-
Saaj Sahyadricha (साज सह्याद्रीचा )
किल्ले फिरण्याची आवड जपणारा, गिर्यारोहणाचा ध्यास घेतलेला एक मोठा वर्ग देशात आहे. त्यांना किल्ल्यांबद्दल आत्मीयता आहे. या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी असे लोक जीव ओतून काम करताना मी जवळून पाहिले आहेत. दुर्गसफर म्हणजे येणार्या पिढीची योग्य जडणघडण होण्याचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे तरुणांनी किल्ले चढायला हवे. ही शिवस्थळे जपणे, त्यांचे संवर्धन करणे म्हणजे देशाच्या प्रेरणादायी इतिहासाचे संगोपन करण्याचे कार्य आहे. म्हणून तरुणवयात या रांगड्या सह्याद्रीशी मैत्री करणे गरजेचे आहे. किल्ल्याचा इतिहास जाणून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गाथा युवापिढीच्या रक्तात भिनायला हव्या. आज देशाला अशा तरुण रक्ताची गरज आहे ज्यांना हिंदुस्थानाच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान आहे. चला तर मग, महाराष्ट्रातील दुर्गसफरीचा आनंद घ्या, भरपूर फिरा.
-
Nipun Shodh (निपुण शोध)
‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’ त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!
-
Padadyamagche Kisse (पडद्यामागचे किस्से )
रंगमंचावर नाटक सादर होते , तेव्हा त्यातील नाट्य प्रेक्षकांचे मनोरंजन करते ; पण नाटक रंगमंचावर सादर होण्याआधी आणि नाटकाचा पडदा पडल्यानंतरही काही मजेशीर आणि कधी काही गंभीरसुद्धा किस्से , प्रसंग घडत असतात , कधी अनवधानाने , कधी अपघाताने , कधी विविध प्रकारच्या स्वभावप्रकृतींमुळे , तर कधी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अडचणींमुळे अशा गोष्टी घडतात , त्या प्रेक्षकांसमोर कधीच येत नाही , त्यातील गंमत ही त्यांत गुंतलेल्या लोकांपुरतीच राहते , लेखक राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनायात कार्यरत होते ,शासनाच्या हौशी नाट्य - नृत्य - चित्रपट - संगीत - लोककला आदि स्पर्धा - महोत्सवांच्या आयोजनात ते सक्रिय होते , त्यांनी त्यांच्या आठवणीतले निवडक किस्से या पुस्तकात हलक्याफुलक्या शब्दांत सांगितले आहे , ते वाचनीय तर आहेतच , शिवाय त्यातून रंगभूमी व अशा स्पर्धा - महोत्सवांचे विविध पैलूही उलगडले आहे ,
-
Jeevansafalyasathi Vicharanchya Chandanya ( जीवनसा
आपल्या ठायी असलेल्या 'विचारशीलता' या स्वभावविशेषाद्वारे कुठलीही कृती प्रत्यक्षात साकारते , अमुर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळते , नेमका हाच धागा पकडून लेखकाने या पुस्तकातील लेखांद्वारे वैचारिक चांदण्यांची उधळण केली आहे , वाचनाचा निखळ आनंद देण्यासोबतच हे विचार सर्वानांच अंतर्मुखही करतात ; किंबहुना ते आत्मचिंतनाकडे नेणारे आहेत , आपलं जीवन सर्वार्थाने तेजाळण्याची क्षमता असलेल्या या 'विचारांच्या चांदण्या !'
-
Paragrahavarun Corona Aani… (परग्रहावरून कोरोना आण
विज्ञान काल्पनिका-वास्तविका या अनोख्या स्वरूपातली ही ‘कोरोना’ या विषयावर आधारित कादंबरी. जगभर कोरोना कसा पसरला आणि सगळ्या देशांनी तो थोपवण्याचे कसे प्रयत्न केले, हे समग्रपणे मांडणारी ही कादंबरी. वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट आणि सहजशैलीत अभिव्यक्त झालेली ही कादंबरी मानवी स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते. सत्य आणि कल्पना या दोन्ही स्तरांवर विहरणारी ही कादंबरी कोरोनाच्या साथीचा मुद्देसूद आणि परिपूर्ण लेखाजोखा मांडते. प्रत्येक पानागणिक वाचकांची उत्सुकता वाढवणारी आणि देशोदेशींच्या रोमहर्षक घटनांसह अनेक देशांचे चित्रण करणारी ही विज्ञान काल्पनिका- वास्तविका.