-
How Sachin Destroyed My Life
In How Sachin Destroyed My Life, Vikram Sathaye chronicles the story of his life and how he accidently entered the world of stand-up comedy and became a cricket humorist. Moreover, he got the amazing opportunity to travel and spend time with the members of the Indian Cricket squad for more than a decade. This book presents his incredible journey as he takes us inside the dressing rooms, hotels and introduces us to the leading cricketers of India. The book comes with a foreword by Sachin Tendulkar and is replete with humor and interesting anecdotes, insights, photographs and quotes by cricketing legends like Sachin Tendulkar, Dravid, and Yuvraj Singh. This book will be thoroughly enjoyed by cricket enthusiasts. About Vikram Sathaye Vikram Sathaye is a well-known stand-up comedian and has performed in over 1200 corporate events across the world over the last 11 years. He completed his MBA from Symbiosis Institute of Business Management and worked for 7 years with companies like MTV and PMG. He got the opportunity to be part of Extra Innings on Set Max as a cricket humorist. He has been a presenter on Set Max during the World Cup in 2003 and Champions Trophy 2004. He is an entrepreneur and the Director of White Copper Entertainment Pvt. Ltd., a sports and entertainment company.
-
The Live Well Diet (द लिव्ह वेल डाएट)
'द लिव्ह वेल डाएट' ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. 'द लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी केलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनणाऱ्या या पाककृती आहेत. थोडक्यात म्हणजे आपले रोजच्याच जेवणात किंचित बदल करून आपण आपले आरोग्य किती सांभाळू शकतो हे या पाककृतींवरून लक्षात येईल.
-
Kadhitari Kothetari (कधीतरी कोठेतरी)
संगीताच्या जादूने भरलेले अद्भुतरम्य वातावरण, अप्रतिम गाणारी एक षोडशवर्षे'गानभरि' तरुणी आणि गायानिकालेवर लुब्ध असलेला एक सुसंकृत नागर तरुण………प्रेमाच्या ठराविक त्रीकोणाहून निराळा असलेला हा त्रिकोण जगाच्या पाठीवर कुठेही, केव्हाही एक निराळीच समस्या उभी करू शकतो - त्यात भर पुन्हा जादूच्या शंखाच्या प्रतापाची! संगीत, तारुण्य थोडीशी ' फनन्टासी' आणि कल्पनारम्यता, प्रेम आणि कलह किव्हा विरोध या सर्व घटकांच्या मिश्रणातून सिद्ध झालेले हे रसायन कुठलाही संदेश वैगेरे देण्याच्या भानगडीत न पडता सहजपने एक सार्वकालिक सत्य सांगून जाते. त्याला एक स्थालकालातीतातेचा, कल्पनारम्यतेचा स्पर्श आहे आणि रुचिर मनोरंजन हाच या नाटकाचा आत्मा आहे. पकिस्तानी टोळीवाल्या गायिकेच्या रेश्माच्या-कथेवरून स्फुरलेले वसंत कानेटकरांचे हे नवीन नाटक मोहक शब्दकळेने नटलेले, रसिकांना भावे असे!
-
Vadal Mansalatay (वादळ माणसाळतय)
" श्री बाबा आमटे यांच्यासारखे महान झंझावती व्यक्तिमहत्व आणि श्री वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या माणिकांचन योगातून ही नाटयकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्षाप्रमाणे वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनाही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंदी आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कुठलेही तडजोड न मानणा-या एका ध्येयधुंद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्टरोग्यला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती. हे नाटक चरित्रामक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे बाबांच्या कर्तृत्वचा समुद्र तीन अंकात आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्राय: अशक्यच. ती लेखीकाची प्रतिज्ञाच नाही ; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तिव घेऊन प्रगट होतात. भाई म्हणजे पूर्णत: बाबा नव्हेत. फुलांचे जे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पहाणारयां प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकरयांशी झुंज देतच जगातल्या सर्व बाबांना आणि भाईना आपला मार्ग काढावा लागतो. वसन्तरावांचा 'भाई ' म्हणजे एक साशात वादळ आहे राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा सुभग अर्थ त्यांचाकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो."
