-
Nirjan Pool (निर्जून पूल)
राजकीय इतिहासाची एक अशी तप्त आत्म कहाणी जिने तेलुगू साहित्य विश्वात वादळ निर्माण केले. आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे संस्थापक दिवंगत कोंडापल्ली सितारामय्या यांची पत्नी कोंडापल्ली कोटेश्वराम्मा यांची ही आत्मकथा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा उठाव आणि आंध्रप्रदेशमधील नक्षल चळवळ हे सर्व जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या, या सगळ्याचा एक भाग असलेल्या अशा या लेखिका आहेत. चाळीसच्या दशकात त्या भुमीगत आयुष्य जगू लागल्या. त्यांचे पती कोंडापल्ली यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि साथीने कोटेश्वराम्मा यांना जगण्याची आणि लढण्याची ताकद मिळाली. पण नंतर जेव्हा ते कोटेश्वराम्मा यांना सोडून गेले तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला. पुढचा एकटीचा वेदनादायी प्रवास कोटेश्वराम्मा यांनी धाडसाने आणि मानाने केला. त्या शिकल्या, नोकरी करू लागल्या. आपल्या नातवंडांना त्यांनी वाढवलं. त्या कविता लिहू लागल्या. एक वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वत: निर्माण केले. ही त्यांची आत्मकथा म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीमधील त्यांच्या धाडसाचा आणि दृढतेचा पुरावा आहे. त्यांना जाणवलेल्या माणसांच्या आणि राजकीय संस्थांच्या वृत्ती त्यांनी यात मांडल्या आहेत. भारतीय स्त्रिया कठीण परिस्थितीचा सामना करतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्या कोटेश्वराम्मा यांच्यासारख्या यशस्वी सुद्धा होतात हे सांगणारी ही आत्मकथा आहे.
-
Mark Twainchya Nivadak Katha (मार्क ट्वेनच्या कथा)
‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.
-
Runanubandh (ऋणानुबंध)
दुसऱ्यांच्या घरात केअरटेकर म्हणून राहताना नावाच्या आणि मुलाच्या प्रेमाला पारख्या झालेल्या नीलाताई...आईच्या अंत्ययात्रेत परक्यासारखं सामील व्हावं लागलेले गणेश जोशी...आयुष्यभर अहंकाराने पछाडलेले आणि जीवनाच्या संध्याकाळी नात्यांचं महत्त्व पटलेले डॅडा...स्वार्थी मुलाला धडा शिकवणारी लक्ष्मी... ‘डिव्होर्स’ घेता न आल्याचं शल्य आयुष्यभर मनात बाळगणारी निमाकाकी...जीवनभर दु:ख सोसल्यानंतर वृद्धपणी समाजाची वेगळ्या प्रकारे सेवा करणारे दादा...गर्भश्रीमंत तरुणाला नाकारणारी अनाथाश्रमातील बाणेदार सरिता...विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मानवी मनाचा वेध घेणाऱ्या , मानवी जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कथा
-
Marathi Daulatanche Nari Shilpa (मराठी दौलतीचे नार
जिजाबाईंच्या शिवरायांनी स्थापन केलेली मराठी दौलत ते ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणणारी मराठमोळी राणी. या संपूर्ण मराठी दौलतीच्या कारकीर्दीमध्ये अनेक स्त्रियांचा अनन्य साधारण हातभार आहे. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग १ चे निवृत्त अधिकारी, कथालेखक, इतिहास अभ्यासक-लेखक गोपाळ देशमुख यांनी अशी मराठी दौलतीची नारी शिल्पं या पुस्तकात रेखाटली आहेत. भोसले राजघराण्यातील जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, सरदारांतील उमाबाई दाभाडे, दर्याबाई निंबाळकर, पेशव्यांमधील गोपिकाबाई, पार्वतीबाई , रमाबाई ते अहिल्याबाई होळकर. पुस्तकातील पंधरा प्रकरणांतून मराठी सत्तेतील धडाडीच्या स्त्रियांची कर्तबगारी अभ्यासपूर्वक, ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषेत सांगितली आहे.
-
Khujaba (खुजाबा)
या विज्ञान कथासंग्रहा बारा कथा आहेत आणि प्रत्येक कथा ही स्वतंत्रपणे विज्ञान संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे. या कथांमध्ये विज्ञान हाच खरा नायक असल्याने, विज्ञानाचा परिसस्पर्श जागोजागी जाणवेल यात शंका नाही. शिवाय, मूळ विज्ञानाच्या वाईटसाईट गोष्टींची उकल झाल्याचे निश्चितच दिसेल. ‘अपहरण’ ही कथा संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणारी व त्याचा व्याप मांडणारी आहे. तर ‘आगंतुक’ ही कथा अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाला संजीवनी देणारी व मानवी स्वभावाचे विघातक दर्शन घडवणारी आहे. तसेच, ‘साक्षीदार’ ही कथा मृत व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती संचयाचे चित्रण करणारी आहे. ‘अज्ञात जीवाणू’ ही कथा जीवाणूंच्या डीएनए व जनुकांचा अभ्यास करताना, परग्रहावरील जीवाणूच्या शोधाचा परिपाक आहे. विविध विज्ञान संकल्पनांतून साकारलेल्या रंजक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Shall We Tell The President? (शाल वी टेल द प्रेसिड
फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशनला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. ज्या पाच लोकांना या कटाची तपशीलवार माहिती असते, त्यातील चारजणांचा गूढ रीतीने मृत्यू होतो. ही सर्व माहिती एफ.बी.आय.चा एजंट मार्क अॅण्ड्र्यूज याला असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला समजते. फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जीवालाही धोका असतोच! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली उत्कंठावर्धक कहाणी. ‘शल् वी टेल द प्रेसिडेन्ट.’
-
Felanee (फेलानी)
सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक म्हणजे धाडसाची, वांशिक लढ्याची - हिंसेची आणि तग धरून जिवंत राहिल्याची कथा आहे. आतापर्यंतच्या आसाम मधील दोन मोठ्या आंदोलनांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. यांचे राजकीय चित्रण या पुस्तकात आहे. आसामच्या लोकप्रिय कादंबरी लेखिकेने या पुस्तकात सत्ता स्पर्धेमध्ये दिसणारा मानवी जीवनाविषयीचा अनादर आणि अनास्था, सत्तेसाठी चाललेला किळसवाणा खेळ, त्यात सामील झालेल्यांचा ढोंगीपणा आणि वांशिक हिंसेची भयानकता यांचे कठोर आणि निर्भीड शब्दात चित्रण केलेले आहे. पुस्तकाची भाषा आणि एकामागोमाग येणाऱ्या घटना यामुळे श्वास रोखून वाचत जावे असे हे पुस्तक आहे.. फेलानी नावाच्या आसामी स्त्रीच्या अनुभवांभोवती हे कथानक गुंफलेले आहे. `फेलानी` या शब्दाचा अर्थ `फेकून दिलेली` असा आहे. कारण दंगलीमध्ये पेटलेल्या गावात तसेच टाकून फेलानेची आई निघून जाते. फ़ेलानेला दलदलीमध्ये फेकून दिले जाते. पण फेलाने आणि तिच्या सारखे हजारो अशाही परिस्थितीतून वाचतात. स्वतःचे मूळ हरवून बसलेली ही निरनिराळी माणसे रेफ्युजी कॅम्पस मध्ये एकत्र जगतात, आसामी नद्यांच्या खोऱ्यात एकत्र रुजतात, वाढतात. त्यांच्या या प्रवासाच्या कथा फेलानेच्या नजरेतून पुस्तकात सांगितल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमीवर निर्माण झालेले हे सत्तेचे, संघर्षाचे, जिवंत राहून जगत राहिलेल्यांचे कथानक आहे.
-
The Lost City of Z (द लॉस्ट सिटी ऑफ Z)
अॅमेझॉन! जगातली सर्वांत मोठी नदी आणि तिच्या खोऱ्यात पसरलेले जगातले सगळ्यात मोठे जंगल. त्याला ते हरवलेले शहर – झेड शहर आणि ती नाहीशी झालेली संपन्न संस्कृती शोधायची असते; पण जंगलात गेल्यावर काही महिन्यांत तो नाहीसा होतो. त्याच्या शोधात गेलेले निम्मे लोक परत येत नाहीत. त्यानंतर डेव्हिड ग्रॅन नावाचा अमेरिकन पत्रकार फॉसेटच्या शोधात अॅमेझॉनच्या जंगलात जातो, जिथे सर्वाधिक आक्रमक जंगली जमाती राहत असतात.ऐंशी वर्षांपूर्वी जंगलात नाहीशा झालेल्या फॉसेटचा माग काढण्यासाठी, आपले गोजिरवाणे कुटुंब आणि रांगता मुलगा घरी सोडून जाणाऱ्या लेखकाला तिथे काय सापडते? हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा – द लॉस्ट सिटी ऑफ झेड.
