-
Devi Rakshati Rakshita (देवी रक्षति रक्षितः)
''ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चै...'' जोरजोरात मंत्रोच्चारण सुरु होते. समोरच कालीमातेची एक मोठी मूर्ती उभी होती. त्या मूर्तीकडे बघूनच भल्या भल्यांच्या हृदयाचा ठोका चुकत असेल. मूर्तीच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा दिसत होत्या. त्यातल्या फुलांच्या माळा तिला ओळखू आल्या. पण बाकीच्या माळा एवढ्या दुरून तिला ओळखू येत नव्हत्या. त्या ओळखू याव्यात अशी तिची इच्छाही नव्हती. त्या विचारानेच जणू तिला अचानक थंडी वाजू लागली. तिने ओढणीने अंग झाकून घ्यावे म्हणून हात हलवले. ओढणी शोधतानाच तिला अचानक आपल्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे जाणवले. फुलांचा येत असलेला मंद सुवास आणि अंगाला होणारा थंडगार स्पर्श फक्त फुलांच्या माळा आपल्या शरीरावर असल्याची जाणीव करून देत होत्या. भितीने, शरमेने तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. तिला इथून निघून जायचे होते. पण पायात जणू मणाच्या बेड्या होत्या. तिचे पूर्ण अंग कशालातरी जखडले होते. इथून सुटका होणे अशक्य होतेच पण अंगावर वस्त्रही नसल्याने सुटकेची छोटीशी आशा जी मनात होती ती ही मावळली होती. समोर होमकुंड धगधगत होते. एकजण देवीची जोरजोरात प्रार्थना करत होता. त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता. समोर एक रेडा बांधलेला होता. तिथे एक बलीवेदी दिसत होती. त्या रेड्याचे भवितव्य तिला क्षणार्धात कळले. त्या रेड्याला समोर आणले गेले. ते खड्ग उचलले गेले. न राहवून ती जोरात किंचाळली.. "थांबा...". देवी रक्षति रक्षित: कादंबरीचे कथानक स्वप्नातील कालीमातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या एका प्रसंगापासून सुरु होते. 'आता काय होणार?', असे वाटत असतानाच कळते की हे एक स्वप्न होते. इथेच कथेच्या नायिकेची भेट होते, ती म्हणजे शांभवी! संवादादरम्यान तिचा भाऊ अष्टमीचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थाने कथेतील गूढ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुरातत्व विभागात काम करणारी शांभवी, तिचे आईबाबा, भाऊ पार्थ, मैत्रीण जयंती, अपघातामुळे ओळख झालेला कपिल आणि शांभवीचा बॉस असलेला रूद्र या निवडक पात्रांभोवती फिरणारे हे कथानक आहे. नेमकीच पात्रे अधूनमधून भेटीला येतात आणि कादंबरीत सुटसुटीतपणा जाणवतो. अधूनमधून झलक दिसणारा 'तो' म्हणजे नक्की कोण? ,स्वप्नात दिसणारे पुसट चेहरे कोणाचे? हे प्रश्न कादंबरीच्या शेवटापर्यंत विचार करायला पुरतात. शांभवीच्या वडिलांनी केलेला खुलासा, कपिलकडून झालेला शक्तीपीठाचा उल्लेख, शांभवीच्या मनातील विचारमंथन अन् प्रश्न आणि एका अघटितातून सुरू झालेला प्रवास कथेला रंजक वळणावर घेऊन जातो. परिस्थितीने आणलेल्या एका वळणाची सुरुवात पुन्हा एकदा शक्तीपीठापासूनच होते. आईबाबांचा मृत्यू, शांभवीचे अटक वॉरंट, नाशिकला जाणे, हे सगळे पूर्वनियोजित होते की खरोखरच वेळेनुसार घडत होते? प्रवास आणि त्यात डोक्यात विचारांचे काहूर माजलेली शांभवी पाहून नकळत मनातील हळवा कोपरा जागा होतो. हळूहळू उलगडणारी शक्तीपीठे, शिव-सतीची कहाणी, इतरही पौराणिक कथा, संदर्भ, काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी, जरी आधी ऐकले वाचले असतील किंवा नसतीलही, तरी वाचकाला खिळवून ठेवतात.