-
Governance For Growth In India (गव्हर्नन्स फॉर ग्र
भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं. दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.
-
Samarthyashali Leader (सामर्थ्यशाली लीडर)
कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी
-
Power Of Confidence (पॉवर ऑफ कॉन्फिडन्स)
स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी प्रत्येकजण‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी...
-
Jinkeparyant Ladha (जिंकेपर्यंत लढा)
‘‘माझा असा ठाम विश्वास आहे की, सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी लोकांना अशक्य कोटीतल्या वाटत असतात, त्या खरं तर वास्तवात उतरवता येतात. मात्र त्यासाठी अपार मेहनत करण्याची तुमची तयारी हवी. समस्यांचं तुम्ही अवडंबर माजवलं नाही तर संधी बनून त्या तुमच्यापुढे येतात.’’ ‘‘ज्या ज्या वेळी नाही किंवा नको, या नकारघंटा मला ऐकू येतात, त्या वेळी त्यांचा नाद मी माझ्यासमोरचं आव्हान समजतो.’’ याचा मला असा फायदा झाला की, 1990 मध्ये माझं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंदवलं गेलं. अन् तेही आजवरच्या इतिहासात कुणी कधी मिळवला नसेल इतका भरगच्च नफा मिळवण्यासाठी. माझे अनुभव आणि जिंकेपर्यंत लढण्यासाठी वापरलेली शस्त्रे या पुस्तकरुपाने मांडली आहेत. * निराशेच्या क्षणांवर मात * अपयश कायमस्वरूपी नसतं * धाडस म्हणजे भीतीवर विजय * समस्यांमधल्या संधी शोधा * तोट्यातील व्यवसाय त्वरित बंद करा * 6 वर्षांचा प्रकल्प 6 महिन्यांत * कधीतरी नवीन सुरुवात करावीच लागते * फजितीचे प्रसंग * अल्पसंतुष्ट राहू नका * बदलाला विरोध हा होतोच * फ्रेड ट्रम्प यांची ‘यशाची चतुःसूत्री’ * स्वतःचे गुण लोकांपुढे मांडण्याची कला * हल्ला करणार्यांना धडा शिकवा * आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाचा विचार करा * इतरांची हार, तुम्हाला संधी
-
Paisa Aani Samrudhichi Master Key (पैसा आणि समृद्ध
यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी मनाला तयार करण्याची सोपी पद्धत लेखक नेपोलियन हिल यांनी या पुस्तकात सांगितली आहे. इच्छाशक्ती, स्वयंशिस्त आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करून कोणत्याही वयाची, कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही परिस्थितीतील व्यक्ती हे सिद्धांत वापरून यशस्वी होऊ शकते. * जीवनातील खर्या 12 संपत्ती * करिअरमधील, नातेसंबंधातील आणि व्यावसायिक यश * अॅन्ड्र्यू कार्नेगी, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन यांच्या यशाची सूत्रे * सवयीच्या वैश्विक शक्तीचा सिद्धांत * कार्नेगी यांची ‘मनांची युती’ * एक पाऊल पुढे जाण्याची जादू नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. नेपोलियन हिल हे ‘थिंक अॅन्ड ग्रो रिच’, ‘कीज टू पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘52 लेसन्स फॉर लाईफ’ या सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत.
-
Neuro Linguistic Programming Part 1 (न्युरो लिंग्व
बदल घडवणं सोपं नाही हा विचारच बदल घडण्यामधील सर्वात मोठी बाधा आहे. तुम्ही जो विचार करता तो कदाचित सत्य नसेल. पण तुम्ही जो विचार करता ते सत्यात नक्कीच उतरतं. आपल्याकडे नेहमीच खालील दोन पर्याय असतात : 1. भूतकाळाचा विचार करून भविष्याला बंधनात टाकणं. किंवा 2. भूतकाळातून धडा घेऊन चांगल्या भविष्याची निर्मिती करणं. एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांच्या एनएलपी या विषयावरील 35 वर्षांच्या अभ्यासानंतर या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. हे पुस्तक एक कार्यशाळा असून या कार्यशाळेमधून आपल्याला खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे : * भीती, निराशा आणि दु:खापासून स्वातंत्र्य कसे मिळवावे * स्वसंवाद म्हणजे काय आणि तो कसा बदलायचा * मनावर ताबा कसा मिळवायचा * मान्यता कशा बदलायच्या * भूतकाळापासून मुक्ती * योग्य प्रश्नांची किमया
-
Datta Anubhuti (दत्त अनुभूति)
स्वामी कृपेने घडलेल्या 11 गिरनार वार्यांमधील चमत्कारिक अनुभव ||श्री|| सद्गुरू शरण झाल्यावर काहीही शक्य आहे. या भक्तांनी अकरा वेळा श्री. गिरनार दर्शन घेतले. - त्यांच्या श्रद्धेला माझे प्रणाम. तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याची पावती मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. भक्ती फार कसोटीला लावावी लागते. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. याचा अनुभव यांनी घेतला. पुस्तक वाचल्यावर इतरांनीही अनुकरण करावे. या सर्वांना माझ्या शुभेच्छा. अवधुतानंद (जगन्नाथ कुंटे) सोसाट्याचा वारा, रात्रीचे भयाण जंगल, काळजाला चिरणारा भयानक श्वापदांचा आवाज, अशातच गिरनार वारीचा प्रत्यक्ष अनुभव, साक्षात महाराजांच्या आदेशांनुसार 11 गिरनार वारीचा अमूल्य ठेवा, तसेच महाराजांचे अनेक अनुभव झोळीत सांभाळून आणीत अंती साक्षात दत्त महाराजांच्या परवानगीने प्रकाशित केलेले पुस्तक. ‘हम गया नहीं, जिंदा है’ची प्रचिती समस्यांची झळ लागू दिली नाही गिरनारची अविस्मरणीय वारी अघोरी शक्तीही झाली वश अजब पण गजब दर्शन स्वामींनी हट्ट पुरविला प्रचिती दिलीच
-
Swayamprerit Jeevan Kase Jagave (स्वयंप्रेरित जीवन
समृद्धी प्राप्तीचा मार्ग विचारांना दिशा देण्याची कला स्वयंप्रेरणेसाठी स्वयंसूचनांचा वापर स्वयंप्रेरणेतून संकेत कसे मिळवाल? स्वयंप्रेरणेतून मनाच्या सीमा, बंधनं ओलांडा अहंकार कसा ओळखाल आणि तो कसा दूर कराल भावना, निसर्ग आणि घटनांशी एकरूपता कशी साधाल शांत, आनंददायी, साधं-सोपं, उत्साहपूर्ण जीवन जगण्याच्या पायर्या
-
Dasha Badlaychi Asel Tar Disha Badala (दशा बदलायची
या पुस्तकात.... रेफरन्स ऑफ सक्सेस तंत्र नकारात्मकतेवर विजय मिळविण्याचे विचारांचा गोंधळ कसा कमी कराल? मनाला शांत करण्याचा हुकमी उपाय योग्य निर्णय घेण्याची कला पैसे आकर्षित का होतील? रहस्य व्यक्तिमत्त्वाचे उताविळपणाला लगाम दिशा कशी बदलाल? अजून दहा ओव्हर्स बाकी आहेत या आणि अशा अनेक छोट्या छोट्या पैलूंद्वारे जीवनाला दिशा देणारे पुस्तक
-
Mulanchi Buddhimatta Vikasit Karnyachya 21 Paddhat
कानमंत्र स्मार्ट आई-बाबांसाठी बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांनी पैलू पाडण्यासाठी मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सेल्फ स्टडीचे तंत्र मुलांची बलस्थाने ओळखा मुलांच्या बुध्दिमत्तेचा विकास इच्छाशक्तीची ताकद मुलांना क्रिएटिव्ह बनवा मुलं साहसी कशी बनतील? संस्कारित आणि सुसंस्कृत मुले मुलांच्या संपूर्ण विकासाच्या 21 पध्दती स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक 21 सवयी
-
Savayi Ghadavtat Bighdavtat (सवयी घडवतात बिघडवतात)
चांगल्या सवयी कशा लावाव्यात आणि वाईट सवयी कशा घालवाव्या How to create good habits and break bad habits. * सवयींचे प्रकार * सवयीची सुरुवात * ध्येय आणि सवय * सवयींमागील शास्त्रीय कारण * सवय बदलण्याचे हुकमी उपाय * सवयी न बदलण्यामागची कारणे * सवयी विकसित करण्याची पद्धत * प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी * चांगल्या व वाईट सवयी कशा ओळखाव्यात
-
Never Go Back (नेव्हर गो बॅक)
मिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर हा सडाफटिंग, असामान्य बुद्धीचा, ताकदवान माणूस. त्याच्यावर सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. तसंच त्याला एका प्रेमप्रकरणातही अडकवण्यात येतं. त्याला कोण आणि का गुंतवत असतं अशा आरोपांत? एका अफगाणीने दोन डेप्युटी चीफ्स ऑफ स्टाफ्सच्या मदतीने चालवलेला बेकायदा व्यापार... रीचरने या सर्वच प्रकरणांचा लावलेला छडा
-
Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)
पति-पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत. काही वेळा वाद, मतभेद, भांडण यामुळे ही चाके कुरकूर करू लागली तरी प्रेम, सामंजस्य यांचं वंगण घालून ती चाकं चालती ठेवणं महत्त्वाचं. वाद, मतभेद टोकाला जाऊ न देण्यासाठी काय करावं, याचं मार्गदर्शन करणारं, वैवाहिक नात्यात निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे परिणाम यांचा विचार करतानाच त्यावरील उपाययोजना सुचवणारं, सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र देणारं पुस्तक.
