-
Jagana Premacha An Maranahi ! (जगणं प्रेमाचं अन मर
प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या – ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे’ याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या – मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच ‘कुलकर्णी’ कुटुंबाचे सदस्य होते !
-
Mantra Guntavanukicha (मंत्र गुंतवणुकीचा)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
-
Steve Aani Mee (स्टीव्ह आणि मी)
मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा – केवळ मगरीशीच नव्हे, तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा – स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
-
Ya Saam Ha (या सम हा)
मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.