मठपतींच्या मंत्रातून मिळालेला मार्ग आणि दशमहाविद्यांच्या दिशेने नव्याने सुरू झालेला प्रवास वाचकाला या प्रवासासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी ठरतो. नाशिक, पाथर्डी, तुळजापूर, कोलकाता, आसाम, उमानंद द्वीप, पुरी,... अशी ठिकाणे असोत किंवा मग नवनाथ, दीन महाराज मठ, कालीमाता, भैरव, कालिका, बामाखेपा, कामाख्या, उमानंद, दशावतार, पंचायतन, दशमहाविद्या, विमला, जगन्नाथ, तारातारिणी,.. इ. असोत, प्रत्येक वेळी काहीतरी नवा उलगडा होतो. मधूनच जयंतीची शंका घ्यायला लावणारी झलक, तर मधेच शंका वाढवणारा कपिल जाणवत राहतात. रूद्र नावाचा रहस्य दडवणारा खडूस बॉस नक्की रक्षक की भक्षक? हे सर्व तर कादंबरी वाचल्यावरच समजते. शेवटाकडे आल्यावर पुन्हा एकदा तोच मंत्र पडद्यासमोर येतो आणि या रहस्यमय वातावरणावरचा पडदा दूर होतो. शेवटी फायद्याशिवाय कोणासाठी काही करणारे दुर्मीळच! त्यामुळे 'आपल्या' चेहऱ्यांमागचे कपटी चेहरे आणि रहस्यमय वागण्यामागचे 'आपले' चेहरे याचा अंदाज बांधणे कठीणच... शिवशक्तीचे मिलन आणि 'देवी रक्षति रक्षितः' शीर्षकाला साजेसा असा कादंबरीचा शेवट मनाला भिडतो. सोबतच शेवटी मात्र लेखिकेने एका नव्या अध्यायाचे धागेदोरे सोडले आहेत.
-
Avghachi Sansar (अवघाचि संसार)
डॉ. शुभा थत्ते 'क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट' आणि आमच्या आयपीएच संस्थेच्या संस्थापक विश्वस्त. मी जरी त्यांना थत्ते मॅडम म्हणत असलो तरी त्या माझ्या शिक्षक, प्रेरक, सहकारी आणि आई सुद्धा आहेत. म्हणून थत्ते मॅडम या औपचारिक वाटणाऱ्या संबोधनामागे माझ्याच नाही तर आमच्या सर्व आयपीएच कुटुंबाच्या खूप गाढ आणि जवळिकीच्या भावना आहेत. ध्येयाबद्दलची स्पष्टता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. त्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासाला मिशन म्हणून पाहिले व रुग्ण सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून 'क्लिनिकल' ही मानसशास्त्राची शाखा निवडली. मानसशास्त्राचा हा ध्यास पुढे विवेकनिष्ठ मानसशास्त्राच्या परिघामध्ये उतरला. त्यामुळे मॅडम वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांना तोंड देता देता मानसशास्त्र जगू लागल्या. स्वतःच्या अनुभवातून तावून-सुलाखून निघालेले ज्ञान त्या शिकवू लागल्या. त्यांचे मन सुदृढ, संपन्न, समृद्ध बनत गेले आणि बरोबरीने 'सुदृढ मन सर्वांसाठी' हे ध्येय वाक्य जगणारी आमची संस्था वास्तवात आली. गेल्या ३६ वर्षांमध्ये मॅडमनी मानसशास्त्राची जोड दिली कला आणि साहित्याला. त्याचबरोबर ज्येष्ठत्वावरचे संशोधन, मानसिक चाचण्यांवरचे संशोधनही संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केले. थत्ते मॅडम 'पॉझिटिव्ह सायकॉलॉजी' जगत असतात. त्यांच्या आठवणींचा पट आपल्यापुढे मांडणारे हे पुस्तक याच यात्रेतील पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यांचे हे पुस्तक 'कडू गोड आठवणींचा कोलाज' आहे असे त्या म्हणतात. मॅडमच्या वृत्ती प्रमाणे त्यांनी कडूपणा बोथट करून टाकला आहे आणि गोडी वाढवलेली आहे. नियमित चालणाऱ्या विवेकनिष्ठ मानसशास्त्राच्या वर्गामधून त्या स्वतःचे विरजलेले ज्ञान अकृत्रिमपणे इतरांना देत असतात. ध्यासपंथी चालणारी पावले यापेक्षा वेगळी काय असतात ? -- डॉ. आनंद नाडकर्णी
