-
Spy Princess
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुस-या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून ! नसानसांत अपार धौर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...
-
Jyacha Tyacha
मळलेल्या वाटांची मिरासदारी जरा दूर झटकून, नेहमीचे थांबे, वळणं आणि रुजलेल्या खुणा यांसकट नियम-रिवाजांना अलगद बगल देऊन, नवं काही शोधलं जातं, संपूर्ण परिघाबाहेरचं... तुम्हाला खिळवून ठेवणारं, अंतर्मुख करणारं... अशीच अनुभूती देतो 'ज्याचा त्याचा'
-
Admya Jiddh
अदम्य जिद्द' हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. 'अदम्य जिद्द' हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणा-या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार ! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.
-
Dabewala
बिझनेस अनेक चढउतारांतून पार पडत असतात. त्यांतील काही टिकून राहतात, तर काही कालौघात नामशेष होतात. कंपनीप्रमुख या चढउतारांशी संघर्ष करत असतानाच आपापल्या संस्था चिरकाल टिकून राहण्यासाठी टिकाऊ 'मॉडेल' च्या शोधात असतात. मुंबईतले डबेवाले त्यांचा उद्योग गेली 115 वर्षे टिकवून आहेत. अर्धशिक्षित लोकांचा हा दीर्घकाळ टिकलेला उद्योग एक अपूर्व उदाहरण बनला आहे. चार पात्रांच्या संवादातून उलगडणा-या या विलक्षण उद्योगकथेत यशस्वी संस्थानिर्मितीसाठी आवश्यक असणा-या महत्त्वपूर्ण मुद्यांवरील चिंतन आहे. यशाची साथ लाभलेल्या बिझनेसच्या या कहाणीत नेते व व्यवस्थापक यांच्यासाठी अनुभवसिद्ध मार्गदर्शन आहे.
-
The Breadwinner
अफगाणिस्तान, तेथील तालिबानी राजवट ह्यांच्या अंगावर शहारे आणणार्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. काही लेखांतून तेथला खुनशीपणाही जाणवला आहे. ही कादंबरी त्याचे मूर्तिमंत चित्रच आपल्या डोळ्यांपुढे उभी करते. सामान्यत: स्त्री जीवन हे कठीणच मानले जाते परंतु तेथे तर ह्या कठीणतेने परिसीमाच गाठली होती म्हणूनच परवानासारख्या मुलीवर तेथे 'मुलगा’ होऊन वावरण्याची पाळी आली होती आणि संधी मिळताच पाकिस्तानातील जिणेही काही सुखावह नाही हे माहिती असूनही तिकडचीच वाट धरावी लागली होती-सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असू शकते हे नकळत पटवून देणारी कादंबरी.
-
Parvana
एकेकाळी फळांनी लगडलेल्या वृक्षांनी,गव्हाच्या शेतांनी आणि भाजीपाल्याच्या लागवडीने हिरवागार असणारा, खळाळत्या नद्यांचा मध्य आशियातील चिमुकला देश- अफगाणिस्तान. या देशावर आक्रमण करणार्या घुसखोरांच्या टोळ्यांनी हा देश संपूर्णपणे बेचिराख करून टाकला. सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारच्या विरोधात अमेरिकेच्या हस्तक टोळ्यांनी १९७८ साली उठाव केला. तेंव्हापासून अफगाणिस्तान युद्धाच्या खाईत अखंड जळतो आहे. सोव्हिएत रशियाबरोबरच्या युद्धात मारल्या गेलेल्या अफगाणी स्त्री- पुरुषांची अनाथ, निराधार म्हणून वाढलेली मुलं, हे 'तालीबान' बनले. अमेरिकेच्या छुप्या मदतीने पाकिस्तानात ते तयार केले गेले. कडव्या संतापानं पेटलेलं हे तालीबानी तारुण्य मारण्यासाठी मरण्यासाठीही तयार होतं. कित्येक वर्षांच्या युद्धानं मोडकळीस आलेल्या, उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानात तालिबान्यांचा हैदोस सुरू झाला. युद्धाचे निखारे, आगीचे लोळ, बॉम्बच्या धमाक्यांनी उध्वस्त झालेल्या इमारतींचे सांगाडे, दगडमातीचे ढिगारे, बेचिराख भूमीवर भुकेल्या, आजारी शरीरांच्या झुंडी, कित्येक महिन्यात प्रकाशाचा स्पर्शच न झाल्यामुळे फिकुटलेल्या, अशक्त स्त्रिया, जन्मल्यापासून घराच्या बाहेरच न पडलेली, हातापायांचे सांधे आखडून लोळागोळा झालेली मुलं.... सुन्न करणारं पशुत्व.... आणि रक्तामासाच्या चिखलातसुद्धा मुळं धरणारी निखळ माणुसकी.... हे सर्व या कहाणीतून तीव्रतेने प्रहार करतं. इतक्या पराकोटीच्या परिस्थितीत केस कापून, मुलाचे कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर पाय ठेवणारी, युद्धाच्या विध्वंसात जगणं शोधणारी, स्वत:च्या हिंमतीवर जगणारी परवाना ही धैर्याचं, जीवनेच्छेचं आणि अम्लान माणुसकीचं प्रतिक ठरते. 