-
Ganiti (गणिती)
गणित या विषयाची भीती घालवून त्याची गोडी वाढवणारं, गणिताची मूलतत्त्वं आणि इतिहास अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकात प्राचीन संस्कृतीपासून गणिताचा वापर कसा सुरू झाला हे तर आहेच, पण त्याचबरोबर आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, युक्लिड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, रामानुजन यांच्यासारखे अनेक महान गणितज्ञ येथे भेटतील. या सगळ्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश्व उभं करतं. एवढंच नाही, तर अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-युक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावूनही सांगतं. गणिताची इनसाईट मिळवून देऊन त्याविषयी नवीन वाचण्यासाठी उद्युक्त करणारं ‘गणिती’ कुठल्याही शाखेच्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी आणि व्यावसायिक या सगळ्यांनी जरूर वाचायलाच हवं.
-
kumbhmela (कुंभमेळा)
कुंभमेळा हा भरतातील हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सोहळा आहे. देशात चार ठिकाणी भरनारया या मेळ्यास लाखो लोकांची गर्दी होत्ते. हा मेळा म्हणजे सर्वांच्याच दृष्टीने कुतूहलचा विषय आहे. तशा या मेळ्याला दोन बाजू आहेत. एक धार्मिक आणि दुसरी अधार्मिक. दुर्देवाने दुसरी बाजूच अशा मेळ्यामध्ये ठळकपणे उठून दिसते. मेळ्यात जे काही घडते त्यास धार्मिक, देव, श्रद्धा, अशी नावे दिली जातात. ज्यांना साधू म्हणावे असे खूपच थोडे लोक मेळ्यासाठी येतात. असे तपस्वी झगमगटापासून दूरही राहतात. त्यामुळे संपूर्ण मेळा संधीसाधुंच्या हातात जातो. आपणही अशाच प्रकारे सनातन्यांच्या आणि कर्मठांच्या दिंडीत सामील होणार काय, असेही प्रश्न निर्माण होतात. श्रद्धांच्या महापुरातून वाहून जाण्याऐवजी शांतपणे आणि त्तटस्थपणे या सर्वांचा वेध घेणे हेच शहाणपणाचे.
-
Savitrichya Garbhat Marlelya Leki (सावित्रीच्या गर
श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील आठ कथांचा हा थीम बेस्ड कथासंग्रह ज्वलंत प्रश्नाचे दाहक दर्शन घडवितो. स्त्रीभ्रूणहत्येची समस्या नवी नाही. वेगवेगळ्या समाजाने मुली नाहीशा कर[...]
-
Vinasayas Weight Loss (विनासायास वेट लॉस )
लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे. लठ्ठपणा हा स्वत: एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उ[...]
-
Vasudev Mulate Yanchya Nivdak Katha (वासुदेव मुलाट
डॉ. वासुदेव मुलाटे हे समकालीन लेखक. साधारणत: १९६८-१९६९ पासून मराठीमध्ये लेखकांची एक पिढी उदयाला आली. या पिढीतील बहुसंख्य लेखक असे होते की, ज्यांच्या घरात लेखनाची कोणती पर्श्वभूमी नव्हती. लेखनाचीच काय शिक्षणाचीही पर्श्वभूमी नव्हती. हे सारेच लेखक हे पहिल्या पिढीचे लेखक होते. दारिद्रयाशी आणि जीवनातल्या अनेक प्रश्नांशी झगडत झगडतच होते ते जीवनामध्ये स्थिर होत होते. किंबहुना लेखन करणे हा त्यांच्या जीवनातील सौख्याचा भाग होता सारेच लेखक तसेच तिथे व्यक्त होण्याचा अनुभव घेत होते हे त्यांचे बलस्थान होते.
-
Tavcheche Vikar Aani Ayurvedic Upay (त्वचेचे विकार
सर्व शरीरावर जे आवरण असते त्याला 'त्वचा 'असे म्हणतात. मानवी जीवनात सौंदर्याच्या दृष्टीने त्वचेला अन्यसाधारण महत्व आहे.शरीराची कांती, प्रभा शरीरावरच अवलंबून असते. सौंदर्य उठून खुलवून दिसते ते चांगल्या त्वचेमुळे. अशा त्वचेस विकार झाल्यास दिसायला असुखकारक व बरे होण्यास किचकट परंतु योग्य औषधो उपचार, आहार आणि विहार यांचे पालन केल्यास बरे होण्यास सुलभ.त्वचेचे विकार आणि आयुर्वेदिक उपाय या पुस्तकात या सर्व गोष्टींची मांडणी केली आहे.
-
Shikuyaya Anande ( शिकू या आनंदे)
आपणच शिकणारे असतो नि शिकवणारे असतो. मजा येते दोन्ही भूमिका एकदम करताना! यात आनंदही असतो. काळ बदलताना कधी सुंदर पावलांचे ठसे सापडतात, त्यावरून चालताना आपलीच वाट सापडते. शब्द औपचारिक असले तरी, अर्थाचे नवे आकाश कोणतेही असो. त्यात खूप अवकाश असतो. हा आहे शिकण्यातला अवकाश. ‘ज्ञानरचना’ ह्या वेगळ्या, कधी पूर्वीच्याच भासणार्या संकल्पनेचा घेतलेला शोध.
-
Shortcut (शॉर्टकट)
लघुपट निर्मिती बद्दल एका अनुभवी दिग्दर्शकाने दिलेल्या प्रोडक्टीव्ह टिप्स.
-
Sanskar (संस्कार)
समाज हा डाळींब्याच्या दाण्यांसारखा असतो. डाळींब फोडलं तरी सगळे दाणे सैरावैरा पळत नाहीत. कुटुंब, शासन, शिक्षण, न्याय, अर्थ अशा विविध समाजिक संस्थांनी मानवी समाज एकत्र बांधलेला असतो. यासंस्थांच्या बळकटीवरच समाजाचं अस्तिव आणि समृद्धी अवलंबून असते; आणि त्यासाठी काही संस्कार आवश्यक असतात. वैज्ञानिक संशोधनातील नेत्रदीपक कारकीर्द बाजूला ठेवून वि. गो.कुलकर्णी यांनी शिक्षण अध्यापन संशोधनाचं क्षेत्र आपुलकीन आपलंसं केलं आणि बघता बघता होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचा वटवृक्ष महाराष्ट्र सारस्वाताच्या प्रांगणात सळसळू लागला. या सा-या प्रक्रियेत 'वि. गो. उर्फ वि. जी. के.नी केलेली ही निरीक्षणं आणि काही निष्कर्ष त्यांच्या सम्यक दृष्टीचा आवाका दर्शवतातच शिवाय त्यांचं थक्क करून टाकणारं अशा - सोष्टवही दाखवतात. अत्यंत प्रगल्भ विचार त्यांच्या भाषेत वाचताना साधा, सोपा, नि आपला कधी वाटू लागतो, याचा पत्तादेखील लागत नाही. प्रत्येक घराला, शाळेला आणि किबंहुना प्रत्येक पिढीला संजीवनी देण्याची क्षमता असलेलं हे संस्कारच अमृत...