-
Shantaram Paritoshik Katha (शांताराम पारितोषिक कथा
मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या नावे दरवर्षी सर्वोत्तम कथेला दिल्या जाणार्या `शांताराम कथा पारितोषिक’ योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या सातत्याने मराठी कथेसाठी दिले जाणारे हे एकमेव पारितोषिक आहे. गेल्या पंधरा वर्षांत मराठी कथेने जी वेगवेगळी रूपे धारण केली आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांचे जे कवडसे कथांद्वारे साकार केले ते पाहता भिन्नभिन्न कथाकारांनी लिहिलेल्या `शांताराम कथा-पारितोषिक’प्रांप्त गुणवान कथांचा प्रस्तुत संग्रह म्हणजे विविध रंगरूपांनी विनटलेले मराठी कथाविश्र्वातील मनोहर इंद्रधनुष्य आहे. मराठी कथासाहित्य समृद्ध करणारे या संग्रहातील सुमेध वडावाला रिसबूड, प्रिया तेंडुलकर, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, प्रकाश नारायण संत, मेघना पेठे, अनुराधा चिन्मुळगुंद, संजीव लाटकर, राजन खान, राजन गवस, मधुकर धर्मापुरीकर, मोनिका गजेंद्रगडकर, लक्ष्मण लोंढे, श्रीरंग विष्णू जोशी, माधुरी शानभाग हे सर्व कथाकार शांताराम कथापारितोषिकाचे मानकरी आहेत. समकालीन मराठी कथेच्या स्वरूपाचे यथार्थ दर्शन घडविणारा हा संग्रह केवळ वाचनीयच नाही तर संग्राह्य आहे.
-
Ek Manus Ek Divas:2 (एक माणूस एक दिवस भाग : २)
एखाद्या प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीबरोबर एखादा दिवस घालवून त्याबद्दल लेख लिहिण्याची ह. मो. मराठे यांची कल्पना एकदम अभिनवच ठरली. `घरदार’ मासिकातून ही कल्पना त्यांनी राबवली. हे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि वाचक अत्यंत उत्सुकतेने आणि चवीने ते वाचू लागले. एक लेख वाचून झाला की पुढल्या महिन्यात हमो कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीला आपणाला नेताहेत याची वाटच वाचक बघू लागले. कारण, या लेखातून आपणच त्या व्यक्तीच्या सहवासात एखादा दिवस घालवतो आहोत असा अनुभव वाचकांना येऊ लागला. या लेखांच्या रूपाने `पर्सनॉलिटी रिपोर्ट’ चा एक नवा फॉर्म हमोंनी पत्रकारितेला दिलाच, पण त्यांनी शैलीही अशी सिद्ध केली की हे लेख `वृत्तपत्रीय लेखना’च्या पातळीवरून वर उचलेले गेले आणि त्यांना व्यक्तिदर्शनात्मक वाङ्मयीन लेखांचे मूल्य प्राप्त झाले! हमो मराठे यांनी `किर्लोस्कर’मध्ये लिहिलेल्या त्याच लेखमालेतील लेखांचा हा दुसरा भाग! या भागात वाचाः मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, जयंत नारळीकर, बाबा आढाव, विक्रम गोखले, प्रभाकर पणशीकर, शरद जोशी इत्यादी व्यक्तींबरोबर एक दिवस घालवून लिहिलेले लेख.
-
Ek Manus Ek Divas:1 (एक माणूस एक दिवस भाग : १)
एखाद्या प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीबरोबर एखादा दिवस घालवून त्याबद्दल लेख लिहिण्याची ह. मो. मराठे यांची कल्पना एकदम अभिनवच ठरली. `घरदार’ मासिकातून ही कल्पना त्यांनी राबवली. हे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि वाचक अत्यंत उत्सुकतेने आणि चवीने ते वाचू लागले. एक लेख वाचून झाला की पुढल्या महिन्यात हमो कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीला आपणाला नेताहेत याची वाटच वाचक बघू लागले. कारण, या लेखातून आपणच त्या व्यक्तीच्या सहवासात एखादा दिवस घालवतो आहोत असा अनुभव वाचकांना येऊ लागला. या लेखांच्या रूपाने `पर्सनॉलिटी रिपोर्ट’ चा एक नवा फॉर्म हमोंनी पत्रकारितेला दिलाच, पण त्यांनी शैलीही अशी सिद्ध केली की हे लेख `वृत्तपत्रीय लेखना’च्या पातळीवरून वर उचलेले गेले आणि त्यांना व्यक्तिदर्शनात्मक वाङ्मयीन लेखांचे मूल्य प्राप्त झाले!
-
Saki: Bar Aani Restaurant ( साकी : बार अँड रेस्टॉर
वर्षाला दहा कोटी रुपयांचा संगणकाचा व्यवसाय करणार्या पंकज करुलकरांचा हा तिसरा कथासंग्रह. त्यांच्या ‘डायरी’ कथासंग्रहाला राज्य पुरस्कार व श्री. दा. पानवलकर पुरस्कार मिळाले. मराठीत कसदार व उत्कृष्ट कथालेखन केले जात नाही ह्या विधानाला छेद देणारे त्यांचे लेखन आहे. मुंबईसारखे महानगर हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. साधी व सरळ अर्थवाही भाषा, त्यामधून येणारा समृद्ध आशाय, आयुष्याबद्दलची खोल जाणीव ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. मराठी लेखक शब्दांमध्ये, भाषेमध्ये अडकतात. कुरुलकरांचे लेखन त्याला अपवाद. ते तुम्हाला विलक्षण अस्वस्थ करते, त्रास देते. त्यांचा आशय अंगावर येतो आणि श्वास गुदमरून टाकतो. पहिल्या वाक्यापासून त्यांची कथा घेरून टाकते. कुठल्याही स्तरातील माणसाबद्दल ते सहजपणे लिहितात ह्याचे कारण मुंबई त्यांनी फार जवळून बघितली आहे. आयुष्यभरात एखादी गल्ली समजली तरी पुरे असे त्यांना स्वत:ला वाटते. त्यांचे लेखन बघता त्यांना मुंबई शहराची दाहक जाणीव आहे ह्याची खात्री पटते. ते कुठल्याही ‘ईझम’चा झेंडा बाळगत नाहीत, माणसाकडे अगदी स्वच्छपणे बघतात. ते वाचकाचे प्रबोधन करत नाहीत, मास्तरकी करत नाहीत. त्यांच्या व्यवसायामुळेही त्यांच्या लेखनात विलक्षण मोकळेपणा आला असेल.
-
Digambaraa (दिगंबरा)
गोव्यातील एका प्रतिष्ठित जमीनदार घराण्यातील ‘दिगंबरा’ ह्या मुलाची ही आत्मनिवेदनपर कादंबरी.लहानपणापासून कष्टात गेलेले बालपण, मॅट्रिकपर्यंतचे कष्टपूर्वक झालेले शिक्षण, वडिलांचा दुरावा, त्यांनी ठेवलेली रखेली, वडिलार्जित बागायती जमीन प्राप्त करून घेण्यासाठी कराव्या लागलेल्या कोर्टकचेर्या, त्यामुळे आईची होणारी परवड. वेगवेगळ्या नोकर्यांतील कटू अनुभव, पायी केलेली गाणगापूर यात्रा, तिथे भेटलेले साधू व संन्यासी व अन्न भिन्न स्वभावधर्मी माणसे, स्वत:च्या प्रेमानुभवाच्या छटा, इतरांचे लैंगिक जीवन यांचे चित्रण या कादंबरीतून येते. या कादंबरीतील निवेदकाचे आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभव प्रत्ययकारीपणे आविष्कृत झाले आहेत. स्वत:ला आलेले अतींद्रिय अनुभव, अधूनमधून त्या अनुभवांविषयी निवेदकाच्या मतात निर्माण होणारी आशंका, त्याचे स्वप्नदृष्टांत, स्वानुभवांच्या विपरित व विसंगत असणारी त्याच्या सभोवतालची परिस्थिती व त्यामुळे त्याच्या मनाचा होणारा कोंडमारा यांचे वास्तव निवेदन हे या कादंबरीचे बलस्थान आहे.
