-
Sad Sagarachi – Dapoli Murud Harne Dabhol (साद सागराची-दापोली,मुरुड)
दापोली/मुरुड/कर्दे /हर्णे /आंजर्ले /केळशी /लाडघर /कोळथरे /दाभोळ
-
Yuddha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार... जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य परामर्श घेतला आहे. युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
-
San,Var Va Sanskar (सण वार व संस्कार)
मराठी महिन्यात असलेले सण, समारंभ, ते कशा पद्धतीने साजरे करावेत याची सविस्तर माहिती लेखिका डॉ सौ. अंजली जोगळेकर यांनी सण वार व संस्कार या पुस्तकात दिलेली आहे. वर्षाचे बारा महिने महिन्यातील सणांव्यतिरिक्त डोहाळजेवण, बारसे, लग्न, शांती, अंत्येष्टी, दृष्ट अशा धार्मिक संस्कारांची माहितीसुद्धा लेखिकेने दिलेली आहे.
-
Artificial Intelligence 2025 ++ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025++)
संगणक क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. त्यातील सध्याची लाट आहे एआय. ही लाट अजून काही वर्षं राज्य करेल. एआयच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी प्रगती मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये होईल. यामुळे यंत्रे अधिक स्मार्ट होतील, आणि मनुष्याच्या दृष्टीने 'स्वयंसिद्ध' कामे करू शकतील. चॅट जेनआय व चॅटबॉट्स सर्वमान्य होतील. चॅट जीपीटी, डीप सिक मुळे अनेकांना ह्याचे कुतूहल निर्माण झाले. गिबली ही पण एक नवीन लाट. आपले छायाचित्र गिबली वापरून अॅनिमेटेड रूपांतर करण्याचा धुमाकूळ सर्वत्र सुरू आहे. भविष्यात एआय वर आधारित यंत्रणा स्वतः निर्णय घेऊ शकतील. हे विविध क्षेत्रांमध्ये, जसे की वैद्यकीय निदान, उद्योग, वित्तीय क्षेत्र, आणि वाहतूक व्यवस्थापनात लागू होईल. एआयच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होतील. स्वयंचलित रोग निदान, वैद्यकीय उपचारांची अधिक अचूकता, आणि आरोग्य सेवांचे प्रभावी वितरण होईल. एआय आणि मनुष्य यांच्यातील सहकार्य वाढेल. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, आणि हे दोन्ही एकमेकांना मदत करत कार्य करतील. एआय अनेक रोजगार संपवेल; पण अनेक निर्माणपण करेल. त्यामुळे त्याला स्पर्धक न मानता साहाय्यक मानणे सयुक्तिक ठरेल.
-
Bharat Viruddha Cheen Maitri Shakya Ka Nahi (भारत विरूद्ध चीन - मैत्री का शक्य नाही?)
भारत आणि चीन या दोन देशांतील संबंधांचा सखोल आणि समग्र वेध घेणारे, सर्वांत महत्त्वाचे पुस्तक आहे. ◆ “भारत विरुद्ध चीन” हे पुस्तक खरोखरच उत्तम आहे. यात कांती बाजपेयी यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास, राजकीय व लष्करी घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे बदलत गेले याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेचन केलं आहे. एखाद्या गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून तो सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. - रामचंद्र गुहा ◆ दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढलेला असताना हे उपयुक्त पुस्तक अत्यंत योग्य वेळी आलेलं आहे. धोरणकर्ते आणि चीनबाबत अभ्यास करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. - शशी थरूर
-
Nehrunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)
घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.
-
Firangoji Narsala Hiroji Indulkar Balaji Aavaji (फिरंगोजी नरसाळा हिरोजी इंदुलकर बाळाजी आवजी)
फिरंगोजी नरसाळा हे एक चाकणचे अतिशय शूर किल्लेदार होते. त्यांनी शाहिस्तेखानाच्या वीस हजार सैन्याला अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी तब्बल छप्पन दिवस झुंजवले! त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. वास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांनी आरमारी राजधानी सिंधुदुर्ग व रायगड यांची केलेली रचना म्हणजे वास्तूकलेचा उत्तम नमुना होय. एवढे मोठे कार्य करुनही 'सेवेचे ठायी तत्पर ' एवढे जगदीश्वराच्या मंदिरावर लिहून आपली स्वामीनिष्ठा व उदारपणा त्यांनी दाखवला. शिवरायांना राजापुरात गवसलेले सर्वात अनमोल रत्न म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय. त्यांनी स्वराज्याची सेवा अतिशय निष्ठेने केली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर व पत्राचा मायना यामुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी सोडवले होते. शिवरायांनी त्यांना चिटणीसी व पालखीचा मान दिला होता.
-
Tanaji Malusare (तानाजी मालुसरे)
तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.
-
Hambirrav Mohite (हंबीरराव मोहिते)
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
-
Murarbaji Deshpande (मुरारबाजी देशपांडे)
जावळीच्या मोऱ्यांशी लढताना शत्रूसेनेतील मुरारबाजी देशपांड्यांची आवेशपूर्ण लढत पाहून महाराज इतके प्रभावित झाले की, जणू त्यांना हिराच गवसला! पुढे पुरंदरच्या लढाईत मुरारबाजींनी गाजवलेले शौर्य पाहून दिलेरखानही थक्क झाला. या लढाईत त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि अखेर ते धारातीर्थी पडले. खेडेबारेतील नऱ्हेकर देशपांड्यांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. बापूजी देशपांडे यांनी दोन वेळा सिंहगड स्वराज्यात आणून मोलाची कामगिरी केली. त्यांचे पुत्र चिमणाजी आणि बाळाजी यांनी लालमहालावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच परंपरेतील नारो देशपांडे यांचा मुलगा केसो नारायण आणि नातू नारायण देशपांडे हे आजोबा, पुत्र आणि नातू हिंदवी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या लढायांत धारातीर्थी पडले.