-
Anup
‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार` बनणं...त्यानंतर ग्लॅमरचा त्याग करून योगाश्रमात राहणं... तिथून मुंबईला परत आल्यानंतर दुर्दैवी कार अपघात होणं... कोमात गेलेल्या आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं... त्यांनी परत आत्मशोधासाठी सज्ज होणं... संन्यास घेणं आणि त्यानंतर मुंबईत योगाचे धडे द्यायला लागणं... अनू यांच्या आत्मशोधाची... मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची ही कहाणी.
-
UTTARKAND (उत्तरकांड)
‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.
-
PIZZA TIGER
टॉम मोनाघन... डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर विस्तारलेल्या पिझ्झाच्या फास्ट फूड साखळीचा संस्थापक... टॉमचं कष्टमय बालपण... ‘मरिन कोअर’मधील निवृत्तीनंतर झालेली आर्थिक फसवणूक... त्याच्या भावाने आणलेला पिझ्झा स्टोअर चालवण्याचा प्रस्ताव... हा व्यवसाय करतानाही अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना... मात्र, त्या अडचणींना तोंड देत सुरू केलेलं पिझ्झा स्टोअर... त्यातून एका मोठ्या पिझ्झा-साखळीची झालेली निर्मिती...दर तीन तासांनी जगात कुठेतरी सुरू होणारी ‘डॉमिनोज’ची शाखा... अशा प्रकारे जगभर झालेला विस्तार... तर अशी आहे टॉमची यशोगाथा ‘पिझ्झा टायगर’... प्रेरणादायक आणि वाचनीय
-
Warsaw Te Hiroshima
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध. सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट.