-
The Rainmaker (द रेनमेकर)
जॉन ग्रिशॅम हा मुळामध्ये अमेरिकेतला एक प्रथितयश असा वकील होता, आणि नंतर तो पूर्ण वेळ लेखनाकडे वळला. त्यामुळे त्याच्या सगळ्या कादंबर्या या कायदा, वकील, गुन्हेगारी यांच्याशीच संबंधित असतात. 'द रेनमेकर' ही त्याची कादंबरीही कायद्याशीच संबंधित आहे. रुडी बेलर हा अगदी पोरसवदा, कायद्याची परीक्षा नुकतीच पास झालेला एक तरूण वकील असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण कायमच असते. अत्यंत हलाखीची परिस्थिती, पाठीमागे कोणाचं आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणाचा खर्च चालूच आहे, आवक मात्र अत्यंत कमी, अशा परिस्थितीत त्याच्यावरची देणी वाढत असतात. जंग जंग पछाडूनही त्याला नोकरी मिळत नाही. कुठूनशी एक केस मिळते, पण त्याची ती क्लाएंटच इतकी गरीब असते, की तिच्याकडून फी मिळण्याचीही आशा करण्यात अर्थ नसतो. डॉट ब्लॅकनं - रुडी बेलरच्या क्लाएंटनं - एका प्रचंड मोठ्या, श्रीमंत इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असतो. डॉनी हा तिचा मुलगा ल्युकेमियामुळे मरणोन्मुख झालेला असतो. त्याच्या ल्युकेमियावर 'बोन-मॅरो ट्रान्स्प्लँट' हा इलाज असतो, पण इन्शुअरन्स कंपनीनं या ऑपरेशनचा खर्च द्यायला नकार दिल्यामुळे त्याला तो इलाज करता आलेला नसतो, आणि आता ती वेळही निघून गेलेली असते. जेमतेम लॉ स्कूल मधून बाहेर पडत असलेल्या रुडी बेलरकडे डॉट ब्लॅक ही केस घेऊन आलेली असते. आणि रुडीनं तर अजूनपर्यंत एकही केस हाताळलेली नसते. इन्शुअरन्स कंपनीच्या अत्यंत प्रसिद्ध वकिलांचा सामना करून, प्रचंड अडचणींना तोंड देऊन रुडी हा खटला चक्क जिंकतो. डॉट ब्लॅकला प्रचंड मोठी रक्कम नुकसान भरपाई मिळणार असते. आता खरं तर रुडी बेलर कोट्याधीश व्हायला हवा. तो आता चुटकीसरशी पाऊस पाडणारा 'रेनमेकर' झालेला असतो,त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असतं.पण आणि या 'पण'मुळेच तो शहर सोडून निघून जातो. ते का, हे समजायला मात्र पुस्तकच वाचायला हवं.या पुस्तकामध्ये जॉन ग्रिशॅम या मूळ लेखकानं एका वेगळ्याच पद्धतीच्या भाषेचा वापर केलाय. एक प्रकारची बोचरी, विषादपूर्ण, ज्याला 'ब्लॅक ह्यूमर' म्हणता येईल अशी ही भाषा आहे, आणि अनुवादकानंही ती मराठीत तशीच्या तशी उतरवली आहे. त्याखेरीज, मूळ लेखकानं या कादंबरीत कथाकथनासाठी जी एक खास शैली वापरली आहे, ती इंग्रजीमध्ये क्वचित वाचनात येते, पण मराठीत मात्र विशेषत: कथालेखनामध्ये ती पुष्कळ ठिकाणी आढळते. ही शैलीसुद्धा अनुवादकानं पूर्णपणे तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे पानांची संख्या मोठी असूनही हे पुस्तक वाचनीय झालं आहे. विशेषत: ज्या वाचकांना 'कोर्टरुम ड्रामा' वाचायला आवडतात, त्यांना तर हे पुस्तक फारच आवडेल.
