-
Sophie's World (सोफीज् वर्ल्ड)
सोफीचे जग: तत्त्वज्ञानाच्या इतिहासाबद्दल एक कादंबरी जेव्हा चौदा वर्षीय सोफी एका गूढ मार्गदर्शकाला भेटते, जो तिला 'तत्त्वज्ञाना'ची ओळख करून देतो, तेव्हा तिच्या जीवनात गूढ घटना घडत जातात. दुसऱ्या एका अनोळखी मुलीच्या पत्त्यावर आलेली पोस्टकार्ड्स तिला का मिळत राहतात ? ही मुलगी कोण आहे? आणि, तसं म्हटलं तर सोफी स्वतः कोण आहे ? हे कोडं उलगडायला ती आपलं नव्याने प्राप्त झालेलं तत्त्वज्ञान उपयोगात आणते, पण सत्य मात्र तिच्या कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचं असतं. रहस्य, तत्त्वज्ञान आणि कल्पना विलास यांचं एक नाद लावणारं मिश्रण सोफीज् वर्ल्ड ही एक 'आंतरराष्ट्रीय' कलाकृती आहे, ती साठ भाषांमध्ये भाषांतरित केली गेली आहे. तिच्या चार कोटी प्रती खपल्या आहेत.
-
Unstoppable Us Volume 1 (अनस्टॉपेबल अस खंड -1)
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत. आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला! मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो? याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं! मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो? सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची. आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून… आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ? हेही समजून घेऊ या…
-
Drushti Aadchi Srushti (दृष्टी आडची सृष्टी)
मानवी सभ्यतेला आणि पृथ्वीतलावरच्या जीवसृष्टीला विषाणूंनी ज्या प्रकारें आकार दिला आहे, हे आता कुठे आपल्याला उमजू लागलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर ज्या अदृश्य शक्ती परिणाम करत असतात, त्यांची भुरळ घालणारी झलक प्रणय लाल यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. चित्तवेधक आणि ज्ञानात भर टाकणारं!’ – सिद्धार्थ मुखर्जी, – द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज या पुस्तकाचे पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक. ‘आपल्यापैकी बहुतेक जण विषाणूंकडे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणून पाहतात, परंतु ते निसर्गातले सर्वाधिक वैविध्य असलेले, सर्वाधिक संख्येने आढळणारे सूक्ष्मजीव आहेत, जे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर वास करतात. वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या, सुंदर रेखाचित्रांनी सजलेल्या या पुस्तकात प्रणय लाल आपल्याला विषाणूंच्या जगताची भव्य यात्रा घडवतात आणि त्यांचा इतिहास, आणि निसर्गात ते बजावत असलेल्या विभिन्न विस्मयकारी भूमिकेचं दर्शन घडवतात. तरुण वाचकांसह, ज्यांना ज्यांना निसर्गात रस आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अतिशय आनंद देईल.’
-
Mahagatha Puranatil 100 Katha (महागाथा पुराणातील १
हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामावलं आहे. सातत्याने उत्तरं शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथांमधील शंभर निवडक पौराणिक कथांची सचित्र-संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच; पण लेखक सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्यांचाही अंतर्भाव यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र वरुणदेवाला फसवतो... या आणि यांसारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील. सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्यांची कालक्रमानुसार मांडणी करून त्या 'नव्या' स्वरूपात सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक संदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या वेगवान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे. कर्म आणि कर्मफलाचं वर्तुळ पूर्ण होतं.
-
The Motorcycle Diaries (द मोटरसायकल डायरीज)
शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अर्नेस्टो चे गव्हेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा 'द मोटरसारकल डायरीज' या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद. अर्नेस्टो 'चे' गव्हेरा, हा एल चे किंवा फक्त चे म्हणून ओळखला जाणारा, एक मार्क्सवादी क्रांतिकारक, चिकित्सक, लेखक, स्वप्निल विचारवंत, गनिमी नेता, मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात. या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोनं अमेरिका खंडाच्या प्रवासात घेतलेले फोटो आणि नकाशे, अलैदा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना, सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन कवी सिंटिओ व्हिटियर यानं केलेलं या पुस्तकाचं रसग्रहण आणि 'चे'नं त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे.
-
Samagra Ramayan Ram (समग्र रामायण राम)
वाल्मीकी मुनी लिखित रामायण हे आद्य महाकाव्य. तेव्हापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगातही सगळ्यांना तेवढीच भुरळ पडणारी संपूर्ण रामकथा...
-
Cosmos (कॉसमॉस)
कुतूहलजनके, कल्पक, वाचनीय, विविधांगी... न्यू यॉर्क टाइम्स विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील. काय आहे यात : - जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन - इजिप्ती चित्रलिपी - मानवी मेंदू - पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ सूर्याचा अंत - तारामंडळांचा विकास