-
Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणे ही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृतीमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवूड वैगेरेंच्या लिंकनवरल्या नाटकाचा हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकात अनुषागाने सुचलेला एक विचार मी तुमच्या पुढे मांडतो, चरित्रात्मक नाट्य किव्हा कादंबरी लिहिणे हे एक प्रकारची कसरत अहे. मूळचि माणसे घेतली कि काल्पिताला, रचना कौशल्याला आणि संस्कार सामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मुळच्या माणसांच्या संबंधितांच्या हळव्या भवनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रा पासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवति गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्राची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कैशाल्याने केले आहे . वि. स. खांडेकर
-
Udhvastha Dharmashala (उध्वस्त धर्मशाळा)
माराठी रंगभूमीवर 'उध्वस्त धर्मशाळा' हे सर्व थौंव आगळेवेगळे असे नाटक! गो. पु देशपांडे यांनी या नाटकातून एक करारी, तत्वनिष्ठ मर्किस्ट नेत्याच्या (पराभूत थोरवीची गाथा) या नाटकातून रंगवलेली आहे. राजकारण मध्ये जी तत्व प्रणाली स्वीकारलेली आहे. ती कितीही कालबाह्य व अपयशी ठरो, तिलाच निर्धाराने चिटकून राहण्याची वृत्ती व त्यातून शेवटी निर्माण होणारी अटळ शोकांतिका स्वीकारण्याची जिद्द कुलकर्णी घराण्यात तीन पिढ्यापासुन चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीची तिची स्वतःची विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला सवंग लोकप्रीयातेसाठी तत्वशुन्य तडजोड ठावूकच नाही. राजकीय तत्वाप्रनालीची एकच धार तिन्ही पिढ्यात हस्तांतरित होईल असेहि नाही.बाप से बेटा सवाई या न्यायाने बापापेक्षा बेट्याचे तत्वज्ञान वेगळेच आढळते. स्वीकारलेल्या तत्वाशी प्रामाणिकता एवढी कणखर, कि नाटकामध्ये पित्याचा प्रचारसभा पुत्र उधळून लावीत असल्याचे उल्लेख आढळतात. राजकीय ध्यायाच्या प्राप्तीसाठी झालेल्या व प्रथापितांच्या कळपात जाऊ पाहणाऱ्या आपल्या पत्नी कडून अथवा प्रेयासिकडून अव्हेरले जाण्याची तयारीहि कुलकर्णी कुटुंबातील दोघांनी दाखवली आहे. समान राजकीय विचारसरणी च्या धाग्यांनी दोन जीव एकत्र येतात आणि त्या ध्येयाच्या मार्गात तडजोडीची अपरिहार्य वेळ आली, की हे दोन पुरुष आपल्या साथिदारणीचा कायमचा निरोप घेतात. बापाची शोकांतिका तीच मुलाची! रंगभूमीवरिल अने लोकप्रिय नाटकांच्या प्रकृती धर्माशी ह्या नाटकाचे नाते जुळणारे असूनदेखील हे नाटक विशेष यशस्वी झाले नाही; त्याचे कारण ह्या नाटकातील निकाल वैचारिकता. रंगभूमीवरिल ह्या नाटकाचे व्यावसायिक अपयश गृहीत धरूनही महाराष्ट्रच्या वैचारिक जगात खळबळ माजाविलेली आहे. निखळ वैचारिक नाटके मराठीत तशी दुर्मिळच!
-
Vegetarian Recipes From Around the World
n Vegetarian Recipes from around the World, Chef Kapoor brings favourite dishes from Mexico, Europe, the Middle East, the Far East and America to your table. Dine on Mexican Quesadillas; Middle Eastern Fattoush; Italian Roasted Tomato Farfalle, Swiss Cheese Fondue and Thai Green Curry. Wash it all down with a steaming Moroccan Mint Tea or an icy Strawberry Granita. In other words Chef Kapoor offers you the whole world on a plate! About the Author Sanjeev Kapoor is the most celebrated face of Indian cuisine today. Chef Extraordinaire, TV show host, author of nine best-selling cookbooks, restaurant consultant and winner of several culinary awards, he recently started amongst the most famous chefs of the world on Richard Quest’s show on CNN. Driven by a dream of making Indian cuisine the number one cuisine in the world, his passion drives everything he explores on national and international platforms. He hosts Khana Khazana, the longest running and highly rated cookery show on Zee TV that is being aired non-stop since 1993. The show has been awarded he Best Cookery Show by the Indian Television Academy (ITA) a record five times in a row since it’s inception. His first book Khazana of Indian Recipes published by Popular Prakashan has sold more than a million copies and is in now in it’s 12th reprint. His other books Khazana of Healthy Tasty Recipes, Khana Khazana: Celebration of Indian Cookery, Low Calorie Vegetarian Cookbook, Any Time Temptations, Best of Chinese Cooking, Simply Indian, Microwave Cooking Made Easy, and Konkan Cookbook have received rave reviews. His recently released CD ROM titled Ode to Indian Food has created ripples in the market.
-
Eka Mungiche Mahabharat (एका मुंगीचे महाभारत)
"आपलं जीवन ही एक महाभारतासारखी कथा आहे अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. मला मात्र थोडं जाणतेपण आल्यापासून माझंच नव्हे तर माझ्या आसपासचं सर्व ही एक महान कथा आहे नव्हे, तर कथासागर असं उत्कटतेनं जाणवत राहिलेलं आहे. या अनंत कथासागरावर माझ्या जीवनाच्या इवल्याशा होडक्यातून मी केलेल्या मुशाफिरीची ही कथा आहे , हा सारा कथासागर आत्मासात करण्यासाठी लागणारी प्रतिभा आणि कर्तुत्व एखाद्या व्यासाला लाभतं. मला या गोष्टी लाभलेल्या नाहीत ते उत्तरोउत्तर अधिकाअधिक जाणवत गेलेलं आहे पण असं असूनही जिद्ध मात्र बाळगली ती व्यासानं केलं तसं काही करण्याची. हे किती हास्यपद आहे हे कळण्याइतकी विनोदबुद्धी मला सुदैवान लाभली आहे. पण म्हणून ती जिद्ध काही कमी झाल नाही. म्हणून या आत्मकथेला मी 'एका मुंगीचे महाभारत' म्हटलं आहे. या मुंगीला जसा व्यासांचा संदर्भ आहे, मानवी जीवनाच्या व प्रयत्नांच्या हास्यास्पदतेचा संदर्भ आहे तसाच मर्ढेकरांच्या कवितेचाही आहे. खरं म्हणजे शेक्सपिअरपासून आयनेस्कोपर्यंत तिला अनेक वाड्मयीन संदर्भ आहे."
-
Roopavedh (रूपवेध)
मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक ‘रूपवेध’. मराठी रंगभूमी, चित्रपट, सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अंधश्रद्धानिर्मूलन अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली आहेत कधी लेखांतून, कधी भाषणांमधून तर कधी मुलाखतींमधून. डॉक्टरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या या विविधरंगी पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे लेख, भाषणे आणि पुष्पा भावे, रामदास भटकळ, निखिल वागळे, जब्बार पटेल, महेश एलकुंचवार, अतुल पेठे, सुधीर गाडगीळ, रेखा इनामदार साने, विनया खडपेकर यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी घेतलेल्या डॉक्टरांच्या मुलाखती यांचे संकलन ‘रूपवेध’ या पुस्तकात केले आहे. मोठ्या आकारातील पाचशे पानांच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी सुभाष अवचट यांची असून पुस्तकाचे आशयमूल्य आणि निर्मितीमूल्य यांकडे विशेष लक्ष पुरवणार्या ‘पॉप्युलर’च्या पुस्तकांच्या परंपरेला साजेसे हे पुस्तक आहे.