-
Anolakh (अनोळख)
आपल्या भोवतालचे परिचित जगच परके वाटू लागल्याची भावना व्यक्त करणारी कविता "प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो", अशा ओळीने सुरु होणारी ह्या काव्यसंग्रहातील कविता "चालून आलेल्या अनेक रस्त्यांवर फुटत, सांडत, विखरत आले मी, आता परतीच्या वाटेने पुन्हा येताना शोधणे आहे फुटलेले, विखरलेले अनेक तुकडे माझे..." असे अखेरीस म्हणत आहे न् ह्यातूनच ह्या संग्रहातील कविताही व्यक्त होते आहे आणि ही कवयित्रीही ह्या दीर्घ वाटेत, "वाळूत मांडला खेळ घरकुले केली पाण्याने सारी अलगद धुवुनी नेली क्षितिजात उमटले अज्ञाताचे लेख, कुणी पुसून टाकले एकामागुन एक, स्मरणातच सारी चित्रे विरघळलेली" असे झाले आहे तरी त्याबद्दल मर्यादेपलीकडील खंत नाही कारण "कधी दिसावे, कधी हसावे, कधी लपावे, अनंत रूपांत शाश्वताचा प्रवास आहे" अशी कवियित्रीची धारणा आहे. शान्ताबाईंची 'गोंदण'च्या पुढची वाटचाल ह्या संग्रहात वाचावयास मिळते.
-
Gondan (गोंदण)
माणसामाणसांतले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधण्यात त्यांना येणारे अपयश हा शान्ताबाईंच्याचिरंतन कुतूहलाचा विषय आहे. नजरेत भरलेले एखादे दृश्य, मनात रेंगाळणारे संदर्भ, निसर्गाची विशिष्ट रुपकळा, अबोध मनातली खोल गूढ चाळवाचाळव ह्याने शान्ताबाईंच्या मनात काव्य आकार घेऊ लागायचे त्याचा प्रत्यय यावा असा हा काव्यसंग्रह आहे. मात्र "शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण, लढू बघतो आपण" म्हणणर्यांना शान्ताबाईंना त्याची जाणीव आहे की, "शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही-शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही". ठराविक वृत्तांबरोबरच त्यातून बाहेरही पडलेले शान्ताबाईंचे काव्य येथे वाचायला मिळते. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते हेही ह्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
-
Freedom At Midnight (फ्रीडम अॅट मिडनाईट)
भारतीय लेखकाने नव्हे, इंग्लीशमननेही नाही तर फ्रेंच व अमेरिकन जोडगोळीने लिहिलेली भारतीय स्वातंत्र्याची रोचक कहाणी भारतीय स्वातंत्र्याच्या संपूर्ण लढ्याचा हा इतिहास नसून हा लढा भारतीय स्वातंत्र्याकडे कसा गेला, ह्या स्वातंत्र्याचा मुहूर्त कसा ठरला, त्यासाठी काय हालचाली झाल्या, काय उलथापालथी झाल्या व त्या कोणी कशा केल्यात ह्याचा छडा लावण्याचा हा विलक्षण वाचनीय प्रयत्न केवळ ऐकीव वा लिखीत माहितीवरच आधारलेला नव्हे तर संबंधित व्यक्तींना समक्ष भेटून त्याची शहानिशा लावणारा त्या ऐतिहासिक मध्यरात्रीपर्यंतच येऊन हे लेखन थांबलेले नाहीतर ह्या लढ्यातील सर्वार्थाने एक आगळेच व्यक्तिमत्त्व ठरलेल्या महात्मा गांधीच्या अखेरीपर्यंत येऊन ते थबकलेले आहे, त्याने वाचकांना दिढमूढ करून टाकलेले आहे. अनुवादही तितकाच उत्कंठावर्धक.
-
Travelling To Infinity My Life With Stephen ()
'ब्रीफ ऑफ हिस्ट्री या अडीच कोटी प्रतींच्या विक्रीचा विक्रम केलेल्या शास्त्रीय पुस्तकाचे लेखक प्रोफेसर स्टीफन हॉकिंग. त्यांची पहेली पत्नी जेन हिने या पुस्तकांत त्यांच्या असाधारण वैवाहिक जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. स्टीफन आपल्या बुद्धिबळावर गगनाला गवसणी घालत असताना 'मोटार- न्युरॉन' या मज्जासंस्थाच्या महाभयंकर रोगाचे प्राणघातक हल्ले, मात्र त्याच्या शरीराला जखडून ठेवत होते. आपल्या विकलांग पतीची दिवस- रात्र, अष्टौप्रहर सेवा करणे आणि त्याच वेळी आपल्या वाढत्या कुटुंबाची काळजी वाहणे या दोन्ही कर्तव्यांचा समतोल राखण्यासाठी जेनने केलेले अथक परिश्रम, सोसलेले आघात यांचे तिने अतिशय प्रमाणिकपणे केलेले वर्णन; जे अशा कुटुंब अशा प्रकारच्या रोगाशी सामना करीत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्यांचे मनोबल वाढविणारे, त्यांना स्फूर्ती देणारे ठरेल. पतीची साधारण प्रज्ञा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पादाक्रांत झालेली यशशिखरे आणि त्यासाठी जेनने स्वतःच्या आंतरिक शक्तीचा दिलेला बळकट आधार यांची ही कहाणी खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. त्यातून मी अत्यंत निडर अशा प्रमाणिकपणे सांगितलेली आहे. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक जीवनाची क्लेशकारक अशा घटस्फोटात झालेली परिणती, त्याच्या सेवेतील एका नर्ससाठी स्टीफनने जेनला दिलेली जेनला दिलेली सोड चिठ्ठी आणि जेनने एका जुन्या मित्राशी केलेला विवाह - या सा-याच प्रसंगातून लेखीकाच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय येतो.
-
Shadow Man (शॅडो मॅन)
एफबीआयसाठी स्पेशल एजेंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून खून करणार्या खुनांच्या माग काढण्यात तरबेज होतो; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्या कायमचं उध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला थार मारून तिच्या चेहरयाबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केलि. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगालं संपलं होतं... आता काय करेल स्मोकी? रिव्होल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगालं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणार्या, बुध्हिमान पण विकृत मनोवृत्तिच्या 'त्या सावली' चा शोध घेउन छडा लावेल?
-
Mi Dharmikta Shikwato,Dharma Nahi! ( मी धार्मिकता
गेली सुमारे तीन-चार दशके, आपल्या अमोघ वाणीने आणि वेगळ्या विचाराने बुद्धिमंतांना मंत्रमुग्ध करणार्या ओशोंच्या निवडक बावीस व्याख्यानांचे संकलन म्हणजेच 'मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखांना व्याख्याने तरी कसे म्हणायचे? व्याख्यान आणि आख्यान ह्या दोहोंचा समन्वय साधणारा हा आगळावेगळा प्रकार आहे. मात्र एकदा पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर आपण त्या वाचनात गुंगून जातो. ओशो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. हे त्यांचे वैशिष्ठ्य ह्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते. त्यांनी इथे 'धर्म’ ह्या संकल्पनेलाच छेद दिला आहे. मात्र 'धार्मिकता’ ही संकल्पना ते मान्य करतात. अर्थात, 'धार्मिकते’चा त्यांनी लावलेला अर्थ 'योग्य, चांगलं आचरण’ असा आहे. हा अर्थही आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा वेगळाच आहे. धर्माने लोकमानसावर देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मनोनिग्रह, त्याग अशा गोष्टींचा इतका जबरदस्त पगडा बसवला आहे, की ओशोंचे विचार अशा मनाला अतिशय क्रांतिकारक वाटल्यास नवल नाही. सखोल चिंतनशीलता, प्रगाढ बुद्धिमत्ता आणि व्यापक अभ्यास असल्याशिवाय असे विचार मांडणे अशक्य आहे. अति गोड, रसाळ, प्रवाही भाषा, नर्म विनोद, चुटके सांगण्याची मोहक लकब ही ह्या लेखांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. म्हणूनच पुस्तक वाचू लागताच ओशो आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत, असे वाटत राहते आणि असा संवाद साधला गेल्यामुळे पुस्तक वाचून संपले, तरी आपण त्याच वातावरणात आणि आनंदात तरगंत राहतो.
-
Makadmeva (माकडमेवा)
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गाव-ओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढाव्यांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणीतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. हरबर्याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते, पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहाम्मत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट.