-
Charlatans (शार्लटन्स)
बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन मृत्यू...तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.
-
The Monkeys Raincoat (द मंकीज रेनकोट)
जेव्हा एलन लँग एल्विस कोलच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा दोघेही बेपत्ता असतात. वरकरणी पाहता हे प्रकरण साधे वाटत असले तरी एल्विस कोल किंवा त्याचा ताकदवान सहकारी ज्यो पाईक यांना त्यात फार काही रोमांचक किंवा आव्हानात्मक वाटत नाही. पण हॉलिवूडच्या स्टुडिओपासून सुरू झालेले हे शोध प्रकरण त्यांना अमली पदार्थ आणि लैंगिकता आणि खुनापर्यंत घेऊन जाते. आता हे प्रकरण नुसतेच रोमांचकारी, आव्हानात्मक नसते तर घाणेरडेदेखील होते. कारण पोलिसांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांनीच एलन आणि एल्विस यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही एल्विस अखेरच्या दुव्यापर्यंत पोहचतोच, पण तो उत्कंठावर्धक प्रवास हे पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.
-
Auchwitz Cha Photowala (ऑशविट्झचा फोटोवाला)
"जर्मनीतील सामूहिक हत्याकांडाच्या केंद्रस्थानी घडणारी ही धाडसी आणि आशावादी कथा आहे. जर्मनीने १९३९ मध्ये पोलंड वर विजय मिळवला. तेव्हा विलहेम ब्रेस याला हिटलर गोटात सामील होण्याचा आदेश करण्यात आला. त्याने तो नाकारला. मग त्यानंतर राजकीय कैदी नंबर ३४४४ म्हणून त्याला अशविट्झच्या छळछावणीत पाठवण्यात आले. शुट्झशाफेलनी त्याला छावणीतील आतील कामाचा लेखाजोखा मांडण्याचे काम दिले. छावणीत येणाऱ्या कैद्यांचे फोटो घेण्यापासून त्याने कामाला सुरवात केली आणि कालांतराने जोसेफ मेंगल यांनी गुन्हेगारांवर केलेले वैद्यकीय प्रयोग आणि प्रत्यक्ष कैद्यांच्या कित्येक फाशी नोंदवण्यापर्यंत त्याने काम केले. १९४० ते १९४५ दरम्यान, ब्रेसने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांचे ५०,००० फोटो घेतले. तसे फोटो काढत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. पुढे पुढे त्या कॅमेराच्या मागे लपून राहणे ब्रेसच्या विवेक बुद्धीला पटेना. सुरवातीला तो छावणीतील रहिवासी चळवळीत सहभागी झाला. कैद्यांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या छावण्यांमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला कळावे म्हणून आटले फोटो बाहेर पाठवणे अशा गोष्टी तो या चळवळीतून करू लागला. नंतर शेवटी सोव्हिएत सैनिक आले तेव्हा शुट्झशाफेलनी ब्रेसला ते फोटोग्राफ नष्ट करण्याचे आदेश दिले. ते आदेश नाकारत ब्रेस म्हणाला, `कारण ,जगाला हे कळलं पाहिजे`. "
-
Smruti ganga ( स्मृतिगंगा)
भा.द.खेरांना त्यांऱ्याजीवनात अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांपैकी काहींना लेखरूपात गुंफायचं काम त्यांनी केलं. सावरकरांऱ्याबचावासाठी उभे राहिलेले धर्मवीर भोपटकर...भा.द.खेरांना ‘केसरी’द्वारे प्रगतिपथावर नेणारे जयंतराव टिळक...‘हसरे दु:ख’ या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पत्ररूपाने देणारे पु.ल.देशपांडे...न्याय क्षेत्रातील उच्च पदं भूषवणारे खेरांचे शाळासोबती दादा देशमुख... ‘शेवग्याऱ्याशेंगा’ लिहिणारे य.गो. जोशी...पावसचे स्वामी स्वरूपानंद...सुनील गावस्कर...लंडनमधील भवानी तलवार, कोहिनूर हिरा आणि नटराजाऱ्यामूर्तीसाठी लढणारे बॅरिस्टर भास्करराव घोरपडे...विनम्र कवी/गीतकार गंगाधर महांबरे...प्रतिकूल परिस्थितीतही ‘रोहिणी मासिक सुरू ठेवणारे वसंतराव काणे...खेरांवर मनापासून प्रेम करणारे त्यांचे चुलतबंधू नानासाहेब...या सगऱ्याव्यक्तिचित्रांसह भा. द. खेरांनी ‘केसरी’तील दिवसांऱ्याआठवणी जागवऱ्याआहेत. वाचकांना स्नेहधारांमध्ये न्हाऊ घालणारी ही ‘स्मृतिगंगा’ आहे.