-
The Mute Anklet (द म्यूट अँक्लेट)
म्हैसूरचे संस्थानिक महाराज. उमा ही त्यांच्या मृत बहिणीची आणि वॉरेन या ब्रिटिश सैनिकाची मुलगी. म्हैसूरच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला इंग्रज सैन्यातील देखणा ब्रिटिश तरुण अॅश्टन एका नाट्यमय प्रसंगामुळे महाराजांच्या तावडीत सापडतो. ते त्याच्यासमोर उमाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. उमाच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि अॅश्टनलाही विवाहबंधनात अडकायचं नसतानाही त्यांचा विवाह होतो. अॅश्टनशी झालेला विवाह हा उमाच्या जीवनातील नावडता, तरी महत्त्वाचा अध्याय आहे. तर दुसर्या बाजूला उमाकडे असलेल्या एका वस्तूमुळे (ज्या वस्तूबद्दल ती स्वत: अनभिज्ञ आहे) तिच्यावर हल्ल्याचे, तिच्या अपहरणाचे प्रयत्न होत आहेत. उमा आणि अॅश्टनचं वैवाहिक जीवन फुलतं का, तिच्याजवळ असलेल्या वस्तूचा शोध तिला लागतो का आणि ती वस्तू कुणाला आणि का हवी असते, याचं काय रहस्य असतं? ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फुललेली एक हळुवार, रहस्यमय प्रेमकहाणी.
-
The Innocent Man (द इनोसंट मॅन)
अडा या ओक्लाहोमाच्या छोट्या गावातील रॉन विल्यमसन... बेसबॉलमध्ये उज्ज्वल भविष्य असताना दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेला, विचित्र वागणारा, आईबरोबर राहणारा एक बेरोजगार, घटस्फोटित, मानसिक विकारांनी त्रस्त तरुण.. नाइट क्लबमध्ये काम करणाऱ्या डेबी कार्टर या कॉकटेल वेट्रेसवर अमानुष बलात्कार करून तिचा खून करण्यात येतो... खुनाच्या आदल्या रात्री ग्लेन गोअर या माणसाबरोबर तिला पाहिल्याचं बNयाच साक्षीदारांनी सांगूनही रॉन विल्यमसनवर या खुनाचा आळ येतो... त्याला खुनी ठरवणारा एकमेव साक्षीदार असतो ग्लेन गोअर... रॉनचा मित्र डेनिस प्रिÂट्झ यालाही त्यात अडकवलं जातं... डेनिसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते, तर रॉनला मृत्युदंडाची...ते दोघं आपलं निरपराधित्व सिद्ध करू शकतात का याचा थरारक वेध घेणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी द इनोसन्ट मॅन
-
A Quiver Full Of Arrows (अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज)
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.
-
Kar Har Maidan Fateh (कर हर मैदान फ़तेह)
सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.
-
A Twist In The Tale (अ ट्विस्ट इन द टेल)
कार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला असतो खून?...भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो... मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो...काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा
-
The Railway Man (द रेल्वे मॅन)
मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.
-
Aagaman (आगमन)
अविचल...तंत्रविद्या कोळून प्यायलेला एक श्रीमंत तरुण...वामपंथीयांच्या तावडीत सापडलेल्यांची सुटका करण्याचं काम निरपेक्षपणे करणारा... श्रीनिवास...एका खेडेगावातील पुजाऱ्याचा तरुण मुलगा...प्रिया नावाच्या तरुण मुलीच्या माध्यमातून हंबीर नावाचा वामपंथी त्याच्यावर जाळं टाकतो...श्रीनिवास त्या जाळ्यात पुरेपूर अडकतो... अविचल त्याची त्या जाळ्यातून सुटका करतो...बाहेरची बाधा झालेल्या तनयाची बाधा उतरवायला एका गूढ वाड्यात अविचल जातो आणि तनयाच्या आजीच्या जाळ्यात सापडतो...अविचलचा मित्र भैरव आणि दत्तभक्त पाठक त्या जाळ्यातून अविचलला सोडवतात आणि अविचल तनयाच्या आजीला धडा शिकवतो...वांचूमाळ या आदिवासी माणसाबरोबर अविचल आणि त्याच्यासारखे काही तांत्रिक वांचूमाळच्या गावी पोचतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात...थरारक घटनांची रेलचेल असलेल्या उत्कंठावर्धक लघुकादंबऱ्या ‘‘वेताळाय नम:। तीव्राय नम:। तमनायकाय नम:।’’ असं म्हणत त्यांनी मद्याने भरलेल्या उलट्या वलयाच्या शंखातून धार ओतून विचमन केलं आणि जारण मंत्राच्या पठणाला त्यांनी सुरुवात केली. जारण मंत्राच्या जबर तडाख्याखाली अविचलचं मन होलपटलं. खोल भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे अविचलचं मन चोळामोळा होण्यापूर्वी त्याच्या मनात लख्ख प्रकाश पडला. तनयाचं झपाटणं म्हणजे फक्त आमिष होतं! खरं सावज तर तोच होता. त्याचं मन पूर्ण असंरक्षित आणि बेसावध असताना त्याच्यावर जारण जागवता यावं म्हणून हा सर्व खेळ काळजीपूर्वक आखला गेला होता. तनयाचं संरक्षण करताना जेव्हा त्याच्या शक्ती पूर्णपणे एका दिशेने एकवटल्या गेल्या होत्या, त्या वेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कावा भ्याडपणाचा होता यात शंकाच नव्हती! पण वाममार्गात योग्य काय आणि अयोग्य तरी काय?