-
Octopussy (ऑक्टोपसी)
एम्ने थंडपणे टेबलापलीकडे दृष्टी टाकली. हे एक निष्ठुर काम असणार होतं आणि बॉंड डबल ओ सेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कामासाठी त्याची निवड झाली होती. "या लपून गोळीबार करणार्या सैनिकाला तू ठार केलंच पाहिजे, आणि तेही त्याने एजंट २७२ ला टिपण्याआधी. नीट समजलास नं ?" म्हणजे, हा चक्क खून होत तर... जेम्स बॉंड, ब्रिटिश गुप्तहेर ००७, याला आंतरराष्ट्रीय हेरगिरी करताना अशीच निर्दय कामे करावी लागत. कॅरिबियनला स्वत:बरोबर भयंकर रहस्य नेणार्या द्वाड मेजरला शोधणे असो, सोदेबीच्या लिलावाच्या दालनात फॅबर्जेच्या अंडाकृतीला गुप्तपणे बोली बोलणारा रशियन गुप्तहेर ओळखून काढणे असो, किंवा पूर्व व पश्चिम बर्लिनमधील गल्लीत लपून गोळीबार करणार्या सैनिकाने अत्यंत निर्घृणपणे एका असंभाव्य मारेकर्यावर गोळ्या झाडणं असो, बॉंड नेहमीच आपली भूमिका योग्य प्रकारे बजावतो. ००७ च्या गुप्त रिपोर्टबद्दल पूर्ण माहिती असलेल्या अधिकार्याप्रमाणे इयान फ्लेमिंग, एकमेकांविरुद्ध करण्यात येणार्या गुप्त हेरगिरीच्या क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावतो !
-
Diamonds Are Forever (डायमंड्स आर फॉरएव्हर)
टिफानी म्हणाली, "हे बघ बाँड, मला बेडमध्ये यायला राजी करण्यासाठी क्रॅबमीट रेविगोट पुरेसे नाही आणि काहीही झालं तरी बिल तू देणार असल्यामुळे मी कॅव्हियार घेणार आणि तिच्याबरोबर तुम्ही इंग्लिश लोक ज्याला कटलेट म्हणता ते आणि पिंक शँपेन." टिफानी केस - आकर्षक, सोनेरी केसांची, भेदक नजरेची, बेफिकीर वृत्तीची मुलगी, जिच्यामुळे कोणीही सहज संकटात सापडू शकेल ! हि-यांचे स्मगलिंग करणारी टोळी आणि जेम्स बाँड यांच्यामध्ये ती उभी राहिली. अफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत पसरलेल्या या टोळीत हेरगिरी करण्यासाठी बाँडने तिला वापरले. पण अमेरिकेत खुद्द तोच संकटात सापडला आणि त्याला अनपेक्षित मदत लाभली ती या टिफानीची.
-
Mehboob Khan (मेहबूब खान)
मेहबूब खान... मदर इंडिया या अजरामर चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक. अनमोल घडी, अंदाज, अमर, आन अशा अविस्मरणीय कलाकृतींची मालिका निर्माण करणारे मेहबूब. रुपेरी पडद्यावरील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चकित करणाऱ्या मेहबूब यांची जीवन कहाणी देखील तशीच थक्क करणारी. चित्रपट सृष्टीला मनाचे स्थान मिळवून देणाऱ्या, भारतीय चित्रपटांची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवणाऱ्या मेहबूब यांचा कलंदर प्रवास उलगडणारा हा रसिला ग्रंथ.
-
Aadhunik Yugat Islami Jeevanshaili (आधुनिक युगात इ
आधुनिक युगात इस्लामी जीवनशैली आजच्या काळात वेगवेगळ्या धर्मांच्या लोक, वेगवेगळ्या राष्ट्रात नांदत असताना इस्लामचे धार्मिक नियम,उपासना-आराधना पद्धती राष्ट्रनियमांच्या विरोधात न जाता कशा पाळाव्यात,त्यात कालानुरूप बदल कसे करावेत याचे मागदर्शन करणारे पुस्तक. गणित, विज्ञान, खगोलशास्त्रे, आंतरराष्ट्रीय कायदे, वैद्यकशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांची पायाभरणी इस्लामी विद्वानांनी केली आहे. इस्लामची मुलभूत तत्वे मानवतेच्या तत्वांच्या आधारावर उभी राहिली आहेत.त्यामुळे इस्लामी जीवनशैली मानवजातीकरिता आजही लाभदायक ठरू शकते, हे मनावर ठसवणारी मांडणी. इस्लाम आणि इतर धर्मातील प्रार्थना, उपासनापद्धती तत्वे यातील साम्य लक्षात आणून देणारे सहज, ओघाव्या शैलीतील विवेचन. 'उपासनानंद', 'आर्थिकानंद', 'सामाजीकानंद', 'उत्सवानंद', अशा चार विभागांतून इस्लामी जीवनाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध बाजूंना स्पर्श करणारे लेखन.