-
Rumi Anandghan (रुमी आनंदघन)
प्रेमाच्या तत्त्वज्ञानाला हळव्या भावनिक नजाकतीचा साज चढवणारा कवी म्हणजे रुमी. या रुमीभोवतीच फिरणारं हे कथानक. नायक स्वप्नात येशूला भेटतो आणि त्याचं आयुष्य पालटून जातं. येशू त्याला आपण गेलेल्या अखेरच्या रस्त्यावरून जाण्यास सांगतो. या दृष्टांतानंतर नायक इटलीवरून थेट जेरुसलेमचा रस्ता पकडतो. तो ही पायी. पण त्याच्या या आध्यात्मिक प्रवासाची वळणवाट वेगळ्याच उत्कंठावर्धक घटनांनी व्यापलेली ठरते. या प्रवासात अचानकच नायकाला रुमीची ओढ लागते. रुमीच्या या शोधप्रवासात जीवनविषयक तत्त्वज्ञानाचं भांडार खुलं होत जातं. आणि हा प्रवास अलौकिकाच्या नव्या वळणावर पोहचते.
-
Sur Bharala Antari (सुर भरला अंतरी )
लेखक-पत्रकार भा.द.खेर यांनी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन, भीमसेन जोशी, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर, जे.एल.रानडे, शंकरराव बिनीवाले, गजाननराव वाटवे, इ.जुन्या-जाणऱ्याकलावंतांची नजाकतभरी वैÂफियत मांडून त्यांचे थोरपण सांगितलं आहे. तसेच हे श्रेष्ठ कलावंत कसे दिलदार होते याचे मार्मिक किस्सेही या पुस्तकातून वाचायला मिळतात. कलाकारांतही राग-लोभ,वाद-विवाद अबोला होतो.; पण तरीही कलेवर त्याचा परिणाम होऊ न देता कलाकार कलेविषयीचं आपलं योगदान रसिकांना भरभरून देतात. कलावंताचं मन कायम सरस्वतीच्या, उत्तुंग प्रतिभेने भारावलेले असतं; अनंत दु:ख-यातना सहन करून, आर्थिक झळ सोसूनही कुठलाही सच्चा कलावंत आपली कला मुक्तहस्ते उधळत असतो, हेही सूत्र या लेखांतून जाणवतं. सर्वच कलाकारांऱ्याकलेचं आणि या व्यक्ती आपऱ्याजीवनात माणूस म्हणून किती श्रेष्ठ होत्या, याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
-
Amar Hruday (अमर हृदय)
‘अमर हृदय’ (इमॉर्टल हार्ट) या सरदार ओस्कान यांच्या पुस्तकातून अंतरंगातील प्रेमाची अमर शक्ती, प्रत्येकाच्या हृदयातून कसा प्रवास करते व आत्म्याचा अंतर्नाद कसा ऐकायचा, आनंदाच्या बेटावर कसे जायचे? याचं मार्गदर्शन करते. हृदयातील ‘मी-माझं-मला’ या स्वार्थी व संकुचित भावनांच्या राक्षसरूपी भिंती निखळ आयुष्य जगू देत नाहीत. म्हणूनच लेखकाने अंतरंगातील सकारात्मक पैलूंची ओळख मित्रत्वाच्या नात्यांतून डायनाच्या साहसी कथेतून करून दिलेली आहे. अमर हृदयातील निखळ प्रेमाच्या शक्तीचा आपण डोळसपणे, अष्टावधानी राहून शोध घेतला पाहिजे, आणि जीवनात आनंद महोत्सव साजरा केला पाहिजे.