-
Nate Bramhandache (नाते ब्रह्मांडाचे)
मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर, सत्तेच्या संरचनांवर, वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे, लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू `काळाच्या` प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश, त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.
-
Rahasya Prachin Natarajache (रहस्य प्राचीन नटराजा
अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात “NOT TOO LONG BEFORE WE CAN GET AS MANY OF THEM 3-D PRINTED.” THAT PRETTY MUCH SUMS UP JOSH WINSLOW’S FEELINGS ABOUT CLASSIC ARTIFACTS. AS A MAN OF SCIENCE AND TECHNOLOGY, HE COULDN’T CARE LESS ABOUT OLD BRONZE IDOLS. UNFORTUNATELY, HIS BROTHER TOM HAS JUST MADE ONE SUCH IDOL HIS PROBLEM. VIDYA THYAGARAJAN, A YOUNG BANKER येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाNया एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?
-
Honour Among Thieves (ऑनर अमंग थीव्हज)
१९९१ च्या आखाती युद्धात अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केल्यावर, सद्दामने त्याचा बदला घेण्याचा बेत केला. सद्दामने वापरलेले सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे माणसाची हाव. अमेरिकेतल्या नामांकित गुन्हेगारांना हाताशी धरून, सद्दामने अमेरिकेचा मानबिंदू असणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हस्तगत करण्याचा धाडसी बेत आखला आहे. त्यासाठी त्याने शंभर मिलियन डॉलर्सचे आमिष गळाला लावले आहे. जाहीरनाम्याची मूळ प्रत ताब्यात घेऊन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी जगभरातील वार्ताहर बोलावून त्यांच्यासमोर त्याचे जाहीर दहन करायची सद्दामची योजना आहे. सद्दामच्या या कारस्थानात अडथळा आहेत दोन व्यक्ती. स्कॉट ब्रॅडली, एकीकडे येल विश्वविद्यालयातील घटनात्मक कायद्याचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला सीआयएचा उगवता तारा, जो कधीचाच प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी आहे हान्ना कोपेक, मोस्साद या इस्रायली गुप्तहेर संस्थेची देखणी हस्तक; १९९१ च्या युद्धात तिने तिचे अख्खे कुटुंब गमावलेले आहे. सद्दामचा सूड हे आता तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. शह-काटशह, कट-कारस्थाने आणि वळणावळणांनी भरलेली ही वेगवान कथा वाचकांना खिळवून ठेवते.
-
Dreams Of Joy (ड्रीम्स ऑफ जॉय)
जॉय ही एकोणीस वर्र्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवNयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.
-
The Women In The window (द वूमन इन द विंडो)
२४ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होणाऱ्या या कहाणीची नायिका आहे, मॅनहॅटनमध्ये एका भव्य घरात एकटीच राहणारी, बाल मानसशास्त्रज्ञ असलेली, ३८ वर्षांची अॅना फॉक्स! सुरुवातच अॅनाच्या हेरगिरीपासून होते. ती स्वतःच्या घरातून आजूबाजूच्या घरांवर आणि त्यातल्या लोकांवर आपल्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून असते. गेले दहा महिने तिने स्वतःच्या घराचा उंबरादेखील ओलांडलेला नसतो. अॅगोराफोबिया असल्याने घरातून बाहेर पडण्याची तिला नेहमी भीती वाटत असते. तशीच ती सातत्याने अगदी सराईतपणे मद्यपान करते. तिला जुन्या जमान्यातले उत्तमोत्तम कृष्ण-धवल चित्रपट पाहण्याचा छंद आहे. तिने आपल्या तळघरामध्ये डेव्हिड नावाच्या एका पेइंग गेस्टला राहायला जागा दिलेली आहे. तिच्या बोलण्यामधून समजते की, तिचा नवरा एड आणि ८ वर्षांची तिची मुलगी ऑलिव्हिया हे दोघेही तिच्यापासून दूर कुठेतरी राहत आहेत आणि ती त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. अॅनाचे डॉक्टर आणि बिना ही तिचा व्यायाम घेणारी स्त्री हे दोघे अॅनाच्या घरात अधूनमधून ठरावीक काळाने येत असतात. त्यांना अॅनाबद्दल काळजी वाटते.
-
Setubandhan (सेतुबंधन)
रामाच्या जन्मापासून ते त्याने जलसमाधी घेईपर्यंतचा त्याच्या जीवनाचा समग्र प्रवास या कादंबरीतून चित्रित केला आहे. अर्थातच विश्वामित्रांच्या सान्निध्यातील राम-लक्ष्मण यांचे जीवन, राम-सीता आणि रामाच्या अन्य बंधूंचा विवाह, रामाच्या राज्याभिषेकाची दशरथाने केलेली घोषणा, त्यावर वैÂकयीने रामाला चौदा वर्षं वनवासात पाठवण्याचा धरलेला हट्ट, राम-लक्ष्मण सीता यांचं वनवासातील जीवन आणि वनवासादरम्यानच्या घटना...जसे रामाने केलेला अहल्येचा उद्धार...रावणाने सीतेचं केलेलं अपहरण...हनुमान-सुग्रीवासह रामाला भेटलेली वानरसेना...राम-रावण युद्ध...रावणाचा मृत्यू...सीतेचं अग्निदिव्य...राम-लक्ष्मण-सीतेचं वनवास संपून अयोध्येत आगमन...रामाचं राज्यारोहण...लोकापवादावरून गर्भिणी सीतेचा रामाने केलेला त्याग...रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी लव-कुश या त्याच्या पुत्रांशी त्याची झालेली भेट...आणि कालांतराने रामाची झालेली अवतारसमाप्ती...रामायणातील मुख्य आणि उपकथानकांमधून निर्माण झालेल्या उत्कट भावनाट्याचा नवरसपूर्ण आविष्कार
-
Maza Anand (माझा आनंद)
प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो आनंद दिघे साहेब यांचं व्याQक्तमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, मग मेकअप असो, २८ दिवसांत साडेसात किलो वजन घटवायचं असो, शूटिंगदरम्यानची धावपळ असो विंÂवा प्रत्येक शॉटसाठी तयार होणं असो त्यांनी या रोलसाठी घेतलेले अपार कष्ट त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक घटकाचं (दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई इ.) या चित्रपटासाठीचं योगदान त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आनंद दिघे साहेबांचे शिष्य माननीय एकनाथ शिंदे (आताचे मुख्यमंत्री) त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटासाठी, प्रसाद ओक यांना त्यांच्या भूमिकेसाठी दिलेलं आत्मिक बळ थोडक्यात, ‘धर्मवीर’साठी निवड झाल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा प्रवास, अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात उठलेले भावतरंग म्हणजेच ‘माझा आनंद.’
-
Tell Tale (टेल टेल)
जेफ्री आर्चरच्या चौदा कथांचा हा अनुवादित संग्रह आहे. ‘मेअरला कुणी मारलं?’ या कथेतला तरुण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडतं, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कसं बदलून जातं, ते ‘दमास्कसच्या वाटेवर’ या कथेत वाचा. ‘सद्गृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३०च्या दशकात आय. व्ही. लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरुण विद्यार्थिनी एका म्हाताऱ्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमकं भेटतं तरी कोण, हे जाणून घ्या ‘वाया गेलेला तास’ या गोष्टीतून. धक्कादायक शेवट असलेल्या रोचक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Vyaktivedh Sharad Pawar Te Govind Pansare (व्यक्ति
साहित्य, संस्कृती, इतिहास यांची जाण असणारे शरद पवार भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम सिने-नाट्य कलावंत, लेखक सूर्यकांत सिने कलावंत चंद्रकांत यांची चित्रकारिता फारसी भाषेत असणारा मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा खजिना मराठीत आणणारे सेतुमाधवराव पगडी ऐतिहासिक साधन साहित्य संपादन-प्रकाशनातून समोर आणणारे थोर इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार...‘थोरातांची कमळा’ या दंतकथेला विराम देणारे मु. गो. गुळवणी निरपेक्षपणे इतिहास संशोधन करणारे समुद्रगुप्त पाटील शाहू महाराजांच्या दिलदारपणाचं दर्शन घडविणारे दादा महाराज सांगवडेकर बुिद्धप्रामाण्यवादी नास्तिक विचारवंत भाई माधवराव बागल लोकशिक्षणास वाहून घेतलेले मालोजीराजे निंबाळकर इतिहास आणि इतिहासेतर क्षेत्रातील व्यक्तींचा ओघवत्या भाषेत घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
-
Shivchatrapatinchi Swarajyachi Sankalpana (शिवछत्र
शिवछत्रपतींची स्वराज्याची संकल्पना ही हिंदुत्वाला जाग आणणारी ठरली.शिवचरित्रातून सर्व विश्वालाच नवप्रेरणा मिळाली.मराठ्यांचे झेंडे अटकेपार गेले, ते शिवरायांच्या पराक्रमाने,द्रष्टेपणाने व समदर्शीवृत्तीमुळे.पारतंत्र्याच्या अंधारात अतोनात कष्ट घेऊन त्यांनी स्वातंत्र्याचे दीप उजळविले.शिवचरित्रातील जगदंबाशक्तीने तर अनेकांना प्रेरणा दिली व चकित केले.महाराजांची ‘भवानी तलवार’ त्यांच्या यशोगाथेच्या पराक्रमाची साक्ष देते.आजही ही तलवार लंडनच्या बविंÂगहॅम पॅलेसमध्ये आहे.इस्लामी सावट,अफझलखान वध,दुर्गनीति,जाणकारांची पारख शिवरायांना होती.दादाजी कोंडदेव,जिजाऊ व कुशल अध्यापकांच्या सहवासात महाराज घडले. धर्म,विचार,संस्कार,स्वयंप्रेरणा,सावधानता,अष्टावधानीवृत्ती व द्रष्टेपणाने या रयतेच्या राजाने हिंदवी स्वराज्य उभारलं.धूर्त ब्रिटिशही मग याकडे वाकड्या नजरेने पाहू शकले नाहीत.इतवंÂ सुसज्ज महाराजांचे आरमार होतं. पुढील पिढ्यांनाही कायम शिवरायांचे कार्यकर्तृत्व प्रेरणा देणारे ठरले.
-
Rajarshi Shahu Chatrapati Ani Samajik Nyay (राजर्ष
‘राजर्षी शाहू छत्रपती आणि सामाजिक न्याय’ या छोटेखानी पुस्तकातून आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे कार्य व दीन-दलित-पतितांविषयीची तळमळ दिसून येते.सामाजिक न्याय,सत्यशोधक चळवळ,संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे कलेसाठीचे कष्ट,शाहू छत्रपती व पॅलेस थिएटर,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मधील बहुजन समाजातील विद्याथ्र्यांचे जीवन,शाहूपंचसूत्री आजही देशाला मार्गदर्शक ठरते.या सर्व अकरा लेखांतून छत्रपती शाहूंचे कौटुंबिक,सामाजिक,शैक्षणिकविचार व द्रष्टेपण दिसते. कलेविषयीची आस्था,जाण, केशवराव भोसले या अभिजात कलावंताविषयीचे प्रेम-जिव्हाळा,‘ललित कलादर्श’ची निर्मिती,याचे शाहूराजेंना कौतुक होते. म्हणूनच बालगंधर्व,केशवराव या दिग्गजांचे संगीतनाट्याचे प्रयोग कोल्हापुरातील सामान्य जनतेलाही पाहायला मिळावेत,म्हणून त्यांनी ‘पॅलेस थिएटर’ची निर्मिती केली.मराठी नाटकातील ‘मखमली पडदा’ ही केशवरावांची महाराष्ट्राला मिळालेली कलात्मक देणगी.बदलत्या परिस्थितीत सामाजिक-सांस्कृतिक न्याय,स्त्रीजातीचा कैवार यांविषयी आवाज उठवून शाहूराजेंनी अन्यायाविरोधात कायदे केले.आंतरजातीय विवाह हा शाहूराजांनी स्वत:च्या बहिणीस होळकर कुटुंबाला देऊन जातीभेद नाहीसा केला.विधवा पुनर्विवाह,घटस्फोट वारसा हक्क,देवदासी प्रतिबंध कायदा,स्त्रीला क्रूर वागणूक दिल्यास प्रतिबंध, या कायद्यांची अंमलबजावणी केली.बाराव्या शतकातील बसवेश्वर महाराज हे गौतम बुद्धांचे वारसदार,तर शाहू महाराज हे बुद्ध व बसवेश्वर या दोहोंचे वारसदार बनले.बहुजन समाजाचे वाली महात्मा पुÂले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहला.सत्यशोधक समाजाची स्थापना केली.हे सत्याचे प्रयोग शाहूराजांनी राबवले.मुला-मुलींना शिक्षणवाट मोकळी केली.देशातील धर्मांधतेचा धोका ओळखला. जातिद्वेष,वर्णद्वेष,धर्मद्वेष,प्रांतद्वेष अशा अनेक समस्यांनी आजही भारताला घेरलंय. राजकारण, सत्ताकारण व स्वार्थाला थारा न देता, शाहू-पुÂले-आंबेडकर या राष्ट्रपुरुषांचे विचार नवभारताला प्रेरणादायी ठरणारे आहेत.
