-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर
-
Amrutahuni God (अमृताहुनि गोड)
संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण चरित्र कादंबरी स्वरुपात
-
Lankecha Sangram (लंकेचा संग्राम)
लंका जळेल, अंधःकार व्यापेल. पण प्रकाश टिकू शकेल? भारत, खिपू ३४०० वखवख. राग. दुःख. धुमसते निखारे, युद्धाची ठिणगी पेटवण्यासाठी अधीर पण हे युद्ध वेगळे आहे. हे धर्मासाठी आहे. सर्वश्रेष्ठ देवीसाठी हे युद्ध आहे. सीतेचे अपहरण झालेले आहे. निडरपणे ती रावणाला तिला ठार मारण्याचं आव्हान देते - रामाला शरण यायला लावण्यापेक्षा ती मरण पत्करेल. दुःखाने आणि क्रोधाने राम वेडापिसा झाला आहे. तो युद्धाच्या तयारीत आहे. संताप हे त्याचे इंधन आहे. एकाग्रचित्तता हे त्याचे सुकाणू आहे. आपण अजिंक्य आहोत अशी रावणाची समजूत होती. आपण वाटाघाटी करून शरणागती घडवून आणू असा त्याचा विचार होता. त्याला माहीत नव्हतं... भारतीय प्रकाशन विश्वातील सर्वात वेगवान खपाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मालिकेतील -राम चंद्र मालिकेतील पहिली तीन पुस्तके राम, सीता आणि रावण यांच्या वैयक्तिक प्रवासाचा शोध घेतात. या विशेष चौथ्या पुस्तकात, त्यांच्या कथांचे धागे एकमेकांवर आदळतात आणि स्फोट होतो एका नृशंस संग्रामाचा. धर्मनियमांनी बांधलेला राम निर्दय, क्रूर रावणाचा पराभव करेल? लंका भस्मसात होईल, की कॉडलेल्या वाघासारखी पलटून तुटून पडेल? विजयासाठी युद्धाची भयानक किंमत मोजावीच लागेल का? सर्वात महत्त्वाचे, विष्णूचे उत्थान होईल? आणि या भूमीच्या खऱ्या शत्रूंना विष्णूचे भय वाटेल? कारण भीतीपोटीच प्रेम जन्म घेते. "अमीश भारताचा सर्वात मोठा साहित्यिक रॉकस्टार आहे.' - शेखर कपूर
-
Cosmos (कॉसमॉस)
कुतूहलजनके, कल्पक, वाचनीय, विविधांगी... न्यू यॉर्क टाइम्स विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील. काय आहे यात : - जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन - इजिप्ती चित्रलिपी - मानवी मेंदू - पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ सूर्याचा अंत - तारामंडळांचा विकास
-
Tisara Stambha (तिसरा स्तंभ)
सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, 'वैश्विक नैतिकतेची कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे.' छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे आपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तर बदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यता यांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवर आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यात आकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकार देत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणि शांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडला पाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.
-
Mrutyukatha (मृत्यूकथा)
‘मृत्यू कथा’ हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात. यातील निवेदकाचे पात्र उगाच घुसडलेले कधीच वाटत नाही. उलट त्याच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे त्याची उपस्थिती वाचकाला विश्वासार्ह वाटते आणि त्याच्यातील साहित्यगुणांमुळे तर तो प्रशंसनीयच ठरतो.
-
How We Got to Now (हाऊ वी गॉट टू नाऊ)
हाऊ वी गॉट टू नाऊ या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे. अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
-
Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
-
Baluchya Avasthantarachi Diary (बाळूच्या अवस्थांतर
भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते- आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते. प्रोफेसर भांगरे, त्यांची आई, बायको आणि 3 मुली यांची गोष्ट म्हणजे ही कादंबरी. भांगरे यांच्या वर्तमान काळामध्ये काही गोष्टी घडत आहेत. त्यांना वाटत की भूतकाळा मध्ये पण अशा गोष्टी घडल्या आहेत आणि त्याची मुळे वर्तमान काळामध्ये रुजली गेलेली आहेत. मुली ,त्यांची प्रेम प्रकरण, लग्न आणि त्यांचा सामाजिक प्रभाव, जातिव्यवस्था, मध्यमवर्गीय माणूस आणि समाजाला घाबरून जाऊन तो करत असलेला विचार म्हणजे ही कादंबरी. रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांची खास बात म्हणजे त्याची शीर्षक आणि पूर्ण पान भरून असणार एकच वाक्य. तरीही ही वाक्यं कुठे कंटाळवाणी अजिबात होत नाहीत.
-
Akherche Shiledar (अखेरचे शिलेदार)
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?' त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र् नव्हतं. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरुच राहिला.
-
Ambedkar Jivan Ani Varsa (आंबेडकर जीवन आणि वारसा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). 'डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,' असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे.
-
Mi Gita Aahe (मी गीता आहे)
भगवद्गीतेच्या सायकोलॉजीवर एक अभूतपूर्व व्याख्या युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन कृष्णांना सांगतो, राज्य मिळवण्यासाठी ना मला भावांना मारायचे आहे, ना हिंसा करायची आहे. शिवाय, धर्मशास्त्रदेखील याची अनुमती देत नाही. तुम्ही अर्जुनाच्या विचारांशी सहमत आहात का? तर मग कृष्ण अर्जुनाच्या विचारांशी सहमत का झाले नाही? कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले की त्याला योग्य मार्ग दाखवला? युद्ध आणि हिंसा करण्यामागेही सबळ कारणं असू शकतात का? कोण बरोबर आहे? कृष्ण की अर्जुन? कृष्णांना गीता अठराव्या अध्यायांपर्यंत का सांगावी लागली? जसं गीता एक, प्रश्न अनेक आहेत... तसंच जीवनही एक आहे, प्रश्न अनेक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं गीताच देऊ शकते. कारण कृष्ण हे मनुष्यजातीचे पहिले ‘सायकोलॉजिस्ट’ आहेत, तसेच ‘स्पिरिच्युअल सायकोलॉजी’च मन व जीवनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकते. पण गीतेच्या सायकोलॉजिकल बाजू नेहमीच दुर्लक्षित केल्या गेल्या. मी गीता आहे, भगवद्गीतेची पहिली अशी व्याख्या आहे जी समस्त 700 श्लोकांचे ना केवळ ‘स्पिरिच्युअल’ तर संपूर्ण ‘सायकोलॉजिकल’ सार समजावते. यातून आपण गीतेचं सार एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून कृष्ण आणि अर्जुन यांच्याकडून ‘लाइव्ह’ समजून घेत आहोत असं वाटतं. दीप त्रिवेदी हे “मैं कृष्ण हूं”, “मी मन आहे” तसंच “सर्वकाही सायकोलॉजी आहे” बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक, गीतेवर 168 तास प्रदीर्घ वर्कशॉप्स घेणारे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आहेत. भगवद्गीतेची सायकोलॉजीवर केलेल्या कार्यांसाठी ‘ऑनरेरी डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित आहेत.