-
Soniya Gandhi Ek Annanyasadharan Jeevanpravas ( सो
भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर सोनियांचा उदय कसा झाला आणि त्यांनी लक्षावधी भारतीयांची हृदये कशी जिंकली, याची ही मनोवेधक कहाणी. सोनियांची हि कहाणी गेल्या चार दशकांमधील कोणत्याही जागतिक पातळीवरील नेत्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या राजकीय महत्वकांक्षेपेक्षा प्राप्त परिस्थिती आणि आयुष्यात घडलेली दारूण शोकांतिका या दोन गोष्टीमुळे राजकारणाच्या मार्गावर सोनियांची वाटचाल सुरु झाली. एक परंपराप्रिय, मध्यमवर्गीय, इटालियन कुटुंबात वाढलेल्या सोनिया, केंब्रिजला येऊन इग्रंजी शिकता- शिकता राजीव गांधीच्या प्रेमात पडल्या. हे राजीव गांधी म्हणजे जवाहरलाल यांचे नातू इंदीरा गांधी यांचे सुपुत्र होते. आपल्या सासूबाई - इंदीराजी आणि पती राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सोनियांचे व्यक्ती महत्व बदलून गेले. त्या खंबीर, कणखर व ठाम विचारांनच्या बनल्या, पण त्या पूर्वीपासून अत्यंत मितभाषी होत्या आणि तशाच राहिल्या. आत्ता त्या आघाडी सरकारच्या अध्यक्ष बनल्या आणि सर्वांत मोठया लोकशाही राष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करू लागल्या आहेत. सरकारमधील वरिष्ट पदाधिकारी ( माजी आणि आत्ताचे), सोनियाचे पक्षातील सहकारी, राजकीय विरोधक आणि त्यांच्या परिवारचे निकटवर्तीय यांच्या मुलाखती आणि संशोधनामधून राणी सिंग यांनी सोनियांवर एक नवीन प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने समर्थ lekhanimadhun धीरोदत्त आणि आकर्षक व्यक्तीमहत्व असणा-या सोनियांच्या आयुष्याचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. सोनियांचे संपूर्ण जीवन आणि त्याचा वारसा याचे भारताच्या दृष्टीने काय महत्व आहे, याचेही विश्लेषण केले आहे .
-
Swabhavala Aushad Ahae (स्वभावाला औषध आहे)
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomati[...]
-
Hach Maza Marg...(हाच माझा मार्ग...)
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
-
Purvasandhya (पूर्वसंध्या)
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा 'पूर्वसंध्या' हा नवा कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनी नव्या कवितेश[...]