-
Berlin Gangela Milale (बर्लिन गंगेला मिळाले)
जर्मनीतील हैडेलबर्ग या हिंदू धर्माचा प्रभाव असलेल्या शहरातील म्यूलर कुटुंबाची ही कथा. मानफ्रेड म्यूलर आणि त्यांचा मुलगा फ्रान्झ म्यूलर हैडेलबर्ग विद्यापीठात भारतीय संस्कृतीचे प्राध्यापक असतात आणि हिंदू धर्माचे चाहतेही. एर्ना ही फ्रान्झची पत्नी. तिला मात्र हिंदू धर्माविषयी चीड असते. मानफ्रेड यांच्या मृत्यूनंतर फ्रान्झ भारतात जाऊन संन्यास घेतो. तिथेच राहतो. एर्ना-फ्रान्झचा मुलगा अल्बर्ट. त्याला मात्र हिंदू धर्मापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न एर्ना करत असते. त्यात ती बऱ्यापैकी यशस्वीही होते; पण फ्रान्झच्या भारतातील मित्राची मुलगी भारती जर्मनीला शिक्षणासाठी येते आणि म्यूलर कुटुंबात राहायला लागते. तिच्यात आणि अल्बर्टमध्ये प्रेमांकुर फुटतो , त्यांच्या जवळिकीतून भारतीला दिवस जातात. दरम्यान, फ्रान्झचा मृत्यू होतो. भारतीमुळे अल्बर्टही हिंदू धर्माकडे आकर्षित होतो; पण एर्नाच्या भीतीने भारतातील नोकरी नाकारतो. भारती आणि अल्बर्टला प्रश्न पडतो की, एर्नाला आपल्या प्रेमाविषयी, भारतीच्या गरोदरपणाविषयी कसं सांगावं. कसा सुटतो हा तिढा?
-
Dadaji Kondev Kon Hota ( दादाजी कोंडदेव कोण होता)
दादाजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते...शिवाजी महाराजांनी समुद्री किल्ले बांधून परकीयांना शह दिला... शिवरायांची प्रधान मंडळ-नीती... पाच छत्रपतींची सेवा करण्याचा बहुमान लाभलेले रामचंद्रपंत अमात्य यांचं कार्यकर्तृत्व... दामाराजा नामक भिल्लाने सुरतेच्या स्वाNयांच्या वेळी शिवरायांना केलेली मदत...स्वराज्याची पहिली लढाई आणि ती लढणारे बाजी पासलकर यांची कामगिरी... महाराजांच्या पायदळाचा सेनापती नूरबेग... अफजलखानाच्या वधाच्या वेळी खानाच्या सैन्यावर तुटून पडलेल्या सैन्याचं नेतृत्व करणारे एक सेनानी कमळोजी साळुंखे...औरंगजेब सहिष्णू होता आणि हिंदू देवस्थानांच्या बाबतीत उदार होता, या मताचा परामर्श... कॉ. गोविंद पानसरे यांच्या छोटेखानी शिवचरित्राचा ऊहापोह... ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाचा परामर्श... कवी भूषण...रायगडावरील मेघडंबरी... तेरा अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह
-
Gaon Tethe Deo (गाव तेथे देव)
< BACKNext > GAON TETHE DEV by B. D. KHER 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Availability : Available ISBN : 9789394258891 Edition : 2 Pages : 176 Language : MARATHI Category : NOVEL Quantity 1 INR 250.00+ ADD TO CARTBuying Options: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube आंबेगाव हे कोकणातील एक छोटंसं गाव. शिवाजीराव भोसले हे गावातील ुप्रतिष्ठित जमीनदार. पिढीजात किती जमीन त्यांच्या नावाने आहे. आंबेगावात भोसल्यांचं पुढाकाराचं घराणं सर्वांत