-
Krishnakath (कृष्णाकांठ )
1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेले यशवंतराव चव्हाण हे अग्रणी राष्ट्रीय नेते होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 12 मार्च 2012 रोजी प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र लिहिले होते. त्याची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रेस्टिज प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती. चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभाच्या निमित्ताने याच आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे.