-
Baaizzat Bari ?
एखाद्या देशातील काही लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्याबाबतीत सरकार आणि जनता पूर्वग्रहाने वागते, असे असेल तर त्या देशाची लोकशाही अपूर्ण आहे. अशाने लोकशाही मॉडेलमध्ये मोठी त्रुटी असल्याची जाणीव मला होते. अशा स्थितीत देशातील सजग प्रसार माध्यमांनीआपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सदर मुद्दे हाती घ्यायला हवेत. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमेच स्वतः समस्या होऊन बसली आहेत.तुम्ही आणि मी घरात बसून कल्पनाही करू शकणार नाही आणि नखशिखान्त हादरुन जाऊ असे काही प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात. - अभिसार शर्मा, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार राजकीय पक्षांना आरसा दाखवणारा एक भक्कम दस्तावेज म्हणून मीया पुस्तकाकडे बघतो आहे. जागरुक समाजाची भूमिका कशी असावी याबद्दल हे पुस्तक भाष्यकरतं. - अबू बकर सब्बाक, वकील, सर्वोच्चन्यायालय या पुस्तकातील प्रत्येक दस्तावेज ही कहाणी सांगतो :वर्षानुवर्षे तुरुंगवास, दहशतवादाचा कलंक, प्रत्येककेसमध्ये एक नव्हे तर अनेक आयुष्यं उद्ध्वस्त होणं. देशाची सद्यस्थिती या पुस्तकात दिसून येतेच शिवाय या सगळ्याची जबाबदारी कोणत्या एका राजकीय पक्षाची नसून, सगळ्यांचीच आहे हे सांगते. निरपराध माणसांना दहशतवादाच्या नावावर भोगावीलागणरी शिक्षा अल्पसंख्याक माणसांना गुन्हेगार ठरवणाऱ्या एका विचारसरणीकडे निर्देशकरते. हे पुस्तक आणि त्यामागचे कष्ट आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याविचारसरणीशी आपल्याला लढावं लागणार असल्याची ही हाक आहे, आणिती काही केवळ एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी नव्हे, तरआपल्या सगळ्यांसाठीच आहे. - हरतोश सिंह बाल, राजकीय संपादक, कारवाँमॅगझीन
-
Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.
-
Mumbai Dangal Ek Vishleshan (मुंबई दंगल एक विश्लेष
मुंबईमध्ये १९९२ च्या डिसेंबरमध्ये आणि १९९३ च्या जानेवारीत भीषण जातीय दंगली झाल्या. त्याच वर्षी मार्चमध्ये बॉम्बस्फोट झाले. दंगल आणि बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या आयोगाने यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला १९९८ मध्ये सादर केला. तो सादर करण्यापूर्वी सरकारने टाळाटाळ केली होती. या सगळ्याचे पत्रकार म्हणून अवलोकन करणारे निखिल वागळे यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात पहिल्या भागात त्यांनी वस्तुस्थिती आणि विपर्यास सांगितला आहे. श्रीकृष्ण अहवाल, पोलिस दल, पत्रकारांची भूमिका, अपुरी शस्त्रास्त्र आणि जातीयवादी मनं आदी मुद्यांवर त्यात भाष्य आहे. दुसऱ्या भागात थैमानाच्या कहाण्या आहेत. खाकी वर्दीतील अत्याचार दाखवले आहेत.
-
Nathuramayan (नथुरामायण)
मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक इतिहासाचा कसा विपर्यास करतं, खोटं बोलतं ते सांगण्यासाठी य.दिंनी लेख लिहायचं ठरवलं आणि त्या लेखांचं एक पुस्तकच बनलं.
-
Virat (विराट)
अधीर नि आतूर दिल्ली का छोकरा...वयाला न शोभणारी आव्हानं बेधडकपणॆ स्वीकारणारा...प्रारंभालाच यशाचं मांद्य शरीरावर चढल्याने बहकलेला गुलछबू-गोबरा क्रिकेटपटू...ही विराट कोहलीची अर्थातच भूतकाळाची तीन रुपं. पण वर्तमानातला विराट याहून पूर्णपणे आगळावेगळा... डू अचूक तडकावल्यानंतरचा टणत्कार दर खेपेला स्टेडियमभर घुमत राहतो, तशी प्रेक्षकांमधल्या चैतन्याला, उत्साहाला बहार येते. तेव्हा, अवघा आसमंत सर्वार्थानं विराटमय होऊन गेलेला असतो. याच सहस्त्रकी विराटमय पर्वाचा वेध घेणारं हे रंजक नि प्रेरक पुस्तक....
-
Imperfect (इम्पर्फेक्ट)
हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी माझं यश आणि अपयश याविषयी माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी प्रत्येक व्यक्ती एक आगळं आयुष्य जगत असते. प्रत्येकाच्या जगण्याच्या या कहाण्या नेहमीचं रंजक असतात. कोणीही माणूस निरर्थक आयुष्य जगत नाही. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीपासून तरुण , नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, 'माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या ; तू नवीन वीस चुका कर.'
-
Spashta Bolayach Tar (स्पष्ट बोलायचं तर)
२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे. २०१४ च्या मे महिन्यात नरेंद्र मोदी बहुमत मिळवून पंतप्रधान झाले. विकासाची स्वप्नं आणि मनमोहनसिंग सरकारविरुद्धचा राग अशा घोड्यावर मोदी स्वार झाले होते. त्यांच्या विजयाने जनतेत एक नवी आशा निर्माण झाली होती. पण पहिल्या शंभर दिवसातच या आशेला तडा जायला सुरुवात झाली. सर्व राजकारण एका नेत्याभोवती फिरु लागलं. विकास राहिला बाजूला आणि नवे राजकीय, सामाजिक, आर्थिक तणाव राज्या-राज्यात निर्माण झाले. प्रामुख्याने या तणावांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या लेखसंग्रहात केला आहे.
