-
Adam (अॅडम)
'अॅडम'चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बर्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही "श्यामले'ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमा'ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या "निर्मले'कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
-
The Last Juror (द लास्ट ज्यूरर)
मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्तहीकांपैकीच एक ' द फोर्ड कौंटी टाईम्स' हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असलं तरीही सगळ्यांना या गोष्टीचंआश्चर्य वाटतं की,कॉलेज सोडलेला एक २३ वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फॅमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिचीनिर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिद्ध करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो.
-
Sanvad Parmeshwarashi
जीवनाला कलाटणी देणारा अनुभव. एक असामान्या संवाद. संवाद परमेश्वराशी. कल्पना करा तुम्ही देवाला अस्तित्व, प्रेम आणि श्रध्दा, विश्वास, जन्म आणि मृत्यू, चांगलं आणि वाईट या बद्दल गोंधळात टाकणारे प्रश्न विचारलेत. कल्पना करा देवानं त्यांची अगदी निःसंदिग्ध, स्पष्ट आणि सहज समजतील अशी उत्तरं दिली. नील डॉनाल्ड वॊल्श यांच्या बाबतीत हे घडलं- तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं... तुम्हीसुध्दा असा संवाद करु शकता.. वॊल्शनं जेव्हा देवाला पत्र लिहायचं ठरवलं तेव्हा आयुष्यात ते निराशेच्या गर्तेत सापडलेले होते. त्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यांचं पत्र लिहून पूर्ण झालं--आणि मग त्यांना लिहितचं रहावसं वाटलं..त्यातूनच त्यांच्या प्रश्नांना ही अलौकिक, असामन्य उत्तरं मिळाली. ही अर्थपूर्ण, तत्वनिष्ठ आणि सत्याधिष्टित उतरं तुम्हाला चकित करतील. आपल्या सर्व श्रध्दा आणि परंपरांचा सखोल अर्थ त्यातून उलगडत जाईल. ही उत्तरं तुमच्या बरोबरच तुमचं आयुष्य, अन्य गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टकोन बदलून टाकतील. खुलं मन, असीम उत्सुकता आणि सत्यान्वेषणाची प्रामाणिक इच्छा असणा-यांसाठी हे पुस्तक दिव्य अनुभव ठरावं.
-
Steve Jobs: Ek Zapatlela Tantradnya
स्टीव्ह जॉब्स-तंत्रज्ञानाच्या जगातला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्पयुटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक पलेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
-
Schapelle
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वष| कारावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सार्या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वी न्सलंडमये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सया केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हारता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सया तरी ती 2024 पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधामागचं सत्य... प्रसारमायमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सवा|चं अत्यंत वस्तुनिष्ट, संयत वर्णन शॅपेल ह्या पुस्तकात शोध -पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलच्या निर्दोषत्वावर नेहमीच दृढविश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणार्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.