'द ब्रेडविनर' मधून तिची ही कहाणी प्रथम पुढे आली. आणि 'परवाना' मध्ये तिच्या त्यानंतरच्या रानोमाळ केलेल्या भटकंतीचं हृदयद्रावक चित्रण आहे. अत्यंत भेसूर, उजाडपणातही तिच्या मनातला माणुसकीचा पाझर सुकलेला नाही. दगडमातीच्या ढिगार्यात अडकलेले तान्हुले, अपंग झालेला आसिफ, बेसहारा झालेली लैला यांना घेऊन जीवनाकडे जाण्याची तिची जिद्द आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. विध्वंसातही टिकून राहणारी, जगू पाहणारी माणुसकी हृदयाचा ठोका चुकवते.
-
Coma
बोस्टनमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांच्या मामुली शस्त्रक्रियांपासून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. आठ क्रमांकाच्या खोलीत एकदा गेलेले रुग्ण पुन्हा शुद्धीवर येतच नव्हते. या कोमा केसेसच्या छडा लावण्यासाठी मेडिकलच्या एका विद्यार्थिनीने त्यासाठी जिवाची कशी बाजी लावली आणि तसे करून तिच्या हाती काय जीवघेणे लागले त्याचीच ही वाचता वाचता अंगावर शहारे आणणारी कादंबरी. तसे हे काल्पनिक आहे आणि वाचणार्यालाही कदाचित असे घडते का असे वाटू शकेल पण गेल्या काही वर्षात परदेशातच नव्हे तर आपल्याही देशात हे काहीच नाही अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत त्यामुळे लेखकाने खूप आधीच ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केल्याची कमाल वाटते. मराठीतही हा अनुवाद येऊन पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. आत्ताआत्ता प्रसिद्ध झाली आहे ती त्याची पाचवी आवृत्ती.
-
Shrimaan Yogi
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे. शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी. रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.
-
Nostrademaschi Bhavishywani
ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल... तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल... तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनीस नगरी
-
Wise and Otherwise ( वाइज अँड अदरवाइज )
इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना 'द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं करत असणार्या या लेखिकेने 'द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे 'तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन 'इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे.
-
Ek Asto Builder
ही आहे, एका बिल्डरची रोमहर्षक कहाणी. ह्यामध्ये उत्तुंग इमारतींमागची यशोगाथा आहे. त्याबरोबरच खंडणी, धमक्या आणि फसवणुकीची भयकथाही आहे. जीवनावर भरभरुन प्रेम करणारा हा बिल्डर, प्रत्यक्षात एक शेतकरी आहे. शेतातली उत्पादनं एक्स्पोर्ट करणारा एक व्यापारी आहे. तो कलांचा चाहता आहे आणि एका अखंड दानयज्ञाचा यजमानही आहे. ह्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे, डॉ. सुधीर ग. निरगुडकर ! ‘मी कोणी असामान्य कर्तृत्त्वाचा माणूस आहे’ असा त्यांचा अजिबात दावा नाही. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की ‘एक सामान्य माणूसही काहीतरी बरं काम करू शकतो. हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.’