-
Origin Story Characharacha Mahaitihas(ओरिजिन स्टोर
Origin Story Characharacha Mahaitihas काळाचा उदय होण्याच्या आधीपासून ते सुदूर भविष्याच्या दूरवरच्या टोकापर्यंत बहुतेक सगळे इतिहासकार काळाचे सर्वांत लहान-लहान तुकडे अभ्यासत जातात. ते करत असताना त्यांचा भर विशिष्ट तारखा, व्यक्ती आणि दस्तऐवजांवर असतो. मात्र बिग बँगपासून ते आजपर्यंत संपूर्ण इतिहासाचा आणि अगदी सुदूरच्या भविष्याचा अभ्यास करायचा झाला तर तो कसा असेल? काळाच्या सबंध पटाकडे बघितल्याने आपला या विश्वाविषयीचा, पृथ्वीविषयीचा आणि चक्क आपल्या अस्तित्वाविषयीचा दृष्टिकोन कसा बदलेल? या प्रश्नांची उत्तरं शोधायला डेव्हिड ख्रिश्चन “बिग हिस्ट्री" कल्पनेचा माग काढत गेले. आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत हे समजून घेण्याचा हा सर्वांत रोमांचक असा नवीन मार्ग आहे. आपल्या ओरिजिन स्टोरी या पुस्तकातून डेव्हिड ख्रिश्चन, ज्याला आपण 'इतिहास' म्हणून ओळखतो अशा सबंध १३.८ अब्ज वर्षांच्या विलक्षण प्रवासावर वाचकांना घेऊन जातात. या इतिहासाला आकार देणाऱ्या घटना (टप्पे), महत्त्वाचे कल आणि आपल्या मुळाविषयीचे गहन प्रश्न यांच्यावर लक्ष केंद्रित करून, सर्व चराचराला एकत्र बांधणारे अदृश्य धागे ख्रिश्चन दाखवून देतात. त्यात ग्रहाच्या निर्मितीपासून ते शेतीचं आगमन, अणुयुद्ध आणि त्यापलीकडच्या गोष्टींचा समावेश होतो. विश्वाची उत्पत्ति, जीवसृष्टीची सुरुवात, मानवांचा उदय आणि भविष्यात दडलेल्या शक्यता यांविषयीचं चित्तथरारक अंतर्दर्शन घडवत ही उत्पत्तिकथा' आपली या विश्वातली जागा नवीन चौकटीत धिटाईने दाखवून देते.
-
Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
-
Sajeev (सजीव)
सजीवांच्या उत्पत्तीपासून, उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स पासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांची रंजक गुंफण आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक
-
Pravas (प्रवास)
प्रवास कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’