जुनं. ब्राह्मणाची चार घरं; बाकी सर्व गाव मराठ्यांचा व कुळवाड्यांचा. पण कुणी मोठा नाही; कुणी धाकटा नाही. सगळे एकोप्यानं राहत. पोटापाण्याचा प्रश्न आला, तर गावकरी शिवाजीरावांकडे धाव घेत. दैवी संकट आलं की त्र्यंबकगुुरुजींकडे जात. शंकराच्या देवस्थानाची देखभाल करणाNया पुरोहित त्र्यंबक गुरुजींना दोन मुलं- दोन मुली. त्यांतील मोठा श्याम हा शेती बघत असे. त्र्यंबक गुरुजींच्या पाठीवर १७ वर्षांनी झालेल्या श्रीधरला शिक्षणात गती होती. पण गावात कॉलेज नव्हतं. बाहेरगावी जायची गावची पद्धत नव्हती. मग शिकवण्या घेऊन त्याने आपला जम बसवला. सिंधूबरोबर लग्न झालं. सुखासमाधानानं तीन वर्षं संसार केला; पण एका मुलाला जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. या आईवेगळ्या मुलाचं- जगन्नाथाचं घरात सर्व जण मायेनं लालन पालन करत. सिंधू नसलेल्या घरात श्रीधरचं मन रमेना. आंबेगाव सोडून श्रीधरने दुसरीकडे नोकरीस जाण्याचे ठरवले. इकडे शिवाजीरावांनाही आपल्या दोन मुलांच्या अपमृत्यूचा धक्का सोसावा लागला; पण मुलगी जान्हवीच्या हट्टाने आता गावात हायस्वूÂलचीही सोय झाली. जगन्नाथ आणि जान्हवी बरोबरीने शाळेत जात होते. आता शंकररावांच्या इच्छेविरुद्ध व गावाच्या रीतीविरुद्ध दोघांनी पुण्याला कॉलेजला प्रवेश घेतला. जान्हवीच्या आजीकडे- आई पुतळाच्या माहेरी ती राहू लागली. जगन्नाथ हॉस्टेलवर राहू लागला. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. जान्हवीच्या आजीलाही हा हुषार जगन्नाथ नातजावई म्हणून आवडला. दरम्यान शंकररावांचा अकस्मात मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबांचा कितीही घरोबा असलातरी हा जातीपातीविरुद्ध केलेला विवाह पसंत पडणे शक्य नव्हते; पण शहराचे पाणी प्यायलेल्या आजीच्या पाठिंब्याने हा विवाह पार पडला. आजीच्या ओळखीमुळे व समाजातील दबदब्यामुळे शब्द टाकताच जगन्नाथला बँकेत मोठ्या पदावर नोकरीही मिळाली. श्रीमंत आजीने लग्नाची भेट म्हणून नवा बंगलाही नातीला व नातजावयाला दिला. जगन्नाथाच्या घरचे मात्र या सगळ्या घटनांमुळे त्याला दुरावले. मनोमन जगन्नाथ या सगळ्यामुळे थोडा दुःखी झाला होता; मात्र त्याला आता पाऊल मागे घेता येत नव्हते. परिस्थितीच्या विचित्र वैÂचीत तो अडकला होता. जान्हवीच्या खर्चीक स्वभावामुळे जगन्नाथची तिला पैसे पुरवण्यात तारांबळ उडू लागली. बँकेतही आडमार्गाने पैसा मिळवण्यासाठी तो उद्युक्त झाला. आपण करतो ते बरोबर नाही, हे कळूनही तो परिस्थितीपुढे हतबल झाला. नोकरी गमावण्याची वेळ त्याच्यावर येऊन ठेपली. त्यातच बँकेचे अधिकारीही जाब विचारायला पोलिसांना घेऊनच आले... काय घडले त्यानंतर... जगन्नाथ या संकटातून बाहेर आला का? कोणी मदत केली का? बापू आणि जान्हवीचा झगडा संपला का?
-
Yuvraj Sambhajiraje Ani Sati Godavri (युवराज संभाज
डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.