-
Smrutiyatra (स्मृतियात्रा)
प्रथितयश साहित्यकार, राजकारणी, पत्रकार, इतिहासकार, कवी अशांऱ्यालेखकाबरोबरऱ्याव्यक्तिगत सहवासाऱ्याआठवणींचा ललितरम्य आलेख म्हणजे ‘स्मृतियात्रा हे भा. द. खेर यांचे पुस्तक. लेखक, कवी, राजकारणी अशी विविधांगी व्यक्तिमत्वं, सावरकर, तात्यासाहेब केळकर, श्री. म. माटे, द. वा. पोतदार, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. मा. , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांवर प्रसंगपरत्वे लिहिलेऱ्यालेखांचं हे संकलन आहे. सावरकरांची पराकोटीची सकारात्मकता...नरसिंह रावांची विद्वत्ता आणि त्यांच्यातील माणुसकी...यशवंतराव चव्हाणांची साहित्यिकांविषयीची आस्था...वृद्धावस्थेऱ्यालक्षणांचा उच्चारही न करणारे द. वा. पोतदार... आवेशपूर्ण, ओजस्वी असं वत्तृÂत्व असलेले पु. भा. भावे... अष्टपैलू काव्यप्रतिभा लाभलेले कवी मनमोहन...इ. नामवंतांऱ्यागुणांचं दर्शन घडविणारी ही स्मृतियात्रा वाचकांना ऱ्याऱ्याकाळात घेऊन जाते.
-
Ujale Jagnyacha Deep (उजळे जगण्याचा दीप)
ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात. "
-
Samarth (समर्थ)
समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.
-
October Rains (आक्टोबर रेन्स )
प्रेमाचा रस्ता अहंभावाच्या विरक्तीतून जातो. असाच प्रवास डायना करते. एफेसस, आर्टेमिस आणि मदर मेरीची गोष्ट सांगत सांगत तिची गोष्ट बहरत जाते. तिचा हा प्रवास आहे गुलाबांच्या मातीत मिसळण्याच्या, शून्यत्वाच्या शोधाचा. या शोधातच तिला प्रेम गवसतं. सेरकानसोबतचा तिचा हा प्रवास आत्मानुभूतीच्या मार्गावर नेतो. आणि एकमेकांची भाषाही न जाणणारे हे दोघे जीवनाच्या एकाच सत्यापाशी पोचतात. ते म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे आकळलेलं प्रेम. मथायसपासून विलग होताना ती ज्या डायना ज्या भावनिक टप्प्यावर असते, ते सारे टप्पे या प्रवासात विलीन होत जातात. आणि माणसातल्या अहंभावासारख्या नकारात्मकेकडे दुर्लक्ष करत डायना निव्वळ स्वीकारभावापर्यंत पोहचते. प्रेमातल्या स्वीकाराच्या सहजभावा मंत्र सांगणारी ही अफलातून कादंबरी.
-
Ka Karacha Shikun (का कराचं शिकून)
समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांऱ्यासर्व पिऱ्याशिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांऱ्याशिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातऱ्यागरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारऱ्याप्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमऱ्यापरिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नऱ्याआव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.
-
Auschwitchya Lahanagya Pori (ऑशविट्सच्या लहानग्या
आंद्रा आणि तातियाना या अनुक्रमे ४ आणि ६ वर्षांच्या इटालियन बहिणी त्यांच्या रिजेका येथील राहत्या घरातून ऑस्टवीच येथील नाझिंच्या बर्कानौ छळछावणीत नेल्या जातात. सुमारे दोन लाख तीस हजार मुलांतून अवघी काही डझन मुलं तिथून जीवंत परत येतात. या बहिणी त्या भाग्यवान मुलांपैकी एक ठरतात आणि वयाची सत्तरी उलटल्यानंतर त्या सगळ्या अमानुष आठवणी आत्ताच्या जगासोबत वाटून घ्यायला लागतात. `वी लिटल गर्ल्स इन ऑस्टवीच` हे पुस्तक लिहितात. नाझिंच्या विरोधात धाडसाने साक्षी देतात. २०१९ मध्ये हे पुस्तक इटली भाषेत प्रसिद्ध झालं. जर्मनी, इंग्रजी बरोबरीने आता हे पुस्तक मराठीत येत आहे. हे पुस्तक म्हणजे दोन लहानग्या बहिणींच्या छळछावणीतील आठवणी आहेत. डोळ्यासमोर पाहिलेले अनंत मृत्यू आहेत, बचावून परत आल्याचा प्रसंग आहे, छळछावणीच्या अनुभवाचे व्रण घेऊन पुढे जगत राहणं आहे. टोकाच्या वंशद्वेषातून जन्माला आलेल्या अमानुषतेचे निरागस बहिणींच्या दृष्टिकोनातून केले गेलेले हे वर्णन आहे.
-
Gayanache Rangi ( गायनाचे रंगी)
नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते. ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत. या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात. गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत. शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी
-
Mudka Kumpan (मुडकं कुंपण)
समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री ! अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची… तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची…. समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण
-
Hits Of Ninety Two (हिट्स ऑफ नाईन्टी टू)
ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.
-
Red Light Dairies Khuloos (रेड लाइट डायरीज ख़ुलूस)
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
-
Prerak-Utprerak (प्रेरक उत्प्रेरक)
यशस्वी जीवनासाठी चांगली नोकरी, कठोर मेहनत, बुद्धयांक, भावनात्मक बुद्ध्यांक, उत्तम संवादकौशल्ये हे सर्व मूलभूत घटक आहेत. तरीदेखील, केवळ या सर्व घटकांची उपस्थिती यशाची हमी देत नाही. तर, त्यांना दीर्घकालीन यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा उत्तेजन देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. तो तुमच्या अभिवृद्धीला चालना आणि वेग देतो. हे प्रचंड प्रभावी पुस्तक विविध उत्प्रेरकांची ओळख करून देते. ते तुम्ही जोपासू शकता आणि तुमच्या कामात तसेच जीवनातही प्रगती करण्यासाठी त्यांचा लाभ करून घेऊ शकता. सहज उपलब्ध, आकर्षक असे पुस्तक. मुख्य म्हणजे, यातील सगळ्यांचा केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले, आचरण्यास सोपे, 'उत्प्रेरक पुस्तक, जे तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि दररोज, प्रत्येक क्षणामधून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य साधनांनी सुसज्ज करेल.
-
Vishnumay Jag (विष्णुमय जग)
निवड केलेले अभंग अत्यंत भावपूर्ण आहेत. लेखक प्रा. मधुकर डो यांनी उपयोजलेली भाषा अभिव्यक्ती ही खूप सुबोध आणि लाघवी असून निरूपण केलेल्या भाषेला सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. लेखकाने निवडलेला शब्दसंग्रह आणि त्यातून अभंगगाथेतील काही शब्दांचा दिलेला अर्थसुद्धा उपयुक्त आहे. प्रत्येक अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची दृष्टी त्या अभंगाबद्दलची व्यक्त केलेली आहे. नंतर अभंगाचे चरण दिलेले आहे. त्यानंतर अभंगाचा अर्थविस्तार केलेला आहे. परत एकदा शेवटी स्वतःचे मत मांडून त्याला वास्तवतेच्या स्वरूपामध्ये काय महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह मांडलेलं आहे. यामुळे वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना एक अद्वैत अनुभूती प्राप्त होईल. त्यातून संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थबोध तर होईलच परंतु एका अभ्यासकाने मांडलेला बोधात्मक अर्थसुद्धा या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. - प्रा. डॉ. हरिदास आखरे ( मराठी विभाग )