-
Puja (पूजा)
मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींचे नातेसंबंध, त्यांचे रितिरिवाज, आणि त्यांचे दैनंदिन जीवन यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब आशा बगे यांच्या कथांतून नेहमीच प्रत्ययास येते. ह्या कुटुंबातील वृद्ध माणसे, तरुण-तरुणी, कोवळी मुले- कोणी विद्यार्थी, कोणी गायक, कोणी आश्रित, कोणी दृष्टिहीन- या सर्वांच्या दैनंदिन जीवनातल्या छोट्यामोठ्या घटनांचे चित्रीकरण प्रस्तुतच्या ‘पूजा’ या कथासंग्रहातून प्रत्ययकारी रित्या आले आहे. छोट्या शहरांमधले शांत वातावरण, लहान-मोठ्या पात्रांची मानसिक आंदोलने, छोट्या-मोठ्या संवादांमधून आणि अल्पाक्षरी वर्णनांमधून डोळ्यांसमोर उभी राहणारी त्यांची व्यक्तिचित्रे... या प्रस्तुतच्या दीर्घकथा संग्रहातील सर्वच गोष्टी वाचकांना एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातात.
-
Mother Teresa (मदर टेरेसा प्रतिमेच्या पलिकडे)
विसाव्या शतकातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच मदर टेरेसांचा उल्लेख करावा लागेल. जे मनात येत गेले ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडले. ही 'इंट्युईशन' किंवा एका अर्थाने मनस्वीपणा, इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी व्यक्ती किती मोठी होती याचे उत्तम उदाहरण मदर टेरेसा. ऍना सेबा या मूळच्या ज्यू लेखिकेने मदरच्या जीवनाचा किंवा चरित्राचा आढावा ज्या पद्धतीने व ज्या कोनांमधून घेतला तो आवाका बघून आपण थक्क होतो. त्यासाठी किती परिश्रम त्यांनी घेतले ते या पुस्तकात ठिकठिकाणी जाणवेल. एका अत्यंत श्रेष्ठ चरित्र-नायिकेला एका असामान्य चरित्र-कर्तीने केलेला मानाचा मुजरा असेच या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
-
Arab Jag (अरब जग)
युद्ध आणि क्रांती या गोष्टी समाजाला ढवळून काढणाऱ्या असतात. त्यांचे परिणाम अल्पकालीन नि दीर्घकालीन असतात. त्यात भाग घेणाऱ्या लोकांनाच त्याचे चटके बसतात असे नाही, तर रणांगणापासून दूर असणाऱ्या लोकांनाही त्याचे चटके बसतात. जे युद्धाचे परिणाम तेच क्रांतीचेही होतात. सहा अरब जगातल्या क्रांत्यांचे चित्र हेच दाखवून देत होते. इस्लामी जगात प्रस्फोट घडविणारे काय विचार प्रवाह आहेत, त्या प्रस्फोटांची मूळे कुठे आहेत, अरब तरुण जगाच्या काय आकांशा आहेत. शिवाय अरब जगातील क्रांतिकारक घटनांची ताजी, सत्य, रंजक नि विस्मयकारक माहिती मराठी वाचकाला मिळावी, या हेतूने सदर ग्रंथाची निर्मिती केली. त्याचे निश्चित स्वागत करतील