-
Tisra Shwas (तिसरा श्वास)
हिंदी कादंबरीकार कामतानाथ यांच्या कथा जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत. त्या सामाजिक असमानतेच्या प्रश्नांशी दोन हात करतात. ते स्त्री, दलित, शेतकरी, शेतमजुर, अल्पसंख्या या सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर घेतात. पात्रांची एवढी विविधता एखादा कथाकाराच्या कथेमध्ये क्वचितच आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची स्वप्ने, संघर्ष, मोहभाग, संशय, संकल्प आणि परिवर्तनन यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडलेले आपणास दिसते.
-
Gappa Cinemachya (गप्पा सिनेमाच्या)
जावेद अख्तर यांची नसरीन मुन्नी कबीर यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत म्हणजे हे पुस्तक. एका प्रतिभासंपन्न कवी आणि लेखकाबरोबर साधलेला हा संवाद आपल्यासमोर जावेदसाब यांचं आयुष्य उलगडून दाखवतो. त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांच्या लिखाणावर सुरुवातीच्या काळात पडलेला प्रभाव, सलीम खान यांच्याबरोबरचा प्रवास अशा अनेक गोष्टींवर यातून प्रकाश पडला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९६५ च्या दरम्यान क्लॅपरबॉय म्हणून सुरू केलेली कारकीर्द या मुलाखतीमधून समोर येते. हिंदी चित्रपटाची परंपरा, गीतलेखन आणि पटकथालेखन या वेगवेगळ्या घटकांवर तर जावेदसाब बोलले आहेतच, पण स्वत:चे राजकीय विचारही त्यांनी स्पष्टपणे मांडले आहेत. म्हणूनच चित्रपट कलेविषयी आस्था आणि रुची असणार्यान सगळ्यांसाठी चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल असा विश्वास वाटतो.
-
Fukat Nahi,Mukat (फुकट नाही,मुक्त)
वयाचा सातव्या वर्षी कॅलक्युलसचा अभ्यास करणारा. रिचर्ड स्टॉलमन शिक्षक सांगतात म्हणून वर्गात पाढे म्हणण्यास तक्रार देत असे. शाळेतल्या चौथ्या वर्षात त्याने लिहलेल्या पहिला निबंधाचा विषय होता, "अंकांचा पश्चिमकडील इतिहास." कुशाग्र बुद्धिमत्ता, बाह्य गोष्टी लक्ष विचलित न होण्याचा गुण यामुळे संगणकावर सलग छत्तीस तास काम करणारा स्टॉलमन मायक्रोसॉफ्टसारखा कंपन्यांना धडकी बसावी अशी मुक्त आज्ञावली चळवळ उभी करतो … त्याची हि कहाणी हे पुस्तक गन्यू मुक्त दस्त परवान्याखाली वितरीत होत आहे, असा प्रकारचे हे पहिलेच मराठी पुस्तक आहे. याचा अर्थ तुम्ही त्या पुस्तकातील मजकूर पूर्णत वा अंशत वा त्या बदल करून तुमच्या नावानी छापू आणि विकू शकता.
-
Trupt Maifal (तृप्त मैफल)
वेळोवेळी, काही ना काही निमित्ताने मी केलेले विविध व्यक्तीविषयीचा लिखाण या संग्राहात एकत्रित केलेले आहे. त्याचाविषयीचा पहिला आणि कायम झालेले संस्कार या लेखामध्ये आहे. 'संस्कार' हा शब्द वापरण्याला आणखी एक कारण आहे . यातल्या व्यक्ती नामवंत आहेत , त्याचे एकूण संस्कृतीलाच झालेले योगदान उघड आहे . परंतु ज्या व्यक्ती त्याचा इतका ख्यातनाम नाहीत, त्याचाही स्वभावाची अलोकिक बाजू मला दिसलेली आहे. त्या सर्वाचा व्यक्तीमत्तावाचे मुल्यमापन करण्याचा अधिकार मला नाही, पण त्याच्यात जे चांगले दिसले, त्यामुळे माझे आयुष्य उजळून निघाले. त्यांनी माझ्यावर कळत-नकळत जे सुसंस्कार केले, त्याप्रीत्यथ कॄतज्ञतेपोटी मी यातले काही लेख लिहिलेले आहेत … लहानशा अवकाशात, माझी त्या त्या व्यक्ती विषयीची भावना व्यक्त करण्याचा कसोशीचा प्रयत्न मी केला आहे . या सर्व व्यक्तीने माझे जीवन अधिक सुंदर, अधिक संपन्न केले, माझे व्यक्तीमत्तव घडवले - त्यांना हि आदरांजली .
-
Mi Anubhavleli America (मी अनुभवलेली अमेरिका)
अमेरिकेला जाताय? ही अमेरिका आहे तरी कशी? कसं जायचं? केव्हा पोहचायचं? नव्या नवलाईचं जग कसं न्याहाळायचं? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. पासपोर्ट,व्हिसापासून अमेरिकेत फिरण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत आपल्यासमोर प्रश्नचिन्ह असते. अशा या नवख्या अमेरिकेचं बारकाव्यासहीत इत्थंभूत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं आणि हे अनोळखी जग क्षणार्धात आपलंसं होऊन जातं.