-
Chidgosh (चिदघोष)
नवकथा ज्या काळात बहराला येत होती, त्या काळात, म्हणजे 1949 साली, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकात आपल्या कथालेखनाला सुरुवात केली. ‘चिद्घोष’पासून ‘प्रस्थान’ पर्यंत या कथालेखनात कधी खंड पडला नाही. अनुभूतीची खोली व विविधता, तंत्राचा जागरूक शोध आणि दीघकर्थेच्या दिशेने वाटचाल ही या काळातील त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये. त्यांची प्रातिनिधिक प्रसादचिन्हे ‘चिद्घोष’मध्ये दिसतील. आज जवळजवळ चार दशकांनंतरसुद्धा या कथांची टवटवी कार्यम राहिल्याचे लक्षात येईल. कथा, कादंबरी, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत गेल्या अर्धशतकापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या ‘चिद्घोष’ या कथासंग्रहास 1966 सालच्या सर्वोत्कृष्ट सहा पुस्तकांस देण्यात आलेल्या ‘ललित’ पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मिळाले होते.
-
Shankhatala Manus (शंखातला माणूस)
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया. स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. पठारे मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जात आहेत. रूढ पारंपरिक कथासमीक्षा दृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक `गांधीजी अकरा सप्टेंबर 2001’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल. पठारे मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचत आहेत, हे हा संग्रह वाचून प्रत्ययास येते. - राजन गवस
-
M T Aayava Maru (एम टी आयवा मारू)
एम टी-मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. `मारू’ म्हणजे जहाज. `आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ – प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. `एम टी आयवा मारू’चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते. फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते... `एम टी आयवा मारू’ हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावत आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहीलः ही काल्पनिक कादंबरी आहे? की सत्य घटनांचे विवेचंन आहे? ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली `आयवा मारू’ तुम्हांला स्वतःला दिसली असेल, जर लाटांचे तांडव तुम्ही स्वतः अनुभवले असेल, जर वार्याचे घोंघावमे तुम्हांला स्वतःला ऐकू आले असेल, जर `आयवा मारू’ ने तुम्हांलाही झपाटले असेल, तर ही `आयवा मारू’ केवळ कल्पित असणे शक्य आहे का?
-
Sun Ja Dil Ki Dasta (सुन जा दिल की दास्तां…)
ससंगीत…, मन, संवेदना, स्पंदनांना मदहोश करणारे अभिव्यक्तीचे एक अत्यंत सुमधूर माध्यम. या माध्यमाला इतक्या कलात्मक लडिवाळपणे सांभाळणारा कलेचा खरा प्रामाणिक उपासक मला आजपर्यंत भेटला नव्हता. संगीताच्या अनुभूती अनुभवतांना देश, भाषा वा कोणत्याही सीमा व्यक्तीला जाणवत नाहीत. एख विशुद्ध आनंद समरस होऊन लुटायची तयारी असणारे मन ज्याच्याठायी आहे त्याने हे सीमातीत सुख भान हरवून उपभोगावे. जयंताचा छंद जणु सुचवतोय- जपण्यासारखे खुप आहे. व्यक्तीचे मन, आवडी-निवडी, भावना, संस्कृती, परंपरा, मूल्य, कला आणि बरेच, बरे… जयंताच्या व्यक्तित्वात आस्था आहे, व्यवहारात माणुसकी आहे, प्रयत्नांना निश्र्चित उद्देश आहे, तथ्यपूर्ण, अर्थपूर्ण लयबद्ध शोधण्याची, जपण्याची ओढ आहे. या सुरांच्या भागीदारीत कशाची अपेक्षा नाही. हृदय, संवेदना, स्पंदनांना जिंकणार्या सुरांच्या बेसुमार वैभवायचे रंग ज्याच्या जीवनात मिसळले आहेत त्या जयंताची भेट घ्या आणि जीवनातील सहजतेत स्वाभाविकपणा शोधण्याची कला शिकून घ्या. जयंत तुम्हाला कानमंत्र देतील ते स्वतःला विसरून जगण्याचा आणि तुमचा निरोप घेतांना दिलखुलास हंसून तुम्हाला ऐकवतील… ``हम है और आपकी खुशी है आजकल, जिंदगी, जिंदगी हैआजकल…’’ त्या क्षणी तुमच्या जागी मी असेन तर निश्र्चित म्हणेन… “My Hats off to You Jayant…!”
-
Cancel (कॅन्सल)
कथाकार आणि कादंबरीकार म्हणून मनोहर तल्हार यांना मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण आणि आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे, ते त्यांच्या ‘माणूस’ या कादंबरीने आणि विपुल कथालेखनाने. त्यांच्या कथेचे परिशीलन करताना ती जीवनाची समग्रता शोधताना दिसते. विविध स्तरांतील जीवनाचा वेध ती सारख्याच मन:पूर्वकतेने घेताना दिसून येते. कथाविषयाकरिता किंवा कथेतील जीवनदर्शनाकरिता ती स्वत:वर कुठलीही बंधने लादून घेत नाही. तशीच ही कथा स्वत:वर कुठलाही तत्त्वविचार, मतप्रणाली लादून घेत नाही. जीवनदर्शनातील ही निकोपता विरळाच म्हणता येईल. मनोहर तल्हार यांच्या कथेतील व्यक्ती सर्वार्थाने जीवनाला सामोर्या जाणार्या आहेत. समृद्ध जीगिषेने त्या जीवनाकडे पाहतात. जीवनसंघर्षात या व्यक्ती अनेकदा पराभूत होतात, हताश होतात; पण तरीही पराभवावर मात करण्याकरिता जटायूप्रमाणे ह्या व्यक्ती संकटांवर तुटून पडतात; रक्तबंबाळ होतात. ह्या संघर्षात मग पराभवाची क्षीणशी जाणीवही त्यांना नको असते. कारण जीवनाच्या सश्रद्ध संघर्षातूनच पुढच्या विजयाच्या पाऊलखुणा त्यांनी ह्या प्रक्रियेतून उमटविलेल्या असतात. स्वत:च्या जीवनेच्छेबरहुकूम नव्या अस्तित्वाच्या पायवाटा निर्माण करणार्या या कथांमधील व्यक्ती मनोहर तल्हारांच्या पृथगात्मतेची आणि असीम जीवनश्रद्धेची निश्चितच प्रतीती देणार्या आहेत. - डॉ. रवीन्द्र शोभणे
-
Kaliyug (कलियुग)
‘मला विकत घेता येणं शक्य आहे असं मालकांना वाटणं यातच माझा पराभव आहे; म्हणूनच मित्रांनो, मी तुमच्या कामगार संघटनेचं, नेतृत्व करण्यास अपात्र आहे’ या भूमिकेतून कामगार लढ्याला रामराम ठोकणारे आणि सध्या काब्रा अँड मल्होत्रा प्रा. लि. चे असोशिएट व्हाइस प्रेसिडेण्ट असणारे कत्रे... पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात कामगार – संघर्ष प्रवेशतो आणि मोकाट सोडतो त्यांच्यातल्या हिंस्र श्वापदाला... औद्योगिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवरची हमो मराठे यांची आणखी एक सशक्त लघुकादंबरी कलियुग.
-
Shrimati Ramabai Ranade Vyakti Ani Karya (श्रीमती
श्रीमती रमाबाई रानडे - व्यक्ती आणि कार्य - लेखक: माधव श्रीनिवास विद्वांस साहाय्यक सरोजिनी वैद्य - ‘’महाराष्ट्रात जुन्या-नव्या विचारांच्या सर्व हिंदू कुटुंबांमध्ये ज्यांचे नाव पूर्ण परिचयाचे झाले होते, ज्यांची मधुरवाणी, गोड स्वभाव, कडक शिस्त, असामान्य कर्तृत्वशक्ती, पतीवरील असीम भक्ती, रावसाहेब रानडे यांच्या सर्व बाबतीतील ध्येयांशी समरस होण्याची उत्कटेच्छा… इत्यादी गुणांमुळे ज्या सर्वांस आदरणीय झाल्या होत्या, त्या परमपूज्य श्री. रमाबाई रानडे ह्यास 26 एप्रिल रोजी 1924 देवाज्ञा झाली… … पुणे सेवासदनची स्थापना आपल्या घरात करून त्या त्या संस्थेशी एकजीव झाल्या. रमाबाईंच्या सर्व प्रकारच्या सामर्थ्याचा विकास संस्थेच्या कार्यात झाला. इतरांची दुःखे आपलीशी करून ती हलकी करण्याचा प्रयत्न करीत असता, त्यांनी स्वतःचे दुःख बाजूस सारले. … त्यांच्या कार्याचा परिघ वाढत होता, कार्ये वाढत होती, त्याबरोबर त्यांचे सामर्थ्यही वाढत होते. साधारणपणे पंचवीस कर्तृत्ववान माणसांनी जे कार्य सहज व्हावयाचे नाही ते कार्य रमाबाईंनी एकट्याने करून इहलोकीची यात्रा संपविली.’’
-
Niramay Kaamjivan (निरामय कामजीवन)
कामजीवन हे श्र्वसन, पचन, निद्रेसारखेच अगत्याचे; तरीही पर्यावरण, आहार, निद्रेविषयी जितकी जागरूकता आढळते, तितकी कामविज्ञानाविषयी आढळत नाही. विवाह पूज्य, मातृत्व पूज्य पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्र्लील मानले जाते. स्त्री-पुरुष मीलनाचा आनंद घेणे नैसर्गिक असले, तरी त्याविषयी उघडपणे चर्चा करणे शिष्टसंमत नसल्यामुळे कामविषयक परंपरागत अज्ञान व गैरसमजुती आजही टिकून आहेत. ही जळमटे नाहीशी करणारा हा ग्रंथ. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर आल्फ्रेड किन्से, डॉ. मास्टर्स व जॉन्सन, डॉ. हेलन सिंगर कॅप्लान यांच्या प्रदीर्घ संशोधनामुळे कामजीवनासंबंधीच्या विचारात जगभर आमूलाग्र बदल घडून आला. कामवृत्ती (Sexual Behaviour) कामप्रतिसाद (Sexual Response), कामअसमर्थता (Sexual Inadequacy) या विषयांची अधिक जाण आली. नपुंसकत्व, शीघ्रपतन, योनिआकर्ष, कामउदासीनता यांसारख्या लैंगिक समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार या ग्रंथात दिले आहेत. लैंगिकता शिक्षणावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. यौवनात पदार्पण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाह, कामक्रिया, विवाहाची अपूर्तता, लैंगिक आगळीक, गर्भधारणा, संततिनियमन, एड्स, गुप्तरोग, जनननिवृत्ती, थोडक्यात-कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतची कामजीवनाची संपूर्ण माहिती सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे हे एकमेव संग्राह्य पुस्तक.
-
Perfect Reciepies(परफेक्ट रेसिपीज् )
स्वयंपाक रुचकर करणे ही जशी एक कला आहे. त्याचप्रमाणे तो झटपट व पाहणार्याच्या नजरेला आकर्षित करून घेणारा हवा, ही सुद्धा एक कला आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन परफेक्ट रेसिपीज् मधल्या पाककृती लिहिल्या गेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला फळफळावळ, धान्ये, मासे, मटण यांच्या खरेदीविषयी आणि टिकविण्यासंबंधी सांगितले गेले आहे. कोणत्याही पदार्थाची चव तिच्या ताजेपणावर अवलंबून असते, हे लक्षात घेऊन विशेषतः मासे, मटण खरेदीविषयी दिलेल्या सूचना स्वयंपाकात रुची असणार्या सर्वांनाच मार्गदर्शन करतील. मसाले, तेल, तूप यांच्या स्वयंपाकातील वापराविषयीच्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत. डाएटसाठी करावयाचे पदार्थही रुचकर करण्यासाठी दिलेल्या सूचना डाएट करणार्या व्यक्तींना दिलासा देतील. व्हेज-नॉनव्हेज स्नॅक्स, भात, पुलाव, चटणी, कोशिंबिरी, भाकरी, परोठे, नान, पुर्या, डेझर्टस्, पक्वान्ने, फराळाचे गोड व चमचमीत पदार्थ, बेकिंग, आईस्क्रीम, ज्यूस, मिल्कशेक इत्यादी प्रांतीय व परप्रांतीय शाकाहारी पदार्थांबरोबरच मासे-मटण-चिकन, विशेषतः आजचे लोकप्रिय मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ, चायनीज पदार्थ इत्यादी पाककृती या पुस्तकातून दिलेल्या आहेत. या पाककृतींचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पाककृती स्वतःबनवून बघितल्यानंतर तिचा परफेक्ट स्वाद जमल्यानंतरच त्या-त्या पदार्थांत वापरलेल्या वस्तूंचे प्रमाण लक्षात घेऊन ती-ती पाककृती लिहून काढली आहे, नव्याने स्वयंपाक शिकू पाहणार्या तरुणींनाही पाककृती करणे/शिकणे सोपे जावे म्हणून वाटी-चमच्यांची मापे दिलेली आहेत. स्वयंपाकाविषयीचे हे परफेक्ट पुस्तक सुगृहिणींना तसेच स्वयंपाक शिकणार्या सर्वांनाच मोलाचे साहाय्य करेल असा विश्र्वास आहे.
-
Annpurana(अन्नपूर्णा )
विद्वान लेखक कै. स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्यत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्सेस्ही केले. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून विविध प्रकारच्या पाककृतींविषयी सातत्याने लेखन. महिलांच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत आणि नियतकालिकांतर्फे भरलेल्या पाककलास्पर्धामध्ये परीक्षक. याच विषयावर इतरत्रही लेखन व प्रात्यक्षिके. विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृद्ध भाण्डार यांच्या आधाराने सिद्ध झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींनी सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.
-
Swa-gat(स्व-गत)
नाना तर्हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात. त्यांतलंच नशिबी आलेलं एक आयुष्य पकडून धावणार्या आणि वाटेत भेटणार्या इतर आयुष्यांविषयी मनात असंख्य प्रश्न मांडणार्या आणि त्यांची उत्तरं हरवून बसणार्या शिवनाथ हरबा ओटवणे याचं हे स्व-गत.
-
Pradashin( प्रदक्षिणा)
व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणं हा दळवींच्या एकूण साहित्याचा केंद्रबिंदू. माणसाच्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाचा संबंध बहुतेक वेळा दळवींनी स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला आहे. लैंगिकता, वेड आणि वेदनेची विविध रूपं दळवी कादंबर्यांतून न्याहाळतात. दळवींच्या बर्याच कथा-कादंबर्यांतून दिसणारं विजोड संसाराचं चित्र हे त्यांच्या ऐकीव अनुभवांतून उभं राहिलेलं आहे. या संसारचित्रांतील स्त्री-पुरुष संबांधाचा विशेष हा की हे संबंधसुखाचे नाहीत, सुरळीत नाहीत, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मग ते संबंध विवाहपूर्व असोत; विवाहोत्तर असोत किंवा वैधव्यदशा वा विधुरावस्थेतले असोत! दोघांपैकी एकानं पुरतं उद्ध्वस्त व्हावं, दुसर्यानं ते उद्ध्वस्त होणं सुन्न मनाने बघावं, आणि बघताबघता अखेर त्या नजरेतील ओळख हरवून जावं, असेच या अनुभवांचे स्वरूप असतं. ‘प्रदक्षिणा’ या दळवींच्या कादंबरीतूनही मानवी नातेसंबंधातल्या गुंतागुंतीविषयी दळवी आपले निरीक्षण मांडतात. एका नाटककाराच्या आयुष्याविषयी- त्याचा कलंदरपणा आणि शेवटी त्याची झालेली शोकात्मिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीतून दळवींनी केले आहे. नाटककार आणि त्यांची पत्नी – त्यांच्यातील ताणतणाव, नाटककाराच्या मुलींच्या आयुष्याची झालेली परवड याचे सुन्न करणारे दर्शन इथे घडते. आणि हे सर्व घडत असताना अवतीभवतीचा समाज, त्यातल्या व्यक्ती, त्यांचे अंतर्गत ताणतणाव यांबद्दलचे दळवींचे भान कधी सुटत नाही, याचा प्रत्यय त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या कादंबरीतूनही येतो.
-
Mahananda (महानंदा)
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका ‘जुगारा’चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !