-
Chalat Duruni Aalo Mage (चालत दुरुनी आलो मागे....)
मन्नू भंडारी आणि राजेंद्र यादव… हिंदी साहित्यजगतातिल विलक्षण प्रतिभावान पतीपत्नी… आत्यंतिक ओढीन जवळ आलेली हि दोन मन परस्परांचा आत्यंतिक वीट येऊन दूर झाली. त्यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यान हिंदी साहित्यसृष्टीत खळबळ माजलि. चर्चेला ऊत आला, कधी मन्नू भंडारी विषयी सहानुभूती तर कधी राजेंद्र यादवांची पाठराखण. पतीपत्नीच्या नात्याचा, त्यातील ताणाचा आणि त्यांच्यासाहित्यिक प्रवासाचा त्यांच्या आत्मचारीत्र्यातून झालेला उलगडा.
-
Tvacha (त्वचा)
भारत ससाणे यांच्या कथालेखानातून संस्कृती-विमर्शकाचि कथन दृष्टी दिसते. ईश्वर आणि माणूस यांतील नाते, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सीमारेषा, इतिहास, भाषा, धर्म, परंपरा यांचा मानवी भाव विश्वावरील मूर्त-अमूर्त प्रभाव, आप्तस्वकीयांच्या नात्यातील गुंतागुंत, व्यक्ती आणि समाज यांच्यातले परस्परावलम्बित्व , नागरिक आणि राज्य यांच्यातले संबंध, हक्क आणि जबाबदार्यांचे स्थान, असे कितीतरी पैलू त्यांच्या कथनात अंतर्भूत असतात. आपले कथालेखन हि एक सांस्कृतिक रचना आहे, याचे जागते भान हि त्यांच्या कथेची जमेची बाजू. आपल्या जीवन व्यवहारातील राजकीय अबोधावस्था कथेतील पात्रांच्या वर्तनाव्याव्हारात अप्रत्यक्षपणे सत्ता गाजवीत असते, हे त्यांच्या कथा वाचताना हटकून प्रत्ययाला येते. कथालेखन हा एक कलात्मक आणि बौद्धिक व्यवहार आहे, याविषयी भारत सासणे सजग आहेत. या जागरूकतेमुळेच कथेच्या रुपतत्वाची वाङ्ग्मयिन चिन्हव्यवस्था आणि कथेच्या आशयतत्वातिल सांस्कृतिक चिन्हव्यवस्था यांतले संयोगातत्वा शोधीत त्यांची कथा आकार घेते. वेदना मानवी अनुभवाच आणि असतेपाणाचाही मूळ आहे अशी त्यांची भूमिका आहे. साहित्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी हा दु:खानुभव असतो, पण अभिव्यक्तिप्रक्रियेतुन हे दु:ख संक्रमित होत, तेव्हा जे उरत तो शांत रसच निरामय साक्षात्कार.
-
TaNaPiHiNiPaJa
आपण लहानपणी इंद्रधनुष्याचे सात रंग असे पाठ केले होते. हे पुस्तक म्हणजे द्वारकानाथ संझागीरींच्या आयुष्यातल्या त्या समृद्ध आठवणींच इंद्रधनुष्य आहे. ते त्यांच्या ओघवत्या लेखणीच्या गाडीत बसवून बऱ्याचदा आपल्याला हसवतात, कधी अंतर्मुख करतात तर क्वचित प्रसंगी डोळ्यात एखादा अश्रू उभा करतात आणि जवळपास पन्नास वर्षांच्या कालखंडातून फिरवून आणतात. एका बैठकीत संपवावा असा हा सप्तरंगी प्रवास आहे.
-
Investment (इन्व्हेस्टमेंट)
रत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामद्ये, आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करत[...]
-
Mast Kalandar (मस्त कलंदर)
समाज बदलतो, समाज पुढे जातो, समाजाची प्रगती होते, त्यासाठी कारणीभूत असतात, काही अस्थिर, अव्यवहारी, क्वचित अविचारी अशी मस्त कलंदर वृत्तीची, भन्नाट माणसं ! ह्या पुस्तकामधे मी आपल्या जगातल्या, आपल्या आजूबाजूच्या पाच मस्त कलंदर व्यक्तिंचा वेध घेतला आहे. किशोर कुमार, भरत दाभोळकर, जयंत साळगावकर, निलु निरंजना गव्हाणकर आणि विजय मल्ल्या ! असामान्य अशा ह्या पाचजणांची ओळख करून घेताना, त्यांच्या मस्त कलंदर वृत्तीचा वेडा वारा आपल्यालाही स्पर्श करेल आणि केवळ नाकासमोर पाहून जगणारे आपण स्वत:मधली जगावेगळी ऊर्मी शोधायला शिकू, अशी खात्री आहे.
