्ञा पाळावी या जाणीवेने नव्हे ; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! …विचार करणे, आठवून गोष्टी करणे,हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले,तो मेंदू दुसर्यांच्या मेंदूपेक्षा थोडा लहान आहे! …त्यमुले 'निव्वळ कुत्रा'असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?
-
Sad Uttungachi (साद उत्तुंगाची)
जीवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वतः लुटणाऱ्या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणाऱ्या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता- वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो. आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता,त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो!