-
Saigalswaryug (सैगलस्वरयुग)
कुंदनलाल सैगल ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील गायकनटाचे हे सांगीतिक चरित्र. सैगलच्या चित्रपटांबरोबरच त्या त्या सालातील प्रमुख हिंदी आणि मराठी चित्रपटांचे तसेच सैगलच्या गाण्यांची आणि त्याच्या संगीतकारांची चर्चा करताना त्या त्या सालातील गाजलेल्या अन्य गाण्यांचे, ती गाणार्या गायक-गायिकांचे आणि त्यांच्या संगीतकारांचेही उल्लेख येथे येतात. त्यामुळे सैगलच्या काळातील एकूण चित्रपटसृष्टीचे आणि खास करुन त्यातील संगीताचे बदलते स्वरूप या पुस्तकातून आपोआप उलगडले गेले आहे. सैगलवर जे संगीतसंस्कार झाले त्या संदर्भात त्याच्या बालपणी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय समाजात संगीतपरंपरा काय होती, त्याचीही माहिती या लेखनातून मिळते. 1933 ते 1947 हा सैगलचा सुवर्णकालखंड. `सैगलस्वरयुग’ म्हणता येईल अशा या कालखंडाची ही एक संगीतसफर. त्या कालखंडातील अनेकांचे भावविश्व आणि मनाच्या सांस्कृतिक क्षितिजाच्या सीमा विस्तारण्यात सैगलचा नि:संशय वाटा होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
-
Glanirbhavati Bharat (ग्लानिर्भवति भारत)
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’ आणि ‘बेचका’ या कथासंग्रहानंतर साधू यांचा हा संग्रह आहे वेगळ्याच विषयावर वेगळ्या धाटणीची मांडणी घेऊन. सर्व कथांमधून एक सूत्र आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे. देशाची, समाजाच्या नीति-मूल्यांची, संस्कृतीची होत असलेली सर्वांगीण अधोगती. आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.
-
Chandragupt..(चंद्रगुप्त)
हि गोष्ट आहे एका संघर्षाची,जीद्दची आणि देशाचं नशीब बदलणारा माणसाची! माणसाचा अतुलनीय त्यागाची! ज्या ज्या वेळी आता हिंदुस्तान संपला, येथील लोकांना काही भवितव्य नाही अशी हाकाटी सुरु होती त्या त्या वेळी एका नायकाचा जन्म होतो तो अवर्तीण होऊन सार चित्र पालटतो आणि परत एकादा आपल्या मातृभूमीला गतवैभव प्राप्त करून देतो. चंद्रगुप्त हि अशी आख्यायिक निर्माण करणारी व्यक्ती आहे. भगवदगीतेतील परित्राणाय साधूनाम विनाशायच दृष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे हि उक्ती सार्थ करणासाठी उदयाला येणारा एका व्यक्तीची हि यशोगाथा आहे.
-
Zulichya Khali (झुलीच्या खाली)
' मानवी जगण्यातल्या विसंगती , गाव -शहरामधील रुंदावत चाललेली खाई जीवनसंघर्षातील घुसमट ,वृत्ती -प्रवृतींच विस्मयकारी रूप या कादंबरीतून लेखक सार्थपणे घडवितो. हे घडवताना त्याची लेखणी माणूस शोधू पाहते . माणूस शोधताना माणसासाठी व्याकूळ होणारी 'झुलीच्या खाली ' हि लक्षणीय कांदबरी आहे . एका शालेय शिक्षकाच्या जीवनावरील कांदबरी . आजच्या शिक्षणसंस्थांतील बाह्य दडपणे, शिक्षणातील तकलुपी नियम , नोकरीसाठी भ्रष्टाचार यांचे चित्रण आत्यंतिक प्रभावीपणे कांदबरीत उमटले आहे . शिक्षण त्याच्या भोवतालचा समाज , कौटुबिक समस्यांचा गिरगिट गुंता आणि शेतीप्रश्नांची नीटस मांडणी केल्यामुळे हि अतिशय प्रत्ययकारी कांदबरी झाली आहे .'
-
Sambhram (संभ्रम)
'संभ्रम ' हे बुवाबाजी ,अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगांचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. य़ात रजनीश ,रमामाता ,न्यायरत्न विनोद ,सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे . मीरा दातारच दर्गा , समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळ, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी, उत्सव, काळूबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डाक्युमेंटरी पध्दतीने घडवले आहे . जैन समाजात अल्पवयीन मुलींनाहि संन्यासदीक्षा दिली जाते . यल्लम्मास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात . या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे . या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिध्द विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे .
-
Shahamrug (शहामृग)
प्रत्यक्षातल्या माणसाच असण आणि दिसण त्याच जगण आणि वागण त्याचे वासना विकार त्याचा हे सगळचं तर्कातीत असत. गोचरत्वाचा पलीकडच केवळ एवढावरच चिमटीत धरून माणसाच मोठेपणा वा श्रुद्रत्व दाखविता येत नाही ते तस ठरविता येत नाही. तर माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा या काही पायरा. केवळ चाचपडण्यापुरता. बेवरवशाच्या या चाचपडण्यातून काही हाती येत का ? कुठलं सत्य गवसत का? आणि हे सत्य तरी कुठल्या आधारवर सत्य म्हणून स्वीकारायचा? ललित लेखनाचा केंदीभूत माणसाचा शोधाची हि अखंड प्रक्रिया. प्रत्येक कलावंत आपापल्या कुवतीनुसार या प्रक्रियेचा एक भाग होतो. रवींद्र शोभने याच्या शहामृग मधील दीर्घकथांनी माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा केलेला हा प्रयल तटस्थ्. तरीही उत्कट आणि सयंत.
-
Mantrajagar (मंत्रजागर)
वेगळ्या आणि अद्भुत वाटा चोखाळणार्या अरुण साधू यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कथा. पण वेगळ्या तरी कसे म्हणता येईल ? कारण मानवी संस्कृतीला लागलेली विकृतीची कीड, आण्विक प्रलय, मराठी भाषेची दुर्दशा हे विषय साधूंनी यापूर्वीही आपल्या कथा-कादंबर्यामधे हाताळले आहेत. किंबहुना या विषयांनी लेखकाला झपाटले आहे. व्यापक सामाजिक व मानवी आशय असलेल्या व भविष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणार्या या अद्भुत विज्ञानकथा अथवा फॅन्टसीज् आहेत असे म्हणता येईल. साधू यांच्या खास सहज शैलीतील.
-
Rasha (राशा)
रशियामधील असाधारण वातावरणामुळे बिघडत गेलेल्या आणि अस्थिर परिस्थितीमुळे ढवळत गेलेल्या सामाजिक जीवनातील बारकावे टिपणारे, तसेच प्रत्यक्ष अनुभवलेल्या, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या घटनांवर आधारित असे ओघवत्या शैलीत केलेले झंझावाती चित्रण.
-
Chittapavan (चित्तपावन)
गेंड्याच्या कातडीचा तात्या जमकर डोईवरची तिरकी टोपी हातात घेत दात काढून फक्त हसला. तात्या जमकर गावातल्या समाजवादी पक्षाचा म्होरक्या होता."वर्षातून एखादं शिबीर घेतलं,एकदोन मिरवणूक-मोर्चे काढले आणि पक्षाच्या तोंडावर हजार-पाच हजार रुपये फेकले कि समाजवादी म्हणून नाना धंदे करायला तू मोकळा." अशा भाषेत बंडूनाना त्याला उडवून लावीत असत. त्याचा रागाने तो म्हणाला,"बंडूनाना, तुम्हाला समाजवादाची कावीळ झाली आहे." आणि शिष्टपणाने विचारू लागला,"बंडूनाना, एव्हड्या पुढच्या गोष्टी करायला आपण टिळक आहोत कि सावरकर?" "अरे त्यांची नावसुद्धा तोंडात धरण्याची तुमची लायकी नाही आणि हे बघ तात्या-" तात्याचा चेहेरा समोर धरून त्याच्या डोळ्यात नजर घुसवीत बंडूनाना म्हणाले,"माझं म्हणशील ना? तर मी नखाएव्हडा का होईना,पण टिळक आहे आणि केसाएवढा असेन,पण सावरकर सुद्धा आहे!"