-
Haravaleli Mumbai (हरवलेली मुंबई)
मुंबईची ओळख करून देण्याचा आजवर अनेक लेखकांनी प्रयत्न केला आहे. ‘हरवलेली मुंबई’ हे पुस्तकसुद्धा अशा जुन्या मुंबईच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करतं. या पुस्तकामध्ये ‘साप्ताहिक लोकप्रभा’मध्ये प्रका[...]
-
Smarangatha (स्मरणगाथा)
सर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून आपल्याला असे जाणवते, की बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन या माणसाने जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हा कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला, तरी मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला. `स्मरणगाथे’च्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे.
-
Das Dongari Rahato ( दास डोंगरी राहातों )
या लोकोत्तर महानुभावानं जन्मभर समाजचिंतन केलं रात्रंदिवस एकच ध्यास ``निशिदिनिं जनचिन्ता लागलीसे उदारा’’ अश्या जगा आगळ्या छंदानं वेढलेल्या विरक्त- पण देशाच्या संसाराची चिंता वाहणार्या श्रीसमर्थ रामदासांचं लीळाचरित्र सांगणारी रसमयी कादंबरी ``दास डोंगरीं राहातो’’
-
Lagebandhe (लागेबांधे)
अजाणत्या वयात जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींनी केलेल्या मानसिक-भावनिक पोषणाचे संस्कार आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. दारिद्यातही मनाची श्रीमंती जपणार्या काही व्यक्ती मधु मंगेश कर्णिक यांच्या आयुष्यात आल्या. त्यांच्याशी असलेले `लागेबांधे’ या पुस्तकातून हळूवारपणे व्यक्त झाले आहेत. आयुष्यभर पुरेल अशा अगणित कडूगोड आठवणींची शिदोरी देणार्या मंगेशदादा, आतेबाय, होनीआजी, वारणामावशी, अनू, प्रेमा यांसारख्या सुहृदांविषयी केलेले आत्मीय लेखन.
-
Purva Apurva (पूर्व अपूर्व)
"द्वारकानाथ संझगिरीचं हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की, ते माझ्यासमोर बसले आहेत आणि त्यांचे पर्यटनाचे अनुभव मला कथन करतायत. त्यांची शैली अशी ओघवती आहे." -विजय तेंडुलकर
-
Legosache Divas (लेगॉसचे दिवस)
एका साध्या, चौकस, उत्साही आणि मनमोकळ्या वृत्तीनं तुम्ही लेगॉसमध्ये राहिलात. त्यामुळे हे पुस्तक छान झालं आहे. आधुनिक काळात एखाद्या सिंदबादच्या सफरीला गेल्यासारखं हे पुस्तक वाचताना वाटतं. लेगॉसमध्ये गेल्यावर तेथील वातावरण पहाता आपल्या मनाची दारे घट्ट बंद करावीशी वाटणं अगदी शक्य होतं. परंतु तुम्हाला तसं वाटलं नाही. त्यामुळेच तिथल्या जीवनाचं तुम्हाला इतकं सर्वांगीण दर्शन घडलं. विनोदबुद्धी जिवंत ठेवल्याशिवाय लेगॉसमध्ये दिवस काढणं कठीणच होतं. तुमच्या विनोदाचा झरा या पुस्तकात सतत झुळझुळत राहातो. हा विनोद वरपांगी केलेला नाही. सर्व पुस्तकच विनोदी व्हावं असा अट्टाहास तुम्ही केलेला नाही. सहजरित्या ठिकठिकाणी तो अवतरतो. इतकं चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !
-
NijaKhun (निजखूण)
मन विशाल करायचं, नव्या झाडांच्या लागवडीसाठी लँटाना गवत छाटून टाकायला लागतं, तसे वाईट विचार मनातून काढून टाकून उदात्ततेकडे वाटचाल करायची. ह्या वसुंधरेसारखं सर्वव्यापी व्हायचं.... आजच्या जगण्याचं वेगळं भान देणारी सकस कादंबरी
-
Mumbai Dinak (मुंबई दिनांक)
सामाजिक जीवनातील, प्रत्यक्षा-प्रत्यक्ष राजकारणातील जे अंतःस्त्रोत आहेत. हे अंतःस्त्रोत ज्या चिवटपणे परस्परांच्या जगण्याला छेदून-भेदून जातात, त्याचे प्रत्ययकारी शैलीत दर्शन घडविणारी आणि विस्मयचकित करणारी राजकीय कादंबरी.
-
Elgar. (एल्गार)
शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ‘सामाजिक जीवना’शी फारकत घेतलेला माणूस नव्हे. ‘माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणाऱ्या श्री. श्री. ना. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन मित्रांविषयी आहे. रघू आणि कादर या दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.