-
Prasang (प्रसंग)
वेगवेगळा प्रसंगाचा या कथा आहेत. यात लेखक कधी भिकारयाचे फोटो काढतो. लेखक कधी श्रीमंत माणूस होतो, तर कधी गरीब. तो कधी म्हातारा असतो तर कधी तरुण.....
-
Munni Mobile (मुन्नी मोबाईल)
बिंदू माधवची 'ती' मुन्नी मोबाईल झाली. एखादा अवखळ नदीसारखा तिचं आयुष्य, लहान झऱ्याच्या रूपाने उगम होऊन नदीत रुपांतरीत होणारा तीच जीवन पुढे अनेक खडतर खाचखळग्याचा अनुभवातून ठेचाळत वाहत असा एका अतर्क्य वाटेवर येउन धडकते कि,जिथे लौकिक,सभ्य-असभ्यतेचे क्षीतिज काळावंडून जात आणि त्या आर्त काळोखाचा डोहात मुन्नीला शोधताना माणूस आणि समाजाचा अवकाशात वाचक हरवून जातो.... सुप्रसिद्ध लेखक प्रदीप सौरभ याच्या सिद्दहस्थ लेखणीतून अवतरलेली हि साहित्यकृती मराठीत अनुवादित करून प्रा. दिनकर बोरीकरांनी मोलाचे योगदान दिले आहे...
-
Sudmruti Amba (सूडमूर्ती अंबा )
महाभारतातील अंबा प्रकरण हे सुडाचे फार बोलके उदाहरण आहे. तसे पाहिले तर अंबा हि स्त्री आहे. म्हणजेच या प्रसंगी ती उपवर कन्याच आहे. तरीही ज्या जिद्दीने भीष्माचा सूड घेण्याचा तिचा निध्रार आणि त्यानुसार तिने केलेले प्रयत्न पाहिला कि मन थक्क होते. अंबेची सुडकथा म्हणेज एका नामी स्त्रीने एकाकीपने केलेल्या अन्यायविरुद्ध दिलेला लढा आहे. भीष्माचा दरारा आणि अलोकिक पराक्रम विचारात घेता एका असहाय आणि अगतिक स्त्रीने त्याचाविरुद्ध मांडलेल्या हा संघर्ष सामन्य वाटत नाही. भीष्माविरुद्ध या अंबेचा संताप इतका प्रखर होता कि, त्याचा सूड घेणाव्यक्तीरीक्ति तिने आयुष्यात इतर कसलेच चिंतन आणि चिंता केली नाही आहे. भीष्माचा सामर्थ्यासमोर आपण किती नगण्य आहोत याची तिला यर्थाथ जाणीव होतीच. तरीही अंबा स्वस्थ बसेलेली नाही....
-
Mrutyunidra (मृत्युनिद्रा)
आणि त्या प्रेताने हालचाल केली. त्याने खाडकन डोळे उघडले. विजयची बोबडीच वळाली. प्रेताची नझर थेट विजयवर खिळली होती. ती नजर विषारी, विखारी, दाहक आणि निव्रेध होती. वटारलेले डोळ्यातील रक्तावर्णी रेषा ठळकपणे नजर भिडवन विजयचा अलम दुनियेतील कुणाचाही आवाक्याबाहेरील गोष्ट होती. प्रेताच्या नजरेतील दाहक विखार. विजयच्या अंगागात दाह उठवून गेला. ज्याअर्थी ते कोणत्याही क्षणी कोणतीही हालचाल करू शकत होतं. अशा अघोरी, भयंकर शक्तीशी लढण्याचा अनुभव विजयला नव्हता.
-
Chakravyuh (चक्रव्यूह).
चक्रव्यूह इरेना त्याच वेगाने फेकली जात होती; धुमसत होती. परिघाच्या कोणत्याही बिंदुतून निसटण्याचा पुसटसा प्रयत्नजरी केला तर राजा मानसिंग स्वताचा त्रिज्येने परिघाचा त्या बिंदुला स्पर्शत होता.या चक्रव्यूहाचा जनक राजा मानसिंग होता.तो सर्वव्यापी झाला होता. इरेनाला तिचा दोन्ही मेगीनोको या व्युहामध्ये आणून अडकवलं होतं.आफ्रिका,भारत,नायजेरिया अशा देशामधून बळी देण्याची परंपरा आहे असे इरेना ऐकून होती. बळी हि संकल्पना आता आपल्यासाठी सार्थ ठरलीय. असे इरेनाला वाटू लागल आहे. स्वत इरेनाला चक्रव्यूह भेदता येत नव्हत. मानसिंग तिला चक्रव्युहाबाहेर पडू देत येत नव्हता. इरेना बाहेरून मदत मागवू शकत नव्हती. आता आशेचा एकाचा किरण होता...
-
Chaitanycha Zara ( चैतन्याचा झरा)
पुलंनी असे म्हटले कि, आपल्या समाजाची स्थिती मोठी चमत्कारीक झाली आहे. आपल सोवळ सुटलंय आणि ओवळ सापडत नाहीये... एका वाक्यात केवढा तरी आशय! आपण विचारमग्न!…।प्रस्थापित समाजव्यस्थेला विरुद्ध करणारी पुरोगामी, परिवर्तनवादी लेखन वाचताना त्यातली तर्कसंगत भूमिका लगेचच मान्य करतो...तथापि कधी अन्य वैचारिक वाड्मय संतानी सोपा करून सांगितलेला वेन्दांत, माणसात वेद्नात,सत्भाव जागा करणारी कीर्तन,प्रवंचन ऐकताना पुन्हा संभ्रमात पडतो. 'हे खरे कि ते खरे कि ते खरे कि ते खरे!'हि काव्यपंक्ती आठवू लागते.विलास राजे याचा हा लेखसंग्रह वाचताना त्याचा युक्तिवाद,बिनतोड आहे, असच म्हणावस वाटेत.त्यांनी दिलेले साहित्यातील,पुराणातले,इतिहासातले संदर्भ खूप काही बोलतात.विलास राजे एख्यादा क्षणी तरल,हळवं आणि हृदयस्पर्शी लेखन करतात.अतिशय जमून आलेला हा लेखसंग्रह आहे. वाचक मनोमन खुश होईल.राजेच्या या वैचारिक,ललित,संदर्भसमृद्ध लेखनाची सर्वत्र उत्त्तम लेखन घेतली जाईल.या पुस्तकाचे स्वागत होईल याची खात्री वाटते.
-
Nostaljiya (नॉस्टेल्जिया)
जन्म पुण्याचा , म्हणजे खरीखुरी पुणेकर, वडिलाच्या बदलीमुळे शालेय शिक्षण सोलापूरचा सुप्रसिद्ध हरीभाई देवकरण हायस्कूल झाले. बालपणीचा आठवणी नि सोलापूर याचे नाते अतूट आहे. कॉलेज पदापर्ण केले नि पुन्हा पुणेकर झाले. कर्वे रोडवरील एम. ई. एस. कॉलेजमधून सायन्सची पदवी घेतलि. आनंद पाटणकर चाळीस वर्षापूर्वी लग्न झाले नी मी पक्की पुणेकर झाले. माझ्या कथालेखांची सुरुवात साधारणपणे १९८४-८५ च्या सुमारास झाली. आवाज, मेनका , जत्रा, माहेर, प्रपंच , लोकमत दिवाळी अंकातून माझ्या कथा प्रसिद्ध झाला आहेत. मुलगा-सून, नातू, मुलगी-जावई,दोन नाती असा माझा छोटासा परिवार अहे.दिड वर्षापूर्वी आनंद पाटणकर एकटेपणा घालवीण्यासाठी पेटिंग , बागकाम , लेखन यात मन रमविण्याचा प्रयत्न करीत आहे. सावलीशिवाय जगण खूप कटीण आहे, पण माझे छद मला सावलीसारखी साथ देत ahet.