-
साहसकन्या (Sahas Kanya)
हिमालय आणि काराकोरम पर्वत रांगेत १४ शिखर अशी आहेत जी २६ हजार फुटांवरून अधिक उंचीवर आहेत. वातावरणातला प्राणवायू निम्म्याहून कमी झालेला असतो.अशी जीवघेणी १४ शिखरं कृत्रिम प्राणवायू शिवाय सर करणं म्हणजे वेडेपणा.अशाच जिद्दीने साहस करणाऱ्यां साहसकन्या
-
Shubharambh (शुभारंभ)
चि. स्मृती आणि चि. सृष्टी ह्या आपल्या दोन गोड नातींचे फोटो माझे प्रकाशक सौ. सुप्रिया आणि श्री. शरद मराठे यांनी दिले, यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. माझे आवडते प्रकाशक आहेत ते. स्वच्छ, सुंदर, पांढराशुभ्र कागद, मोठा फॉन्ट आणि सुबक छपाई ही श्री. मराठे यांची वैशिष्ट्ये आहे. विश्वनाथ खांदारे यांनी पुस्तकांचे सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. माझे प्रिय वाचक, त्यांच्यावर तर सारी मदार ! गोष्टी छान छान आहेत. गोड मानून घ्या प्रिय वाचकांनो. कळवा मला, आवडल्या तर ! फोन करा जरूर. --डॉ. विजयाताई वाड
-
Majhya Doghi (माझ्या दोघी)
सुखाची सोबत... सुखाची सोबत झाल्या माझ्या लेकी सौख्याचे झरे आनंदाचे वारे दुःख नकारे सुख हाकारे ऐशी आनंदाची बेकी या माझ्या लाडक्या लेकी..
-
Dhagdhagte Shejari (धगधगते शेजारी)
अफगाणिस्थानातील सगळंच राजकारण एकमेकांना जिवे मारण्याचं, 'सफाया' करण्याचं, म्हणजे सगळ्या कुटुंबालाच मारून टाकण्याचं. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणुकीत हरल्या तेव्हा गुल अमिरने, आमच्या ड्रायव्हरने, मोठ्या काळजीने विचारलं होतं की, 'आता इंदिरा गांधींचा पण 'सफाया' करतील का? सफाया केला नाही तरी त्या, त्यांची मुलंबाळं जगतील कशी? त्यांच्या उदरभरणाची सोय काय ?' त्या वेळेस त्या प्रश्नांची ऊत्तरं देताना मला अभिमान वाटला होता की, आमच्याकडे लोकशाही आहे; आमच्याकडे तुमच्यासारखी मारामारी होत नाही. 'आम्ही' आणि 'ते' हा फरक तेव्हा जाणवला होता. आज मात्र ठामपणानं तसं काही वाटते नाही. आज असं वाटत आहे की, सत्तेवर येण्यासाठी कोणी बंदुका आणि रणगाडे वापरतात तर कोणी मतं आणि पैसा यांची कोट्यवधींची गणितं मांडतात. त्यामध्ये आता गुंडगिरीची भर पडत आहे. साधनं कोणतीही असली तरी सर्वसामान्यांच्या आयुष्याची धूळधाणच होते. बंदुका, रणगाड्यांमुळे माणूस मरूनच जातो. गणितांच्यामुळे माणूस जगत राहतो; पण जीवनावरचा त्याचा विश्वास उडतो. साम, न्याय, नेकी हे दूर कुठेतरी फेकले जातात. या खेळामध्ये फक्त राजकीय सत्तेसाठी हपापलेलेच गुंतलेले असतात असे नाही; तर समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याची जबाबदारी असलेलेही आहेत. सर्वसामान्य माणूस दिशाहीन अवस्थेत, तत्काल फायद्यासाठी चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो. नाहीतर सर्वच बाबतीत उदासीन, तटस्थ होऊन जातो. हतबल होतो. सत्तासंपादनाची अमर्याद उर्मी आणि हतबलता यांची घट्ट वीण तयार होत जाते.
