-
Vijayache Mansshastra (विजयाचे मानसशास्त्र)
ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते… राहुल द्रविड,क्रिकेटपटू श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे…. गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्या सार्याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे… अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे… प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे. कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.
-
Mana Sajjana (मना सज्जना)
श्री. भीष्मराज बाम सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रांत विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबद्धतेची व यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली. प्रस्तुत पुस्तकातील छोटेखानी लेखांमध्येही श्री. बाम यांच्यामधील त्याच शिक्षकाची तळमळ आपले लक्ष वेधून घेते. खेळ असो, की नेमलेले कोणतेही नित्यकर्म असो, त्यासाठी चित्ताला एकाग्रतेचे वळण लागले पाहिजे. ही एकाग्रता अंगवळणी कशी पाडून घेता येईल, हे सांगण्यासाठी योगशास्त्राचे विवेचन त्यांच्या उपयोगी पडले. `पातञ्जल योगदर्शन’ हा भारतीय मानसशास्त्राचा ग्रंथ आहे. त्याचा आधार जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे, अशी त्यांची खात्री पटली. पोलीसखात्यात काम करताना या ग्रंथातील मूलगामी चिंतनाचा त्यांना लाभ झालाच, पण नवोदितांनी आपापल्या क्षेत्रांतील लहानमोठी आव्हाने स्वीकारण्यासाठीही त्यातील मार्गदर्शन त्यांच्या कामी आहे. `मना सज्जना’ या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान-सहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात नवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणि लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.
-
Chandanvishayi (छंदांविषयी)
लेखक म्हणून माहीत असलेल्या अनिल अवचट यांनी स्वतःच्या अनेक छंदांविषयी या पुस्तकात लिहिले आहे. चित्र, शिल्प, ओरिगामी, बासरी, फोटोग्राफी व स्वयंपाक हे छंद त्यांनी कसे जोपासले, त्या त्या माध्यमांचा त्यांन[...]
-
Gandhinantarcha Bharat
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास. असंख्य जाती-जमाती, वर्ग, भाषा आणि धर्म यात विभागलेला, प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जीव व्यतीत करणारा आणि यादवी संघषार्थ बुडालेला हिंदुस्थान स्वातंत्र्यप्राप्तीनंत[...]
-
Aarogyasampanna Adhunik Jeevanakarta Ayurveda
रस्त्यावर उघडयावर तयार होणारे नानाविध खाद्यपदार्थ (फास्ट फूड), आधुनिकतेच्या नावाखाली मैदा, मार्जरीन- बटर, दुधयुक्त भाज्या / फळे इत्यादी घटक असलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेच्या अभावामुळे कौटुंबिक सुसवांद साधण्यात अडचणी, कम्प्युटर- दूरदर्शनचा जीवनात नको तेवढा शिरकाव- या सर्वांतून मानसिक ताणतणाव, समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सखोल, सर्वसमावेशक तसेच आधुनिक, सुलभ, रंजक, शास्त्रीय परिभाषेत सर्व स्तरावरच्या वाचक/ अभ्यासकांच्या शंकांचे निराकरण करणारे व एकूणच नवी आगळी वेगळी तथा पूर्ण व्यवहार्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक पुस्तक.
-
Thevnitlya Chija
भूत आणि भविष्य या जीवनाच्या दोन फांद्यांवर बांधलेल्या काळाच्या हिंदोळ्यावरील झोके म्हणजे या ठेवणीतल्या चिजा. शान्ताराम तथा के. ज. पुरोहित यांच्या`व्रात्यस्तोम’, `मी असता’ आणि `आठवणींचा पार’ या पुस्तकांसारखेच, पण त्यांच्या कितीतरी पुढे वाचकाला घेऊन जाणारे असे हे ठेवणीतल्या चिजा’ हे पुस्तक. रूढार्थाने हे आत्मचरित्र नव्हे; ते आहे एका मोठ्या संवेदनशील लेखकाच्या आत्म्याचे चरित्र. कधी गंभीर; कधी खुसखुशीत; कधी विचारगर्भ तर कधी विनोदी; कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या;कधी अंतर्मुख करणार्या; कधी छाकट्या तर कधी सरळ; मराठी गद्याचे ललित वैभव प्रकट करणार्या `मालगुडी ते ब्रह्मपुरींपासून’ तो `स्वप्नस्थ वास्तव’ पर्यंतच्या या ठेवणीतल्या चिजा.
-
Aisa Dustar Sansar
मनुष्य रोज भोवताली अनेक गोष्टी पाहत असतो, ऐकत, वाचत असतो. त्यातून त्याचे आयुष्य पुढे चाललेले असते. जीवनात येणारे अनुभव, आठवणी यातून माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न भारत सासणे यांनी ‘ऐसा दुस्तर संसार’मध्ये केला आहे. यातील सात दीर्घकथांमधून विविध स्तरातील माणसांचे झगडणे, जीवनात पुन्हा उभे राहणे व भोवतालच्या परिस्थितीतून जगण्याचे मार्ग शोधणे हे व्यक्त होते. यात त्यांनी वेगळे प्रयोग केले असल्याने वाचकाला नवीन काही वाचायला मिळते.
-
Sattantar
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
-
Gotavla (गोतावळा)
लेखकाच्या सहवासात आलेल्या आणि लेखकाला भावलेल्या व्यक्तींचा खास `कणेकरी’ शैलीत घेतलेला परामर्श
-
Veena's World-Of Beet Southeast Asia (वीणा'ज् वर्ल
बौद्ध संस्कृती व परंपरांचं जतन करणारा पॅगोडांचा देश म्यानमार (बर्मा), कोणत्याही युरोपियन राजवटीपासून स्वतंत्र राहिलेला आणि आज मनोरंजनाचा खजिना ठरलेला थायलंड, रेनफॉरेस्टस्पासून ते आधुनिक शॉपिंग मॉल्सपर[...]