-
Yashobudha (यशोबुद्ध)
मानव पुथ्वीवर जन्म घेतो, काही वर्ष जगतो,पृथ्वीवर वास घेतो आणि त्याचा काळ संपला. शरीराची मात्र शिथल झाली. जीर्ण झाली कि मृत्यूला सामोरा जातो. शरण जातो. कधी आनंदाने, कधी दुखाने. पण हे सत्य स्वीकारणाशिवाय त्याचा हातात काहीच नसता. मानव हा पृथ्वीवरचा काही काळ वास करणारा एक पाहुणाचा आहे! मग याविषयी आनंद मानायचा कि दुख? अशा या अनियमित क्षणभंगुर अशा गोष्टीने आनंद मानणे म्हणजे स्वताची फसवणूक करणासारखे नव्हे काय? यशोधरे, मी आता चिरस्थायी आनंदाचा शोध घेणार आहे. मला कायमस्वरूपी आराम हवा आहे
-
Kathakumb (कथाकुंभ)
'चैतन्याला जपण्यापेक्षा त्याला फुलवायला हवं देवत्वाला पुजण्यापेक्षा त्याला शोधायला हवं' असं म्हणणारे विलास राजे…परिवर्तनवादी विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग कथेचा माध्यमातून, शब्दचित्रांतून ते सादर करतात, आणि वाचकाला आपलंसं करतात …. प्रस्तुतचा 'कथाकुंभ' हा विलास राजेंचा पहिलावहिला कथासंग्रह तो वाचताना वाचकाला लेखकाचा रुपात प्रगल्भ, जाणता सारस्वत भेटतो… त्याच वेळी त्याचं हे पहिलंच पाऊल आहे , याचीही काही ठिकाणी जाणीव होते. या लेखकाच पर्दापण मात्र दमदार आहे… चांगली कथा कोणती? जी वाचकाचा मनाला स्पर्श करते, त्याच्या हृदयाशी संवाद साधते. त्याचा पूर्वस्मृती ताज्या करते…. कधी निखळ , मनोरंजन करते. हसवते. वाचकाची दोन घटका करमणूक करते….तर कधी कथेचा माध्यमातून जीवनमुल्याचा सूचकतेने, कलात्मकतेने पुरस्कार करते… विलास राजे म्हटल्याप्रमाणे 'या कथा हसवतील, चिमटे काढतील, तर कधी अंतमुर्खही व्हायाला लागतील.' प्रस्तुत संग्रहात अनेक कथा अशा आहेत कि, त्या सत्यकथा वाटाव्यात, अस्सल वाटाव्यात…. अशा नमुनेदार व्यक्तिरेखा, या कथातून समोर येतात कि वाचक त्यांना विसरणार नाही; प्रतिकूलतेवर स्वार होणाऱ्या झुंजार, लढाऊ! तर कधी अत्यंत सोशीक, प्रांजळ! उदार मनाच्या! दुसऱ्याचा दुख वाटून घेणाऱ्या… आशावादी, प्रयत्नवादी! प्रस्तुत संग्रहातली काही पात्र, म्हणूनच मस्त आहेत.ती कुणी तत्वज्ञ नाहीत.भाष्यकार नाहीत;पण त्याचा वागण्या- बोलण्यातून शहाणपणाच्या चार गोष्टी ती सांगतात… आपण लेखकाला धन्यवाद देतो.शुभेच्छा देतो.
-
Trupt Maifal (तृप्त मैफल)
वेळोवेळी, काही ना काही निमित्ताने मी केलेले विविध व्यक्तीविषयीचा लिखाण या संग्राहात एकत्रित केलेले आहे. त्याचाविषयीचा पहिला आणि कायम झालेले संस्कार या लेखामध्ये आहे. 'संस्कार' हा शब्द वापरण्याला आणखी एक कारण आहे . यातल्या व्यक्ती नामवंत आहेत , त्याचे एकूण संस्कृतीलाच झालेले योगदान उघड आहे . परंतु ज्या व्यक्ती त्याचा इतका ख्यातनाम नाहीत, त्याचाही स्वभावाची अलोकिक बाजू मला दिसलेली आहे. त्या सर्वाचा व्यक्तीमत्तावाचे मुल्यमापन करण्याचा अधिकार मला नाही, पण त्याच्यात जे चांगले दिसले, त्यामुळे माझे आयुष्य उजळून निघाले. त्यांनी माझ्यावर कळत-नकळत जे सुसंस्कार केले, त्याप्रीत्यथ कॄतज्ञतेपोटी मी यातले काही लेख लिहिलेले आहेत … लहानशा अवकाशात, माझी त्या त्या व्यक्ती विषयीची भावना व्यक्त करण्याचा कसोशीचा प्रयत्न मी केला आहे . या सर्व व्यक्तीने माझे जीवन अधिक सुंदर, अधिक संपन्न केले, माझे व्यक्तीमत्तव घडवले - त्यांना हि आदरांजली .
-
Culture Shock Japan (कल्चर शाॅक - जपान)
आपल्या सर्वामध्ये हे असं लहानग मूल कायम दडलेलं असत. एखादा अनपेक्षित अनुभव आला कि ते डोळे विस्फारत. एखादा परक्या भूमीवर पाय ठेवला कि सुरुवातीचा काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच. 'जपानला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडेच अनुभव कसे असतील? जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कशा नजरेन बघतील ? त्याचा अति काटेखोरपनाशी आणि यात्रिक शिस्तशी मला जुळवून घेत येईल का? तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतील का ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमचा सोबतीला असेल आधार देणार, हलक्या - फुलक्या प्रसंगा मधून जपानी संस्कृतीमधील बारकावे उलगडणार हे पुस्तक. त्याचा स्मितहास्याचा मुखवट्या आड दडलेला संस्कृतीला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : जपान'
-
Culture Shock Aakhati (कल्चर शाॅक-आखाती)
आपल्या सर्वामध्ये हे असं लहानग मूल कायम दडलेलं असत. एखादा अनपेक्षित अनुभव आला कि ते डोळे विस्फारत. एखादा परक्या भूमीवर पाय ठेवला कि सुरुवातीचा काळात तर आपले डोळे सदेव विस्फारलेलेच. 'आखाती देशात जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडेच अनुभव कसे असतील? तिथला कट्टर संस्कृतीशी अन कठोर कायद्याशी मला जुळवून घेत येईल ना? अरब व्यक्तीशी मी कस वागायला हवं? ते लोक माझाकडे कसे बघतील?' असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमचा सोबतीला असेल आधार देणार, हलक्या - फुलक्या प्रसंगा मधून अरब संस्कृतीमधील बारकावे उलगडणार हे पुस्तक. त्याचा स्मितहास्याचा बुराकाआड दडलेला संस्कृतीला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : आखाती देश'
-
Culture Shock Jermani (कल्चर शाॅक-जर्मनी)
आपल्या सर्वामध्ये हे असं लहानग मूल कायम दडलेलं असत. एखादा अनपेक्षित अनुभव आला कि ते डोळे विस्फारत. एखादा परक्या भूमीवर पाय ठेवला कि सुरुवातीचा काळात तर आपले डोळे सदेव विस्फारलेलेच. 'जर्मनीला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडेच अनुभव कसे असतील? जपानी भाषेशिवाय तिकडे माझं कितपत अडेल ? तिकडचा त्या थंडगार हवामानाशी आणि वृतीशी मला जुळवून घेता येईल का? जर्मन लोकाशी मी कस वागायला हवं? लोक माझ्याकडे कशा नजरेन बघतील ?' असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमचा सोबतीला असेल आधार देणार, हलक्या - फुलक्या प्रसंगामधून जपानी संस्कृतीमधील बारकावे उलगडणार हे पुस्तक.कठोर शिस्तीचा मुखवट्याआड दडलेला जर्मन संस्कृतीला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : जर्मनी'
-
Arpanpatrikantoon G.A.Darshan (अर्पणपत्रिकांतून जी
जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे , परिसर ,कथानक आले तरी कोठून ? जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वी. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !
-
Rang Sukhache (रंग सुखाचे)
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे'' ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
-
Tirthatan (तीर्थाटन)
एकीकडे डोंगर ,दुसरीकडे दर्या ,एकीकडे जंगल -समुद्र तर दुसरीकडे मैलोनमैल पसरलेलं वाळवांट... भैगोलिक विविधतेबरोबरच भारताला आणखी एक वरदान लाभलं आणि ते म्हणजे सर्वाधर्मासमभावाच धार्मिक वैविध्याच त्यामुळेच हा देश मंदिरांसाठी जसा ओळखला जातो.तसाच मासिदिंसाठीसुध्द जातो इथली चर्चेस जशी पर्यटकांना खुणावतात तसेच इथले स्तूप,अग्यारी, ,सिनेगॉग्स आदीही आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात भारताच्या या सांस्कृतिक संचिताची हि धावती सफर याचं आणखी एक वेगळे पण म्हणजे मातृभाषा तमिल असलेल्या आणि फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असलेल्या उषा हर्डीकर यांनी घडवलीय... अगदी परीपूर्णतेचा ध्यास घेऊन हा ठेवा आपल्या हाती ठेवलाय
-
Lokshahichi Aishi Taishi (लोकशाहीची ऐशी तैशी )
देशसेवेच्या,समाजसेवेच्या नावाखाली काही स्वार्थी आणि बेमुर्वत राजकारणी आपले अस्तित्व अबाधित राहावे म्हणून गुन्हेगारी वृतीच्या व्यक्तींशी हातमिळवणी करून त्यांच्याशी युती करतात ;आणि तिथेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरु होते .त्या साऱ्या वातावरणाला अधिक पुष्ट करणारे , पोलीस ,कोर्ट, कायदा धाब्यावर कसा बसवायचा याची जाण असलेले आणि अक्षरश :प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे ,त्यांचे राजकीय सल्लागार ,धूर्त पत्रकार, नेत्याच्या आजूबाजूला असणारे खुशमस्करे यांच्यामुळे वाढत जाणारे राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा साराच सध्या चिंतेचा विषय बनला आहे . कारण त्यामुळे सचोटीचे राजकारण आणि प्रशासन हळूहळू दुर्मिला होत चालले आहे हे भेदक वास्तव मांडणारी हि कादंबरी अक्षरश :खिळवून ठेवणारी....