-
Pune Metro (पुणे मेट्रो)
गोष्ट एका मैत्रीची आणि अबोल प्रेमाची. पुणे मेट्रो या कादंबरीत दोन अनोळखी लोक मेट्रो प्रवासात एकत्र येतात. ... रोजच्या भेटीतून एकमेकांच्या जवळचे होतात. अतूट मैत्रीने बांधले जातात. मैत्रीला वयाचे बंधन नसते हे सिद्ध करतात. सोशल मीडियामुळे आज हरवलेला संवाद आणि माणसा माणसांत वाढत चाललेले अंतर रोजच्या धकाधकीच्या प्रवासातूनही माणुसकीचे सुंदर नाते कसे निर्माण करतो? हे अधोरेखित करणारी पुणे मेट्रो कादंबरी. ही कादंबरी दोन निखळ मैत्रीची आहे. दोन कुटुंबांची आहे आणि अबोल प्रेमाचीही आहे. एकीकडे निस्वार्थ प्रेम तर दुसरीकडे अबोल प्रेम यांची सुंदर गुंफण म्हणजे ही कादंबरी! कादंबरीचे नाव 'पुणे मेट्रो' असे असले तरी ही गोष्ट कोणत्याही मेट्रो शहरात घडणारी आहे. घडू शकणारी आहे. मराठी सारस्वतात वेगवेगळे प्रयोग करणा-या लेखक सुनील पांडे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून प्रथमच मेट्रोवर कादंबरी येत आहे. पानापानावर उत्कंठा, उत्सुकता आणि हुरहुर लावणारी ही कादंबरी.
-
Majhya Najaretun (माझ्या नजरेतून)
हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आपल्या अगणित आठवणी मनाच्या कप्प्यात राहून आपल्याला जगण्यासाठीची उर्मी कायम देत असतात. तेव्हा कधी कधी असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे आठवणींच गाणंच आहे की काय ! मनोज आचार्य यांचं आयुष्य केवळ आठवणींचं गाणं नव्हतं तर त्यांचं आयुष्य म्हणजे, नामवंत गीतकार, संगीतकार आणि मशहूर गायकांना आपल्या ओघवत्या लेखनशैलीत मनापासून दाद देत साजरा केलेला गाण्यांचा अनोखा उत्सवचं होता. तसंच काही सुर्हदांनी मनोज आचार्य यांच्या जागविलेल्या हृद्य आठवणी.
-
Majhya Durgabai (माझ्या दुर्गाबाई)
मा माणूस स्वतःशी सुसंगत नाही झाला तर तो कुणाशीही सुसंगत होत नाही." बाई स्वतःशी सुसंगत होत्या, तिथूनच त्यांना उर्जा मिळाली असावी. बाई एकदा मला म्हणाल्या होत्या "मला जगण्यात सुख वाटतं बघ." यामागचं कारण याबद्दल मला वाटतं बाईंना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड ओढ, कुतुहल होते. ऐन तारुण्यात ओढवलेल्या जीवावरच्या दुखण्यातून आश्चर्यकारक रीतीने त्या बऱ्या झाल्या होत्या. तेव्हा उजाडलेला प्रत्येक दिवस म्हणजे त्यांना इश्वराने दिलेली देणगी वाटला होता. प्रत्येक दिवस त्या उत्साहाने जगल्या. साडीचे काठ असोत, अचानकच आभाळात दिसणारा चंद्र त्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाची सावली असो की कुंडीतल्या मरू घातलेल्या रोपाला फुटलेलं कोवळं, नवं चिमुकलं पान असो, सगळ्याचा आनंद त्या साजरा करीत. तसेच कोणाचे वागणे बोलणे त्यांना पटले नाही तर त्या त्यांचाही खरपूस समाचार घेत.
-
Dhundi Kalyana (धुंदी कळ्यांना)
प्रा. मार्तंड औघडे यांनी 'धुंदी कळ्यांना' या जुन्या मराठी चित्रपटातील आशयघन गाण्यांचे व 'चांदणे शिंपीत जाशी' या भावगीतांवर आधारित पुस्तकातून अवीट गोडीच्या भावगीतां-चे जे परीक्षण केले आहे, खरे तर ते रसग्रहण म्हणावयास हवे ते अभ्यासपूर्ण असेच आहे. यासाठी त्यांनी ज्या अभिजात गाण्यांची निवड केली आहे ती गाणी आज पुन्हा एकदा त्यांनी या वेगळ्या उपक्रमातून नव्या पिढीसमोर ठेवली आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांनी हे रसग्रहण करताना प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा प्रसंग अतिशय साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखविला आहे. तसेच त्यातील कवीच्या मनातील भाव आणि त्यास अनुरूप दिलेल्या संगीतावरही त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. ही दोन्ही पुस्तके प्रत्येक मराठी संगीत रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
-
Chandane Shimpit Jashi (चांदणे शिंपीत जाशी)
प्रा. मार्तंड औघडे यांनी 'धुंदी कळ्यांना' या जुन्या मराठी चित्रपटातील आशयघन गाण्यांचे व 'चांदणे शिंपीत जाशी' या भावगीतांवर आधारित पुस्तकातून अवीट गोडीच्या भावगीतां-चे जे परीक्षण केले आहे, खरे तर ते रसग्रहण म्हणावयास हवे ते अभ्यासपूर्ण असेच आहे. यासाठी त्यांनी ज्या अभिजात गाण्यांची निवड केली आहे ती गाणी आज पुन्हा एकदा त्यांनी या वेगळ्या उपक्रमातून नव्या पिढीसमोर ठेवली आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांनी हे रसग्रहण करताना प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा प्रसंग अतिशय साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखविला आहे. तसेच त्यातील कवीच्या मनातील भाव आणि त्यास अनुरुप दिलेल्या संगीतावरही त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. ही दोन्ही पुस्तके प्रत्येक मराठी संगीत रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
-
Drashta (द्रष्टा)
द्रष्टा - वीणा गवाणकर दिसणाऱ्या गोष्टी बघायला शिकवणारा... विवेकाची साथ कधीही न सोडणारा... साधेपणाचा निस्सीम पुरस्कर्ता... मानवतेच्या एकात्मतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उद्गाता... मृत्यूलाही सजग मनानं अनुभवणारा... निसर्गपूजक हेन्री डेव्हिड थोरो
-
Haravlelya Karnaphulanche Rahasya (हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य)
"अनुष्काच्या हातात प्राचीन कानातल्यांची एक जोडी लागते आणि अज्जा-अज्जीसोबतचा तिचा शांत सुट्टीचा काळ आयुष्यातील सर्वात मोठ्या साहसात बदलतो. उज्जैनच्या पवित्र घाटांपासून अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत, दिल्लीच्या ऐतिहासिक गल्लीबोळांतून ते थेट लंडनपर्यंत, अनुष्का रहस्य आणि इतिहासाने उजळलेल्या धाग्याचा पाठपुरावा करते. प्रत्येक टप्प्यावर तिला प्रेम आणि विरहाच्या विस्मृतीत गेलेल्या कथा भेटतात आणि खरे खजिने फक्त सुंदर नसतात, तर जपून ठेवण्यासारख्या आठवणीही सांभाळतात, हे तिला उमजते. भारतातील लाडक्या कथाकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सांगितलेली द मॅजिक ऑफ द लॉस्ट इअरिंग्स ही एकात्मतेची, धैर्याची आणि वारशाची हृदयस्पर्शी कथा आहे, जी शेवटचे पान वाचूनही मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते."
-
Chhoti Aai (छोटी आई)
अनाथाश्रमातून प्रमिलाताई लग्न करून आप्पांच्या घरी येतात. प्रताप व गौरीची आई आजारपणात अर्ध्यावर संसार सोडून जाते, याचे दु:ख सर्व घरावर पसरलेले असते. आपल्या प्रेमळ, संस्कारी, कर्तव्यदक्ष वागण्याने प्रमिलाताई सर्वांना आपलसं करतात;पण प्रतापच्या मनात अढी असल्याने त्यांचं मन उदास असे. पण तरीही चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांनी प्रतापची कधीच गय केलेली नसते. कायम त्या मुलांच्या भविष्याचा, आजींचा, आप्पांचा विचार करतात. स्वार्थी, घरफोड्यावृत्तीच्या मामांपासून प्रमिलाताई आपल्या घराला वाचवतात. पण शेवटी मामा आजींचे दागिने लाटाळतातच. आजींना हा कावा फार उशिरा कळतो. त्या यात्रेला निघून जाणार असतात; पण प्रमिलाताई त्यांना नमस्कार करून प्रताप आजारी असल्याचं सांगतात व प्रतापकडे दवाखान्यात आणतात. प्रताप ‘छोटी आई’ची चातकासारखी वाट पाहतो. आपल्या प्रेमळ ‘छोटी आई’ ला त्याने ओळखलेलं असतं. सावत्र आई इतका जीव लावणारी असते, हे प्रतापला कळून चुकते. आप्पांनाही व्यवसायात छोटी आई मदत करते. गौरी तर ‘छोटी आई’ची लाडकीच असते. स्वत:ला मूल होऊ न देता ही ‘छोटी आई’ आप्पांचा विस्कटलेला संसार सावरते.
-
Kalokhache Themb (काळोखाचे थेंब)
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.