-
Narhari-Navya Yugacha Preshit (नरहरी-नव्या युगाचा
नरहरीनं अश्वत्थ वृक्षाचं एक रोपटं लावलेलं होतं. त्या रोपट्याला कुसुमनं पाणी घातलं. त्यावेळी नरहरीनं एक प्रार्थना म्हटली. "मानवते ! तू स्वतःला ओळख. या पृथ्वीचं स्वतःमध्ये रुपांतर कर. तुमच्या सद्भावनेच्या बळावर सर्व समस्यांची उकल व्हावी. या विश्वाच्या भव्य मंदिरामध्ये तुमच्या अंतःकरणातील पवित्र जाणिवेची ज्योत प्रखर तेजानं तळपू दे. सर्व शारीरिक आणि मानसिक जाणिवांचा उन्नयन होऊ दे. ही पवित्र जाणीव अंतःप्रेरणेद्वारे अतिमानस स्तरावर जाऊ दे. या उदात्त जाणीवेमधून वैश्विक कुटुंबाचा उदय होऊ दे ! ओम !"
-
Aai..(आई)
"माणूस महत्वाकांक्षी जरूर असावा,परंतु मत्सरी असता कामा नये. प्रत्येकाची यशाचे मोजमाप करण्याची फुटपट्टी वेगवेगळी असू शकते. यशाच्या प्राप्तीमुळे लाभणाऱ्या अत्युच्च सुखाच्या काल्पनिक ध्यासासाठी अनेक तरुणांची मने धावत सुटलेली असतात. मग असे यश मिळालेला दुर्दैवी माणूस वैफल्यग्रस्त होतो. प्रामाणिकपणे प्रयत्न करून हवे ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न जरूर करायला हवा, पण अपयशाचीही मनाची तयारी हवी. ध्येय गाठ्ण्यापेक्षाही जास्त आनंद व समाधान आपण करत असलेल्या प्रयत्नात लाभते."
-
Chaha-Vyasan, Pilvanuk ani Samrajya (चहा-व्यसन, पि
चहा हा भारतीय नव्हे, तर जगातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘चला चहाला’, किंवा ‘चहा घेणार?’ हे शब्द भारतात सहज ऐकू येतात, इतका चहा आपल्या अंगवळणी पडला आहे. हा चहा प्रथम चीनमधून इंग्लंडमध्ये आला. तेथून तो भारत, श्रीलंका यांसारख्या ब्रिटीश वसाहती देशांमध्ये पोचला. तेथे त्यांची लागवड इंग्रजांनी सुरु केली. त्यासाठी मिळेल त्या मार्गाने मनुष्यबळ वापरले. आपल्याकडे वापरतात त्याला ‘काळा चहा’ म्हणतात. याचा इतिहासही काळा आहे. यात गरीब, लाचार मजुरांची मळेवाल्यांकडून होणारी पिळवणूक, प्रसंगी प्राण गमविणारे कामगार अशा गोष्टींची काळी किनार चहाला आहे. चहाचा इतिहास रॉय मॉक्सहॉक यांनी शोधला व तो पुस्तकातून जगासशोर मांडला. चहाचे व्यसन, साम्राज्य याची माहिती समजते. याचा मराठी अनुवाद आनंद अभ्यंकर यांनी केला आहे. यात भारतातील चहा, त्याचा इतिहास, लागवड, तसेच शास्त्रीय माहिती आहे.
-
Don Mhatare Ani Itar Katha (दोन म्हातारे आणि इतर क
धारवाड-हुबळी-हरिहर-गदग अशा उत्तर-मध्य कर्नाटकातील परिसरात या कथा घडतात. या भागातील निसर्ग आणि संस्कृती कवेत घेतानाच या कथेतील पात्र इथल्या माणसांची मानसिकता आणि श्रद्धा उराशी कवटाळून वावरताना दिसतात. कर्नाटक साहित्य अकादमी विजेते कथालेखक श्री. माधव कुलकर्णी समाजातील विविध स्तरांचे चित्रण करताना इथल्या सांस्कृतिक समृद्धीचाही दर्शन घडवतात. इथल्या जीवनाचे सत्य रंगवताना त्यातील कलात्मकतेला आणि चित्रमयतेलाही तितकेच प्राधान्य घेताना दिसतात. अनुवादित कथांचे दालन समृद्ध करणाऱ्या या कथा उमा वि. कुलकर्णी यांच्या ओघवत्या शैलीत.
-
Aashapurnadevinchya Nivdak Katha (आशापूर्णादेवींच
आशापूर्णादेवींच्या प्रचंड कथा भांडारातून निवडलेल्या या निवडक कथांचा संग्रह . सामान्य माणसाच्या भोवतीच नेहमी आशापूर्णादेवींच्या कथा विषय असतो . सर्वसामन्यांचे जीवन ,भावाभावांना , नातीगोती ,हे सारे त्यात सहजतेने येते . ' साध्याही विषयात किती आशय मोठे सापडे ' अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.